Monthly Archives: डिसेंबर 2011

व्यसनमुक्ती.

“मला लक्षात आलं की यातना सर्व व्यापी असतात. अवास्तविक कठोरपणाच्या, चिडचिडेपणाच्या मागे त्या दडून असतात.” अनंत नाडकर्ण्याला माझ्या दारात बेल वाजवून उभा ठाकलेला पाहून मी खरंच अचंबीत झालो.ही गॉन केस असं मी तत्पूर्वी समजत होतो. त्याचं असं झालं,एका नावाजलेल्या बॅन्केत चांगल्या वरच्या पोझीशनवर असलेल्या अनंताला एका एकी अवदसा सुचली. वडील दारूच्या व्यसनाने जर्जर होऊन सर्व […]

पुष्टावलेला तो उंच ऊस

माझ्या त्या (अजून आणखी एक इडंबन केलं आहे.) मधल्या “पुष्टावलेल्या ऊसाच्या” विडंबनाचा जन्म असा झाला. मुळ कवितेतल्या पहिल्या ओळीत “कोसळणारा तो धुंद पाऊस” ह्यातला “पाऊस” ह्या शब्दावरून “ऊस”हा शब्द आठवला. आणि नंतर उसाचं शेत,ऊस खेचणं, चीर काढणं,रस थेंब थेंब पडणं,हात चिकट होणं-ऊसाचा रसच तो चिकट असणार- ऊचकणं आणि ऊस म्हटल्यानंतर मुळासकट खाणं हे सगळं माझ्या […]

कट्ट्या-बट्ट्या.

“तुम्ही दोघी बहिणी लहान लहान होता तेव्हा,भांडणं झाल्यावर कट्टी-बट्टी खेळला असालच.” मी माझ्या पत्नीला म्हणालो. केशव, माझा मित्र,वांद्रा स्टेशन जवळच असलेल्या एका चाळीत रहातो.मी कधी कामाला वांद्र्याला उतरलो की हटकून केशवला भेटून येतो. असाच काल मी केशवकडे गेलो होतो.आमच्या राजकारणावर,महागाईवर,हवामानावर गप्पा चालल्या होत्या,तेव्हड्यात केशवचा सहा वर्षाचा मुलगा रडत रडत केशवजवळ येऊन म्हणाला, “शेजारचा बंटी माझ्याशी […]

केल्यावीणा होणे नाही.

“आपण साधेपणाने जगावं हे आपलं निदान असावं,म्हणजे इतर निदान जगतील तरी.” अरूण मुळ कोकणातला.त्याच्या वडीलांची आणि माझी चांगलीच ओळख होती.कोकणातल्या एका खेडेगावात गरीब परिस्थितीत राहून हे कुटूंब आपली गुजराण करायचं.सुरवातीला अरूणचे वडील एका किराण्या व्यापार्‍याकडे कारकूनाचं काम करायचे.पेढीत बसून खरडे घाशी झाल्यानंतर त्यांना बाहेरची कामं पण करावी लागायची.ही कामं करायला त्यांना एक जुनी सायकल दिली […]

“का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी?”

“माझ्याच जीवनातल्या अनुभवाचा लाभ आणि हलक्या आवाजातली माझ्या आजीची कुजबूज त्याला कारणीभूत होती.” मला आठवतं,मी वासंतीची भरपूर समजूत घालण्याचा त्यावेळी प्रयत्न केला होता. “मलाच असं का व्हावं?जगात एव्हड्या स्त्रीया आहेत कितीतरी आपल्या प्रकृतिकडे नीट लक्ष देत नसाव्या.तरीपण त्या असल्या दुर्दैवी घटनातून सुटतात.त्यांना असं व्हावं असं मी म्हणत नाही.पण मीच एकटी अभागी का व्हावी?” एक ना […]

निचे मुंडी नाणी धुंडी

“मग ज्याची जरूरी नाही ती गोष्ट शोधण्यासाठी वेळेला खर्ची का बरं टाकावं?” विनयला रस्त्यातून चालताना पाहिलं की तो नेहमीच मान खाली घालून चालताना दिसतो.अर्थात अधून मधून लांबवर पहाण्यासाठी मान उंचावून पहात असतो.कुणी ओळखीचा येताना दिसला की वेळीच मान वर करून त्याच्याशी संपर्क साधतो. रस्त्यातून चालत जाताना प्रत्येकाची स्टाईल असते म्हणा. कोण ताठ मानेने चालतो,कोण सारखा […]

त्या वडाच्या झाडाखालच्या आठवणी.

“एकदा मी आजीला विचारलं होतं, “एक म्हणण्या ऐवजी तू लाभ ह्या शब्दाने मोजमापाला सुरवात का करतेस.?” माझे पाय वळू नयेत म्हणून आम्ही दोघे रानातल्या एका प्रंचंड मोठ्या वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत बसलो.बसलो असतानाही प्रवीण आपल्या आजोबांच्या आठवणी काढून काढून सांगत होता. मला म्हणाला, “पहाटेच माझ्या आजोबाबरोबर रानात फिरायला जायला मला आवडायचं.आम्ही जायचो ते रान म्हणजे […]

झाडा संगत चालणं.

“मला आता समजून आलंय,माझे आजोबा जीवनाच्या महासागरातून स्वतःचा कसा बचाव करीत राहिले.माझी खात्री आहे की त्यांच्या जवळचा तो रानातल्या वातावरणाचा खजिनाच अंधारातली प्रकाश ज्योत होती.” प्रवीणचे आजोबा फॉरेस्ट ऑफीसर होते.त्यांची कारकीर्द रानात,जंगलात रहाण्यात गेली.प्रवीण अगदी लहानपणापासून आपल्या आजोबांच्या सहवासात होता.त्यामुळे त्याच्यावर जे आजोबांकडून संस्कार झाले होते ते जास्त करून निसर्गसृष्टी संबंधानेच होते.आता निवृत्त होऊन प्रवीण […]

विजयचं शहाणं खूळ

“कदाचीत काहीना निसर्गाचं महत्व माहित नसावं,किंवा काहींची ह्या जीवनाशी ओळखही झाली नसावी.” जेव्हा पहावं तेव्हा विजय आणि त्याचं कुटूंब देशात कुठेतरी सहलीवर गेले आहेत असं ऐकायला यायचं.मुलांना सुटी नसेल तर विजय एकटा कुठेतरी सहलीवर जाऊन यायचा.मात्र सुट्टी लागल्यावर सर्व कुटूंब सहलीवर जायचं.त्या त्या जागी सर्व ऋतूत कसं वाटतं हेही पहायला त्याचं कुतूहल कमी पडत नसायचं.कोकणातला […]

जीवनातलं परिवर्तन.

“जीवनातल्या ह्या परिवर्तनामुळेच माफ करणं आणि माफ करून घेणं सोपं होतं.परिवर्तनामुळेच मी माझा उदय करून घेऊ शकते.” पद्मजा,गिरीजा आणि तनुजा ह्या पटवर्धनांच्या तीन मुली. पटवर्धनानी त्यांना उत्तम शिक्षण दिलं.मोठ्या दोन मुलींची लग्नपण करून दिली.आणि एकाएकी ऐन उमेदीत असताना पटवर्धनाना मोठा हृदयाचा धक्का येऊन त्यातच त्यांचं निधन झालं. पटवर्धनांच्या पत्नीला हा धक्का सहन झाला नाही.तिने अंथरूण […]