अनीश्वरवादी शंकर सुर्वे.

 

“तरीपण मला सोडून गेलेल्या माझ्या मुलाच्या आत्म्याशी माझं पुनर्मिलन होईल अशी आशा बाळगणारा मी, कसला अनीश्वरवादी आहे हे माझंच
मला समजत नाही.”

शंकर सूर्वे आज कित्येक वर्षं मनोवैज्ञानीक म्हणून व्यवसाय करीत आहे.त्याचा सहा वर्षाचा मुलगा लुकिमिया होऊन गेला.शंकरचं मुलावर अतिशय प्रेम होतं.मी ज्यावेळी ही दुःखद बातमी ऐकली तेव्हा काळजीत पडलो.शंकर हा आघात कसा सहन करणार ह्याचंच मला लागलं होतं.मनोवैज्ञानीक असला तरी तो माणूसच आहे.त्याने आपली समजूत कशी करून घेतली असेल ह्याबद्दल मला उत्सुकता होती.मी ज्यावेळी त्याला भेटायला गेलो होतो त्यावेळी तो काय सांगतो ते निमूट ऐकून घ्यावं.स्वतः मनोवैज्ञानीक स्वतःच्या मनाला समजूत कशी घालतो ह्याचं मला कुतूहल होतं.

मला शंकर सांगायला लागला,
“गेली तीसएक वर्ष मनोवैज्ञानिक म्हणून काम करीत असताना,मला एक प्रश्न पडला आणि त्यातून मी एक शिकलो ते म्हणजे, जीवनात अगदी जवळच्यांचा मृत्यु किंवा तत्सम नुकसानी आणि विफलता आल्यानंतर माणूस ते सोशू शकतो याचं कारण काय बरं असावं?
आशा,आकांक्षा मनात बाळगून,असाह्यता आणि उत्कण्ठा ह्यापासून,आपला बचाव करावा लागतो कारण ह्याच गोष्टी आपल्या दुःखाला,खेदाला कारणीभूत असतात.काही लोक धर्माचा आधार घेऊन त्यांच्या आकांक्षा जीवनात सफल करण्याच्या प्रयत्नात असतात.आपल्या माथ्यावर दयाळू देवाचा मार्गदर्शक हात असल्याने आयुष्य सुखकर जाणार ह्या विचाराने ते सुस्थ असतात.

परंतु,माझ्या सारखे,कठीण प्रश्नांना सोपी उत्तरं सापडवून घेण्यात तयार नसणार्‍याना किंवा तशी तयारी ठेवण्यात इच्छा नाकारणार्‍याना,दुर्धर मार्गच उरतो आणि त्यामुळे जीवनात अनिश्चिततेत रहावं लागतं किंवा मुक्तिच्या क्षमते पुढे माघार घ्यावी लागते.

माझंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो.माझ्या सहा वर्षाच्या मुलाला झालेल्या लुकिमिया ह्या व्यथेवर उपाय म्हणून बोन-मॅरो ट्रान्सप्लान्ट करण्याच्या प्रयत्नात काही समस्या उभ्या राहिल्याने त्याला प्राण गमवावे लागले.मी त्याचा डोनर होतो.त्याच्या मृत्युशी दोन हात करताना,झालेले प्रयत्न ही मुक्तिच्या क्षमेते पुढे माघारच होती.स्विकार करणार नाही,समापन होऊ देणार नाही आणि विसरून नक्कीच जाणार नाही ह्या वृत्तिचं काही चाललं नाही.डॉक्टरांच्या प्रयत्नापुढे आणि डोनर म्हणून माझ्याकडून दिलेल्या बोन-मॅरोपुढे त्याला अपयश पत्करावं लागलं.

त्याला जीवदान मिळावं म्हणून मी केलेली प्रार्थना,हा एक निराशेचा प्रयत्न होता.माझ्या दृष्टीने मला सर्वात प्रिय असलेल्या माझ्या मुलाकरीता म्हणून माझ्या तरूण वयात धर्मावर भरवसा ठेवण्याच्या माझ्या आशेची त्यात भर झाली.जेव्हा तो गेला,ज्याच्या पेशीत अनियमीत परिवर्तन होत गेलं आणि त्याला तो बळी पडला आणि ते सुद्धा त्याचं शरीर अन्यथा सुदृढ असताना,माझा मात्र एक दृढविश्वास कायम झाला की,कुठचाच देव,जो अशी दुःखद घटना व्हायला कबूल होतो तो माझ्या विचारसरणीत एका क्षणाचाही चिंतन करण्यालायक नसतो.

अशा लोकांचा मी हेवा करीन की जे अशा प्रकारची दुःखद घटना घडूनही आपला विश्वास बाळगून रहातात आणि त्यातल्या हेतूचीही कल्पना करतात.
मला तरी ते शक्य नाही.तरीपण मला सोडून गेलेल्या माझ्या मुलाच्या आत्म्याशी माझं पुनर्मिलन होईल अशी आशा बाळगणारा मी, कसला अनीश्वरवादी आहे हे माझंच मला समजत नाही.”

मधेच शंकरला अडवून मी म्हणालो,
“अशा संस्कृतित आपण रहात आहोत की जिथे आपल्यावर अन्याय होऊ शकतो हा समझ व्यापक झाला आहे. प्रत्येक दुर्घटनेचा आरोप दुसर्‍यावर ढकलल्यामुळे आपला त्यात काय वाटा आहे हे शोधून काढणं दुरापास्त होत आहे.किंवा सहज म्हणून स्विकारणं की जीवनात विपत्ति येणं हे वास्तवीक आहे हेही समजणं व्यापक झालं आहे.”

मला शंकर म्हणाला,
“तुमचं शंभर टक्के बरोबर आहे.”
शंकर जरा गंभिर होऊन मला पुढे म्हणाला,
“जास्त करून जबाबदारी आपल्यावर न घेतल्याने,उपचारात्मक ज्ञान आपण घालवून बसतो.हे ज्ञान घालवून बसल्यामुळे आपल्याला काय होतं ते इतकं महत्वाचं नाही पण प्रतिक्रिया देणं महत्वाचं आहे अशी वृत्ति आपल्यात बळावते.

जेव्हा आपण अस्तित्वाच्या निरंतर आवर्तनाला अर्थ आणण्यासाठी काही कल्पना करीत असतो तेव्हा एकतर चिरस्थायित्वाचं वचन देणार्‍या धर्माची जोपासना करावी किंवा अज्ञेयवाद मानून आणि जे अविदित आहे त्याला समर्पण व्हावं. जसं- जीवन आणि मरण,स्वप्न आणि निराशा आणि अनुत्तरित प्रार्थनेचे मर्मभेदी चमत्कार.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: