Monthly Archives: नोव्हेंबर 2011

साक्षात्कार दिलीपचा.

“मला वाटतं हा निसर्ग,हा विधाता आपल्याला साद देत असतो.आणि मी मानतो की त्याच्या सादेला आपण ओ दिली पाहिजे.” दिलीप गव्हाणकर दिल्लीलाच जन्मला.त्याचे वडील वसंत गव्हाणकर सुप्रिमकोर्टात वकिली करायचे.दिलीपही त्यांच्या मागोमाग वकिली करायला लागला.दिल्लीची प्रतिष्टीत मंडळी रहायची त्या वसंत विहारमधे गव्हाणकरांचा बंगला होता. मी ऑफिसच्या कामाला दिल्लीला गेलो की गव्हाणकरांच्या घरी भेट देऊन यायचो.मुंबईला येण्यासाठी रात्री […]

श्रद्धा आणि चंगळ

“मनात दुसर्‍याबद्दल चिंता करणं म्हणजेच स्वतःला शांती मिळवण्याचा उत्तम मार्ग शोधणं” काल प्रो.देसाई माझ्या घरी आले होते.बाहेर थंडी खूपच होती.ह्या वयात प्रकृती सांभाळणं आवश्यक असतं.कडक उन्हात थंडी तेव्हडी भासत नाही. म्हणून ते लवकरच आले होते.एकदा संध्याकाळ झाली की मग बाहेर जाववंत नाही. भाऊसाहेब थोडावेळ बसल्यावर,चहाचा कप त्यांना देत मीच त्यानां म्हणालो, “श्रद्धा असणं आणि त्यावर […]

माझ्याच स्वप्नांचा सन्मान.

“विधात्याने आपल्याला परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात आश्चर्यजनक रूपाने त्याने आपल्याला अपरिपूर्णच बनवलं आहे.” ए.एम.चौगुले माझ्याबरोबरच माझ्या ऑफिसात कामाला होता.तो सिव्हिल इंजिनीयर होता.पण त्याला कागदावर नकाशे काढायला खूपच आवडायचं. तो आमच्या ड्राफ्टिंग खात्यात वरच्या पातळीवर काम करायचा.मला नेहमीच म्हणायचा “तू आमच्या घरी ये”. डोंगरीला तो रहायाचा. डोंगरीला मी पूर्वी एकदा काही कामाला गेलो होतो. खूपच झोपड्यानी भरलेला […]

हवं तेव्हडंच असणं म्हणजेच मुबलक असणं.

“आमची गाडी कुठेही पार्क केली तरी ती शोधून काढणं कठीण होत नाही.कारण एव्हडी जूनी गाडी कुणीच वापरीत नसावं.” मागच्या आठवड्यात विकएन्डला मेरी आणि तिचा नवरा पास्कल माझ्या घरी आला होता.खरं पाहिलंत तर ती दोघं वेसाव्याला त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेली होती.पास्कलचं वेसाव्याला त्याच्या वाडवडीलांचं एक टुमदार घर होतं.वेसाव्या गावात बरीच सुधारणा होत असताना ह्यांचं घर आड […]

आणखी आणखी मिळवण्याची आशा.

“हे सर्व करीत असताना तृप्त वाटणारा माझ्या आजोबांचा चेहरा अजून माझ्या मनात कोरून ठेवला गेला आहे. अगदी साधं सरळ जीवन माणसाला परमानंद देतो.” रमाकांतचं पूरं आयुष्य कोकणात गेलं आणि तेसुद्धा आपल्या आजोळच्या घरात गेलं.रमाकांत प्रथमच मुंबईला आला होता.यायची पाळी आली नसती तर तो मुळीच आला नसता. “ज्यांना आणखी आणखी मिळवण्याची हौस असेल त्यानी जावं वाटलं […]

रोज एक नवा चेहरा आणि नवी ओळख.

“ही नुसती भन्नाड कल्पना नव्हती,तर त्यामुळे कुणालातरी वाटावं की, “आजचा माझा दिवस मस्त गेला” अनीलची आणि माझी अलीकडेच ओळख झाली होती.त्यासाठी त्याची माझी ओळख दुसर्‍याकुणी करून दिली नव्हती.अनीलेने स्वतःच मला रस्त्यात गाठून माझ्याशी ओळख करून घेतली होती.त्यानंतर कधीही तो मला भेटला की माझ्या नावा-गावानीशी आठवण लक्षात ठेवून बोलायचा.त्याच्याबरोबर रस्त्यावरून चालायचं म्हणजे दर पल्ल्यामागे त्याला कोणतरी […]

शिसपेन्सिल.

“मी शिसपेन्सिल नेहमीच वापरणार.जे अगोदरच उत्तमरित्या चालतंय त्यात अवघडपणा आणण्याची काय जरूरी आहे?” विनय नावाप्रमाणेच विनयशील आहे. त्याला जे वाटतं ते तो अगदी विनयशीलता ठेऊन सांगत असतो. सध्याच्या धामधूमीच्या जगात जितकं साधं रहावं तितकं रहाण्याच्या तो प्रयत्नात असतो.आणि तसं असण्यात त्याला अभिमान वाटत असतो.सध्या्च्या संपर्क साधण्याच्या आणि मनोरंजन करण्याच्या मोबाईल उपकरणापासून तो दोन हात दूरच […]

जीवनभराची शिकवणूक.

“प्रत्येकाच्या अंगात ठरावीक कला असते तसंच त्याला ठरावीक ज्ञान असतं.असं असूनही आपल्याला खरा माणूस होण्यासाठी,आपला इतरांशी कसा संबंध असतो ह्यावर अवलंबून आहे.कष्ट घेणं हे नुसतच अनिवार्य नसून ते घेत असताना जीवनभराची अत्यावश्यक तालीम मिळणं हे त्याचं फळ आहे.” आता बरीचशी थंडी पडायला लागली आहे.झाडांची पानं पिवळी व्ह्यायला लागली आहेत.एखाद दुसरं जास्त पिवळं झालेलं पान देठासकट […]

साध्या प्रश्नातली ताकद.

“लगेचच माझ्या अंगातला लढा,लढाऊ वृत्ती म्हणा हवं तर,जागृत झाली.मी काय बरं करावं?मी माझं संरक्षण करावं का? का,त्यांने मला धमकावं आणि मी माझा स्वाभिमान कमजोर करून घ्यावा?” मी मधुकरच्या घरी गेलो होतो.माझं त्याच्याकडे थोडं काम होतं.त्या कामाविषयीच गप्पा चालल्या होत्या. इतक्यात बाहेर रस्त्यावर आरडाओरड चाललेली ऐकू आली.मधुकरचा मुलगा धावत वरती आला आणि आपल्या बाबांना कसली गडबड […]

कोकणातला उन्हाळा.

“त्या खोल ओहळात म्हणे, पुन्हाळेकरांच्या तरूण सुनेने आयुष्याला कंटाळून जीव दिला होता.” कोकणातला पावसाळा जसा मला आवडतो तसा कोकणातला उन्हाळापण आवडतो.उन्हाळ्यातला तो ताज्या हवेचा थंड वारा,फुलझाडांच्या आणि मोहर आलेल्या आंब्याच्या पानामधून जेव्हा घाईगर्दीने शिरून बरोबर फुलांचा आणि आंबेमोहराचा सुगंध दरवळत आपल्या नाकावर येऊन आदळतो आणि सोनचाफ्यासारख्या उंचच उंच वाढणार्‍या झाडावरच्या चाफ्याच्या फुलांच्या पाकळ्या हळुवार जमीनीवर […]