जणूकाही….

 

“सर्व गोष्टी शक्यतेत सामाविष्ट करता येतात पण मला वाटतं मी व्यवहारिक माणूस म्हणून सध्या किंवा पुढेही त्या शक्यता माझ्यापासून दूरच
ठेवाव्यात.”

त्यादिवशी रमाकांत मला म्हणाला,
“कधी कधी मला वाटत असतं की,आपण सर्व माणसं जे आपल्याला विश्वासार्ह वाटतं त्यावरच विश्वास ठेवतो का?आणि नंतर मी मलाच विचारतो,
“मी पण मला विश्वासार्ह वाटतं त्यावरच विश्वास ठेवतो का?”
आणि क्षणभर माझी मलाच भीती वाटते.आणि स्वतःला म्हणतो,
“नाही नाही,मुळीच नाही”
पण आता मी,ज्यावर विश्वास आहे ते सांगत असताना,मला असं वाटतं की,ती शक्यता आपल्या मनात ठेवलेली बरी.”

हे रमाकांतचं बोलणं ऐकून मला बोलल्याशिवाय रहावलं नाही.मी थोडा विचार करून त्याला म्हणालो,
“मला असं वाटत असतं की,कुठेतरी जीवनात आढळणार्‍या सर्व प्रश्नांना पूर्ण स्पष्टीकरण आहे.कुठेतरी पूर्ण सत्य अस्तित्वात आहे.आणि कधी कधी
आपण त्या सत्याबद्द्ल जागृतही असतो.फक्त त्याचं आपल्याला स्पष्टीकरण देता येत नाही.अगदी स्पष्टीकरणाच्या जवळ जवळ जाऊन आपण एव्हडंच म्हणू की,
“जणुकाही”
“जणुकाही मी देवाबरोबर चालत होतो”
किंवा
“जणुकाही मला एकाएकी जीवनाचा सर्वार्थ कळला”
आणि त्यानंतर वेळ निघून जाते.”

रमाकांतला माझं जणूकाहीबद्दलचं म्हणणं पटलं असं दिसलं.
“मला वाटतं की,बर्‍याचश्या आपल्या धर्मावरच्या श्रद्धा आणि तत्वज्ञान संबंधीच्या श्रद्धा,तसंच आपली बरीचशी कारीगरी-मला वाटतं ते सर्व क्षण माणसाचे पुनःप्राप्तिसाठीचे प्रयत्न असतात.
माणसाचे “जणूकाही”ची चित्र किंवा वाटलं तर दृष्टांत म्हणा,सत्याचे काही आनंदमय आभास देऊ करतात पण पूर्ण सत्य मात्र नव्हे.निदान काही झालं तरी माझ्यासाठी नव्हे.”
असं सांगून माझ्या मुद्यावर आपलं सत्याबद्दलचं मत त्याने देऊन टाकलं.

आणि रमाकांतने पुढे सांगून टाकलं,
“तसं पाहिलंत तर माझ्या ह्या विचाराच्या स्तरावर मी साधारण पस्तीस वर्षाचा होतो तेव्हा येऊन ठेपलो होतो.म्हणजे बरोबर पंधरा वर्षा पूर्वी.पण मी पाहिलं मला तिथे विराम देता आला नाही.काहीसा,कुठेच काही नसल्याच्या मध्यावरही विराम देता आला नाही.”

 

मी “जणूकाही” बद्दलच्या माझ्या मनात असलेल्या चित्राचा विस्तार करून रमाकांतला म्हणालो,
“माझं मला वाटू लागलं की,वास्तववादी श्रद्धा जोपासून मला माझं जीवन जगलं पाहिजे.सरतेशेवटी मी माझं स्वतःच चित्र रेखाटलं.मी म्हणेन ते चित्र कुठच्याही आघाताने प्रभावित होऊ शकणार नाही असं होतं.ते अशा तर्‍हेने कल्पित केलं गेलं होतं की,जीवनातल्या होऊ घातलेल्या निराशापासून माझं संरक्षण होऊ शकतं.पण त्यात कायमचं सूख मिळण्याच्या योजना नव्हत्या.पृथ्वीवरचं स्वर्गीय सूख नव्हतं.आणि आकाशमंडळातला आशेचा तारा नव्हता. ह्या सर्व गोष्टी शक्यतेत सामाविष्ट करता येतात पण मला वाटतं मी व्यवहारिक माणूस म्हणून सध्या किंवा पुढेही त्या शक्यता माझ्यापासून दूरच ठेवाव्यात.”

रमाकांतला माझी ही चित्राबद्दलची कल्पना आवडलेली दिसली.हसत हसत मला म्हणाला,
“माझं चित्र दाखवतं की जीवन हे एखाद्या कारागीराने हातात घेतलेल्या कामासारखं आहे.तो स्वतः कारागीर असून चांगलं काम करण्याच्या तो प्रयत्नात आहे.आणि ह्या कामातूनच काम फत्ते होत असताना त्याला सुखावल्यासारखं होत आहे.
माझ्या लक्षात आलं आहे की,हा कारागीराचा तत्वविचार मला जे मी काय करीत असतो त्या प्रत्येक गोष्टीशी प्रयोग म्हणून वापरू शकतो.मग मी माझी सायकल दुरूस्त करीत असेन,एखादा निबंध लिहित असेन नाहितर राजकारणात भाग घेत असेन किंवा असंच काहीतरी करीत असेन.मात्र त्यातून मी एक कामाचा चांगला नमूना तयार करीत असेन. मी स्वतःच एक चांगला नमूना होत असेन.अर्थात तुम्ही विचाराल चांगला ह्या शब्दाचा अर्थ काय?मी म्हणेन जसा मी तो नमूना चांगला पहात आहे तसा.मला वाटतं तुम्हीही चांगला म्हणाल जसा तुम्हाला वाटतो तसा.परंतु, ह्यामुळेच बरेच वेळा आपण सर्व मिळून एखाद्या गोष्टीचा असाच विचका करतो.पण हा सर्व विचका आपल्याकडून होऊन सुद्धा आपण उद्यासाठी आपली प्रगति करीत असतो.”

आमच्या दोघांच्या संवादाला समारोप आणण्याच्या दृष्टीने मी रमाकांतला म्हणालो,
“भविष्यात उद्या आलेलाच असतो.उद्या आपण प्रयत्न करू.आणि असे अनेक उद्या माणसाच्या जीवनात येत रहाणार.मला वाटतं माणसाचं सूख प्रयत्न करण्यात असतं.अगदी परत परत प्रयत्न करण्यात असतं.”
परत ह्याच विषयावर पुन्हा कधीतरी आणखी चर्चा करूया असं मी रमाकांतला उठता उठता सांगीतलं.

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॉलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

  1. TAUSIF
    Posted फेब्रुवारी 5, 2012 at 1:03 सकाळी | Permalink

    farch chan…………!


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: