Monthly Archives: ऑक्टोबर 2011

दावूनी बोट त्याला,म्हणती हसून लोक.

“अश्रूनी भरलेले डोळे पुशीत मी ज्यावेळी घरी यायची तेव्हा माझी आई नेहमीच माझा धीर उत्क्षेपक करायची.” जे.पी रोडवर स्वदेश हॉटेल समोर माझी आणि वंदनाची गाठ पडली.तिला पाहून मी एकदम चकीत झालो.माझा अचंबीत चेहरा पाहून वंदनापण थोडी लाजलेली मी पाहिली. रस्त्यात गप्पा मारण्यापेक्षा आपण स्वदेशमधे कॉफी पिऊया असं मी तिला म्हणालो. वंदनानेच मला ओळखलं.एरव्ही मी तिला […]

“मला माहित नाही!”

“प्रेम म्हणजे काय असतं हे समजण्याची जरूरी नसण्याची अनुमति माझ्याच मला मी दिली आहे.असं करण्याने प्रेमाचाच सुगावा मला लागलेला आहे.” मला आठवतं,फार पूर्वी पासून मनोहरशी बोलताना त्याला एखादा प्रश्न केला की बरेच वेळा तो त्याला काही माहित असलं तर ते सांगून टाकायचा. मला त्यावेळी वाटायचं की मनोहर खरोखरंच साधा सरळ माणूस आहे..कारण असं सांगून टाकण्याने […]

दोन वाळूचे कणही सारखे नसतात.

“आज मला वाटतं, एखादा, अतीव दुःखाने डोळ्यातून ठिपकणारा, अश्रू एक अद्भूत प्रकार असून त्याचं अस्तित्व हेच त्याचं खरं स्पष्टीकरण आहे.” फॉल चालू झाल्यावर इतक्या लवकर इतकी जोरात थंडी पडत नाही हा माझा अनुभव होता.अजून पंधराएक दिवस तळ्यावर फिरायला जायला काहीच हरक नसावी असं मला वाटत होतं.आज सकाळीच खिडकीच्याबाहेर डोकावून पाहिल्यावर काहीच दिसत नव्हतं.एव्हडं की शेजारच्या […]

खळगे खणण्यातली मजा.

“माझ्या अहंमन्यतेला झुगारून द्यायला मला थोडा वेळ द्यावा लागला.” श्रीधरची कोकणात खूप इस्टेट आहे.अलीकडे त्याने आपलं वाडवडीलांचं जूनं घर,जूनं घर कसलं? वाडाच होता,मोडून नवीन टुमदार बंगली बाधली होती.आणि तीसुद्धा शेताजवळच.हल्ली त्यालाच फार्म-हाऊस म्हणतात असा माझा समज होता. मागे मी श्रीधरला भेटलो होतो त्यावेळी मी त्याला म्हणालो होतो, “मी तुझं फार्म-हाऊस बघायला यायचं म्हणतोय.” मला कोकणातला […]

अनंतराव (अंत्या) अंतरकर.

“पण अंत्याच्या बाबतीत,साईटवर “लाईक पोल्स ऍट्रॅक ऍन्ड डीसलाईक पोल्स ऑल्सो ऍट्रॅक” असं काहीसं आहे.” आज मला अनंतराव अंतरकरांची बर्‍याच वर्षानी आठवण आली.अनंतरावाना अंत्या म्हणून जास्त ओळखलं जातं. अनंतराव मुळ कोकणातले.माडा-पोफळीच्या बागा,कलमी आंब्यांची बनं,भात-शेतीचे कुणगे ही त्यांच्या वाडवडीलांची मिळकत,त्यातून खच्चून येणारं उत्पन्न उदर्निर्वाहासाठी खर्चूनही भरपूर बचत होतेच.तशांत अंत्या लग्नाच्या भानगडीत अजीबात पडले नाहीत.त्यामुळे संसाराचा खर्च निश्चितच […]

गाण्यातून बोलगाणं

“मला कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचं ते बोलगाणं आठवलं.” काही वर्षापूर्वी मी एका साईटवर माझे लेख, कविता, अनुवाद लिहायचो.त्याची आज आठवण आली.ह्या साईटवर लिहिण्यासाठी मला एका सदगृहस्थाने सुचीत केलं होतं.ह्या साईटची खासियत म्हणजे,त्या साईटवरच्या लेखांच्या संख्येपेक्षा प्रतिसादांची (?) संख्या जास्त असायची.बर्‍याच लोकांच्या खर्‍याखुर्‍या प्रतिक्रिया असायच्या.पण गंमत म्हणजे त्यात, कुणाच्याही लेखनावार नेहमीच प्रतिक्रिया देणारा, एक कंपू होता. “आला […]

माझ्या बाबांचे ते शब्द.

“मला माहित होतं की,मी लिहिलेलं जरी लोकांना आवडलं नाही तरी काहीही फरक पडत नाही.मी लिहितच रहाणार.” सुधा लहानपणापासून लठ्ठ असलेली मी पाहिली आहे.जे ती खाईल त्याची बरेच प्रमाणात जरबी व्हायची. सुधाच्या बाबांनी ही व्याधी डॉक्टरना दाखवली होती. “अतिशय कमी प्रमाणात हा रोग लोकांना असतो.त्यांच्या शरीराचा चयापचय बिघडल्यामुळे असं होत असतं.” सुधाचे डॉक्टर तिला म्हणाले. सुधा […]

मी नेहमीच वर्तमानकाळात जगतो.

“जीवनाच्या अखेरीला मला मागे वळून पाहून माहित करून घ्यायचं आहे की मी माझा वर्तमानकाळ जगत असताना वेळेचा अपव्यय मुळीच केला नाही.” अरूणचं लग्न होऊन दोन वर्षं झाली.अलीकडे त्याचा बिझीनेसपण उत्तम चालला होता.औषधं विकण्याचा त्याचा व्यवसाय होता.शहरात जागोजागी जाऊन फार्मसीमधे तो औषधं घेऊन जायचा.त्याची डीलिव्हरी करायचा. गेल्या वर्षापासून त्याला मोटरसायकल घ्यायची जरूरी भासत होती.पण हा प्रश्न […]

जीवनभरची शिकवणूक म्हणजेच आनंदमय जीवन.

“असं दिसतं की,मोठ्यांचा दुप्पटीपणा आणि दांभिकपणा लहान मुलांना अगदी स्पटिकाप्रमाणे स्पष्ट दिसतो.” रंजना माझ्याकडे दळव्यांची नाटकाची पुस्तकं वाचण्यासाठी घेऊन जायला आली होती.आमच्या थोडया गप्पा झाल्या. मी रंजनाला म्हणालो, “जीवन जगताना जगात शिकण्याचे खूप मार्ग आहेत.पुस्तकं वाचून खूपच ज्ञान मिळतं.तसंच अनुभवातूनसुद्धा भरपूर ज्ञान मिळतं.असं माझ्या ध्यानात आलं आहे.तुझं काय म्हणणं?” मला रंजना म्हणाली, “माझ्या मनात असेच […]

एकमेकातला दुवा जाणण्याची असमर्थता.

“आपण माणसं एकमेकाशी दुव्याने सांधलेले आहो.हा एकमेकामधला दुवा माणूसकीची खरी व्याख्या करतो.” आता उन्हाळा संपला.फॉल चालू झाला.मागल्या परसातल्या झाडावरची उन्हामुळे रंगीत झालेली सफरचंद, पीच,प्लम्स खाली पडायला लागली आहेत. हळू हळू ह्या झाडांची पानं झडायला सुरवात होणार.शेवटी पडझडीने उघडी बोडकी झालेली ही झाडं,फॉल आणि कडक थंडीला सामोरी जाणार आहेत. “पण आणखी पंधराएक दिवस तळ्यावर फिरायला यायला […]