जीवनात गुणवत्ता येण्यासाठी.

 

“श्रद्धा,विश्वास आणि परोपकार हे गुण सूर्योदय-सूर्यास्ता एव्हडे,भरति-ओहटी एव्हडे,जुने आहेत.खरोखरच ते मनुष्य जातीसाठी चमत्कार करणारे आहेत.”

ब्रिगेडीयर नरेन्द्र परब आमचा शेजारी.कोकणात त्यांचं घर आमच्या घरापासून जरा लांब असलं तरी गावात भेटाभेटी होऊन आमची ओळख वाढली होती.
नरेन्द्र दिल्लीत वसंतविहार मधे मिलिटरीच्या एका बंगल्यात रहातो.आता तो लवकरच निवृत्त होणार आहे.त्याची दोन्ही मुलगे सैन्यात असतात.
मी दिल्लीला कामासाठी गेलो की नरेन्द्राच्या घरी बरेच वेळा जातो.दिल्ली-मुंबईची शेवटची फ्लाईट घ्यायची झाल्यास संध्याकाळी कामं संपल्यावर थोडावेळ मी नरेन्द्राच्या घरी गप्पागोष्टीसाठी जातो.असाच एकदा मी त्याला भेटायला गेलो असताना मला नरेन्द्र सांगत होता,

“एकदा संध्याकाळच्या वेळी मी आणि माझी पत्नी आमच्या दोन मुलांसह आमच्या घरासमोरच्या बागेत विरंगुळा म्हणून बसलो होतो.आमची दोन्ही मुलं त्या विकएन्डला सुट्टी म्हणून घरी आले होते.आमच्या चौवीस वर्षाच्या मोठ्या मुलाच्या ह्या ट्रिपनंतर त्याचं परत येणं बरेच दिवसानी होणार होतं.तो ज्युनीअर लेफ्टनंट म्हणून इंडीयन नेव्हीमधे कामाला असतो.लहानगा वीस वर्षाचा जो आर्मीमधे प्राईव्हेट म्हणून कामाला आहे तो आपल्या भावाला भेटण्यासाठी आणि त्याला गुडबाय म्हणण्यासाठीच आला होता.

आम्ही त्यांच्या लहानपणाच्या आठवणी ताज्या करीत बसलो होतो.शिवाय कुटूंबातल्या इतर घडामोडीबद्दलही चर्चा करीत होतो.आमच्या ह्या अगदी जवळीक असलेल्या कुटूंबात जरा गंभीर वातावरण पण दिसून येत होतं.

माझं आयुष्य मी मिलिटरीत सेवा करण्यात व्यतित केलं.आता माझी निवृतिची वेळ आली आहे.त्याच आठवड्यात माझा जन्मदिवस होता.माझे दोन्ही मुलगे मला काही प्रश्न विचारत होते.त्यांना विचारायचं होतं की माझ्या दृष्टीने,जीवनात गुणवत्ता येण्यासाठी, महत्वाच्या गोष्टी काय असाव्यात.

मी थोडा वेळ विचारात पडलो.आणि एकाएकी जीवनातल्या तीन महत्वाच्या नैतिक गोष्टी मला आठवल्या.श्रद्धा,विश्वास आणि परोपकार ह्या तिनही गोष्टी जीवनात सर्व काही लाभकर होण्यासाठी मुलभूत आहेत.ह्याच गोष्टीतून जे काही चांगलं आहे ते उदयाला येतं.जे काही वाईट आहे ते मुळीच उद्भवत नाही.विधात्याला आणि समाजाला देण्याचं आपलं जे ऋण आहे ते कर्तव्यनिष्ट राहून प्रदान करण्याचं ह्या गोष्टी प्रतिनीधीत्व करतात.

माझ्या दोनही मुलांनी मला आपला आत्मविश्वास प्रकट करून सांगीतलं की त्याबद्दल म्हणजे माझ्या उपदेशाबद्दल आणि त्यातल्या सरळ-साध्या तथ्याबद्दल ते जागृत आहेत. माझ्या दोनही मुलांनी मला सुचीत केलं,की मी जरा त्या गोष्टींचं महत्व विस्ताराने सांगीतलं आहे.आणि जीवनात सुखी रहाण्याची कोशिश करण्यासाठी व्यवहारिक मार्ग सांगीतला एव्हडंच.

मात्र आम्ही तिघेही एका गोष्टीबद्दल सहमत होतो की,आपल्यात असलेल्या श्रद्धेची उच्चतम कसोटी म्हणजे आपला ईश्वरावर विश्वास असणं.अर्थात श्रद्धा हा परंपरेचा झरा आहे आणि त्यातूनच आपल्या कुटूंबाकडे,मित्रमंडळीकडे आणि देशाकडे आपल्या विश्वनितेचा प्रवाह वहात असतो.
पुढाकार आणि कल्पनाशक्ति ह्या श्रद्धेच्या उपजाती आहेत.तसंच सत्यनिष्ठा आणि आत्मविश्वास हे श्रद्धेचे मुलभूत स्तंभ आहेत.मनात विश्वास असल्याने संकल्प आणि निर्भयतेची पूर्ती होऊन कुठचीही गोष्ट साध्य करण्याची इच्छा शक्ति बळावते.निष्पत्ति आणि आक्रमकतेची प्रेरणा ह्या दोन गोष्टी अंगात क्षमता आणतात.परोपकाराचा भला हात पुढे केल्याने,त्यातून करूणा,निस्वार्थता,दीनता आणि सहानुभूति ह्या सारखे जीवनात रंग आणणारे गुण उभारून येतात.”

नरेद्राचं हे सर्व ऐकून घेतल्यावर माझं मत देताना मी त्याला म्हणालो,
“मला तुम्हा बाप-लेकांचं कौतूक करावसं वाटतं.अर्थात तुम्हा दोघां आईवडीलांचे संस्कार त्यांच्यावर असल्याने ह्या थरावरच्या चर्चा ते तुमच्याशी करू शकतात.एव्हडंच नाही तर देशसेवा करण्यासाठी तुझ्या पाऊलावर पाऊल टाकून दोघेही सैन्यात दाखल झाले आहेत.ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. तुमची ही चर्चा ऐकून माझं मत मी तुला देतो.

ह्या पृथ्वीवरचा शक्तिशाली माणूस किंवा एखादा अगदी अभिमानरहित माणूस आपल्या जीवनातला उद्देश, समाधानपूर्वक आणि यश संपादून तेव्हा गाठू शकतो जेव्हा,तो ह्या तुमच्या चर्चेत आलेल्या शाश्वत गोष्टी आणि त्याच्या उपजाती याना घेऊन जीवन जगत असतो. आणि यदाकदाचीत जीवन जगत असताना ह्यातल्या काही गोष्टी आपल्याकडून वेगळ्या केल्या गेल्या तरी त्या हुडकून काढता येतात.”

आम्ही आमच्या गप्पा संपवून उठता उठता एका निर्णयाला आलो की,श्रद्धा,विश्वास आणि परोपकार हे गुण सूर्योदय-सूर्यास्ता एव्हडे,भरति-ओहटी एव्हडे,जुने आहेत.खरोखरच ते मनुष्य जातीसाठी चमत्कार करणारे आहेत.

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

2 Comments

  1. Posted मार्च 7, 2012 at 9:24 सकाळी | Permalink

    नेहमीप्रमाणेच हा पण अंतर्मुख करणारा लेख…

  2. Posted मार्च 7, 2012 at 9:52 pm | Permalink

    नमस्कार संजीवनी,
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: