अंतरातल्या नाना कळा…९

 

“स्वर आले दूरूनी
जुळल्या सगळ्या आठवणी”

एक दिवस म्हणजे ह्या आठवड्याच्या सोमवारी मी माझ्या पत्नीला भेटायला गेलो नाही.सुधार सेंटरच्या सांगण्याप्रमाणे तिला स्वतंत्रपणे राहून ती स्वतःच प्रोत्साहित होण्यासाठी मी तिच्यापासून दूर राहिलो.

आज मंगळवारचा दिवस उजाडला.सकाळीच माझ्या मुलीने कामावर जाताना मला सुधार सेंटरवर सोडलं.माझ्या मुलीला आणि मला पाहून माझी पत्नी खूप आनंदी झालेली दिसली.कालच्या सकाळी फि.थे.च्या लोकांनी तिला अन्य व्यायाम देऊन पॅर्ललबारवर काही पावलं चालवली.असं करताना तिच्या पायाचे स्नायु तिला साथ देत आहेत.आजची तिची प्रगति पाहून माझ्या आशा वाढल्या आहेत.
सकाळी भरपूर व्यायाम झाल्याने थकून,दुपारचं तिचं जेवण झाल्यावर, ती तिच्या बिछान्यावर झोपली आहे असं पाहून कॉरिडॉरमधे व्हिलचेअरवर बसून येरझर्‍या घालणार्‍या पेशंटना हलो-हाय करीत मी फिरत होतो.

यु.सी.बर्कलीमधे प्रोफेसर म्हणून काम करीत असलेल्या एका तरूण पेशंटची मला माहिती मिळाली.त्याच्या मेंदूवर वाढत गेलेल्या टुम्यरची सर्जरी एक वर्षापूर्वी केली गेली होती.परंतु,दुर्दैवाने त्याला नंतर स्ट्रोक आला आणि सुधार केंद्रावर सुधारण्यासाठी त्याला पाठवलं आहे.बिचार्‍याचे हात पाय थरथरत असतात.बोलणंही नीट होत नाही.ह्या सुधार सेंटरवर गेल्या एक वर्षापासून त्याच्यावर फि.थे.आणि स्पिच थेरपीचे उपाय करून अलीकडे तो वॉकर घेऊन चालण्याच्या परिस्थितीत येत आहे.ह्या तरूण प्रोफेसरचं उभं आयुष्य अपंगावस्थेत जाणार आहे हे पाहून मी सद्गदित झालो.

जीवन किती बिनभरवश्याचं असतं ह्याचा विचार येऊन माझं मन चलबिचल झालं.ह्या वातावरणात सध्या माझा वेळ जात असल्याने एक एका पेशंटकडे बघून ही चलबिचल प्रकर्षाने जाणवते.ह्या सेंटरवरचा सगळाच स्टाफ,सर्व पेशंटना आदराने वागवणारा,दयाशील,कामात कुचराई न करणारा,समर्पित होणारा असा आहे.नव्हे तर त्यांना तसली शिकवणूकच आहे .इकडच्या संस्कृतितच ते भिनलेलं आहे.सकाळीच ह्या सेंटरवर आल्या आल्या भेटेल तो ओळख नसलेलाही,
हलो-हाय,
हाव आर यू डुईंग टूडे,
हाव यु डुइंग,
हॅव अ गुड डे,
मे आय हेल्प यु,
अशा तर्‍हेचे उद्गार,योग्य काळवेळ बघून, सहजतेने काढत असतात.
“वचने किम दरिद्रता”
ह्या संस्कृत वचनाचं जणू बाळकडू घेतलेले हे लोक असावेत असं मनात येतं.ह्यांच्यात राहून आमच्यासारख्याना पण ह्या चांगल्या सवई लावून घ्याव्यात असं वाटतं.

फेरफटका मारून झाल्यावर पत्नीच्या खोलीत मी आलो.अजूनही ती झोपली होती.तिच्या चेहर्‍यावर उमेदीची छटा दिसत होती.मला माझ्या कवितेतल्या चार ओळी आठवल्या,

दिवस ते गेले कुठे
सांग ना! दिवस गेले कुठे
नजर सांगत होती प्रीतिच्या अनंत कथा
तरूण विश्व अन नव्हत्या कसल्या व्यथा
कठीण समयी निर्वाह केला कसा
सांग ना! निर्वाह केला कसा

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: