“का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी?”

“माझ्याच जीवनातल्या अनुभवाचा लाभ आणि हलक्या आवाजातली माझ्या आजीची कुजबूज त्याला कारणीभूत होती.”

मला आठवतं,मी वासंतीची भरपूर समजूत घालण्याचा त्यावेळी प्रयत्न केला होता.
“मलाच असं का व्हावं?जगात एव्हड्या स्त्रीया आहेत कितीतरी आपल्या प्रकृतिकडे नीट लक्ष देत नसाव्या.तरीपण त्या असल्या दुर्दैवी घटनातून सुटतात.त्यांना असं व्हावं असं मी म्हणत नाही.पण मीच एकटी अभागी का व्हावी?”
एक ना दोन असे अनेक प्रश्न मला वासंतीने त्यावेळी केले होते.
“पराधिन आहे पूत्र मानवाचा” पासून
“जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” पर्यंत आणि
“या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी”
इथपर्यंत काही गीतातल्या ओळी मी वासंतीला उदाहरण म्हणून सांगीतल्या होत्या.

शेवटी व्ह्यायचं तेच झालं.वासंतीच्या उजव्याबाजूला शस्त्रक्रिया करावी लागली.त्यावर आता बरीच वर्ष होऊन गेली.वासंती आता थोडी सावरली.जुन्या गोष्टी काढून आम्ही गप्पा मारीत होतो.
मला वासंती म्हणाली,
“जेव्हा मी तेराएक वर्षाची होते तेव्हा मार्लिन मन्रो ही एक जगातली प्रसिद्ध नटी होती.स्वेटर-गर्ल म्हणून ती ओळखेली जायची.नव्हेतर तो एक प्रकोप म्हटला तरी अतिशयोक्ती होणार नाही.विशाल उरोजाची स्त्री म्हणजे पुरषांच्या डोळ्यात भरणारी गोष्ट होती.निदान मी जेव्हा मोठी होत होते
तेव्हा असा समज होता.स्त्रीयांचा त्यावेळी समज होता की त्यांचा उरोज हा एक हुकमतीचा भाग होता,त्याशिवाय तो एक सौन्दर्याचा मानदंड होता.
अशा गोष्टीने प्रभावित होणार्‍या माझ्यासारख्या एका तरूण मुलीला कुणीही असं सांगण्याची पर्वाही केली नाही की,सौन्दर्‍याचं माप चोळीच्या आकारावर मापता येत नाही.

मला झालेल्या स्तनाच्या कर्क रोगाने ते शिकवलं आणि आणखी काही शिकवलं.हा रोग प्रत्येक स्त्रीच्या हृदयाचा एव्हडा भावनिक विध्वंस करतो की,एखाद्या करामती स्त्रीचं हातातलं सोन्याचं कांकण जसं तिला प्रिय असतं तसंच हे प्रत्येक स्त्रीला प्रिय असतं.माझ्या एका बाजूच्या उरोजाच्या
हानिशी मला समझोता करून घ्यावा लागला होता.प्रतिवर्तनाचा विचार केल्यास,माझ्या तरूण वयात सिनेमातल्या नट्यांवर जेव्हा माझं मन ग्रस्त झालं होतं तेव्हा स्त्रीच्या भुषणाचं प्रधानलक्ष नेहमीच माझा समोर हजर होतं असं मला त्यावेळी नेहमीच वाटायचं.

माझे आजोबा माझ्या आजीच्या पस्तिसाव्या वर्षीच गेले.जाताना सहा मुलांच्या जोपासनेची जबाबदारी तिच्यावर ते ठेवून गेले.तिने खूप कष्ट काढले. जेवणाचे डबे पोहचविण्यापासून,कपडे शिवण्यापासून ते मानाने पैसे मिळतील असं कसलही काम करून उदर्निवाह केला.तिचं जीवन कष्टाचं आणि कधीकधी भयावह असायचं.परंतु,गरीब परिस्थितीवर तिने काबू आणला आणि हे केवळ तिच्या दृढ संकल्पनामुळे होऊ शकलं.

माझी आणि माझ्या धाकट्या बहिणीचीसुद्धा तिने काळजी घेतली.घरातली कामं करीत असताना मला तिने बर्‍याच कलाकुसरी शिकवल्या.अगदी आजतागायत मी तिची ऋणी आहे.माझी आजी सकाळी उठल्यानंतर तिच्या अनेक कामाच्या शिरस्त्यात आंघोळ करून झाल्यावर प्रथम कपडे
चढवताना तिच्या छोट्याशा कपाटातून चोळी काढून ती अंगावर चढवण्याचं अवघड काम असायचं .तिच्या उरोजाचा कसलाच दिखावा होत नव्हता.
तिच्या बुटूकल्या आणि काहीशा गुबगुबीत शरीरावर त्या वक्राकार आकारामुळे स्त्रीसुलभता उठून दिसायची.

एक्याऐशी वर्षावर माझी आजी गेली.माझं आयुष्य भकास झालं.ही रिक्तता सुस्पष्ट व्ह्यायला मला जरा कठीण होत होतं.अगदीच अलीकडे जेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या आजीचं आचरण तिला खास बनवू शकलं तेव्हा स्पष्टता जाणवली.

सहजसुंदरतेने माझी आजी जगली.कुणा विषयी वाईट उद्गार तिने कधीही काढले नाहीत.कधी कुणाच्या कुटाळक्या केल्या नाहीत.अनावश्यक असं काहीही बोलली नाही.तिच्या सभोवतालची हवा सुगंधाने दरवळायची.माझ्या नकळत मला ते भासायचं.लोकांवर असाधारण वजन आणायला अमुकच कारण तिला लागायचं नाही.उरोजही कारण नसायचं आणि सोन्याचं कांकणही नसायचं.ते सर्व काही सारं काही असायचं.

मला पन्नासावं वर्षं लागलं त्यावेळी माझ्या स्त्री भूषणाची कसोटी मला कळली.मला स्तनाचा कॅन्सर झाल्याचं कळलं.
मी धीटपणाचा आव आणू शकले.धैर्‍याच्या शब्दांचा बुरखा मी परिधान केला.पण मनोमनी खोलात जाऊन मी आश्चर्य करू लागले की करामती करणारी स्त्री सोन्याच्या कांकणाशिवाय गुजारा कशी करू शकणार.?

सरतेशेवटी माझ्यात आलेल्या क्षमतेचा मी शोध लावला.माझ्याच जीवनातल्या अनुभवाचा लाभ आणि हलक्या आवाजातली माझ्या आजीची कुजबूज त्याला कारणीभूत होती.

जी कोणी ह्या सारखा मानसिक आघात सोसत होती ती सर्व मला मिळणार्‍या स्वास्थलाभातून शिकून पुढे जात होती.मागे वळून पाहिलं तर बर्‍याच दृष्टीने तो एक अपूर्व अनुभव होता.माझ्या लक्षात आलं की स्त्रीत सोन्याच्या कांकणापेक्षा आणखी काही असतं.माझं स्त्रीत्व माझ्या स्त्री संबंधी
पूर्वजांचं आणि जिने मला शिकवलं,वाढवलं आणि प्रेम केलं ह्यांच्या संम्मिश्रणाचं आहे.जीवनात मिळालेल्या अनुभवाला शब्दातून आणि प्रत्यक्ष क्रियेतून इतराना भरभरून वाटण्याच्या सम्मतितून स्त्रीमधे क्षमता अंतर्भूत झालेली असते.आणि ह्यावर माझा विश्वास आहे.माझ्या आजीने मला असं
सांगीतलं आहे.”

मला हे वासंतीचं ऐकून तिची किव आली.वेळ-काळामधे उपचारात्मक क्षमता असते हे अगदी खरं.वासंतीने आता स्वतःला सावरलं आहे.मी तिची जमेल तेव्हडी स्तुति केली.त्याने तिला खूप समाधान झालं.
मी मनात म्हणालो,
“पण राणीला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी
का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी?”

श्रकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: