बंद दरवाजा

 

“केल्याने होते रे!
अन,
पाहिल्याने समजते रे!”

मला नेहमीच वाटत असतं की,
“प्रत्येक दरवाजा जो बंद केला जातो त्याचवेळी दुसरा कुठलातरी दरवाजा उघडला जात असावा”,
असा एक वाकप्रचार असायला हवा.

पुनर्सुधार सेंटरवर आल्यानंतर अनेक पेशंटना पाहून माझ्या मनात जो विचार आला तो विचार एक वाकप्रचार म्हणून ह्या वयस्कर झालेल्या आणि अपंग झालेल्या लोकांच्या समोर पुन्हा पुन्हा वापरला जावा असं वाटायला लागलं.
तात्पूरत्या उपचारासाठी आलेल्या लोकांविषयी मी म्हणत नाही.उपचारासाठी खूपच वेळ लागणार आहे त्या वृद्धांविषयी मी म्हणत आहे.

जीवनात अनेक दरवाजे कधी कधी मुद्दाम म्हणून तर कधी कधी नकळत भोळेपणाने बंद केले जातात.जीवनातले हे दरवाजे काहींच्या जीवनात वारंवार त्यांच्या तोंडासमोर धाडकन बंद केले जातात.त्यांचेच आईवडील,भाऊबहिणी,मित्रमंडळी त्यांच्याच समोर निर्वतले जात असताना किंवा त्यांच्या आयुष्यात ह्या लोकांचा सहभाग असतानाही असं होत असतं.काहींच्या आयुष्यात, अशा प्रकारची दुर्घटना किंवा मानसिक आघात,हा रोजचाच भाग झालेला असतो.

एकत्रीतपणे रहाणार्‍यांचं आणि दरवाजा बंद करायला उभे असलेल्यांचं एकमत होण्यासाठी क्वचितच हा दरवाजा सताड उघडा ठेवला गेलेला दिसेल.एकत्र कुटूंब स्थीर असणं हे काही लोकांच्या जीवनात क्वचितच होत असतं.बरेच लोक हा प्रकार स्थीर असावा म्हणून फारच उत्सुक्त असतात.

मी, ह्या सेंटरवर असणार्‍यांच्या म्हणण्याचा आढावा घेत असताना,माझ्या नजरेतून एक गोष्ट निसटून गेली नाही की,त्यांच्या रूममधे कुटूंबातल्या लोकांचे हवे तेव्हडे फोटो त्या कुटूंबात ते होते त्यांची आठवण म्हणू टांगलेले दिसायचे. आपल्या कुटूंबियाना अलिंगनात घेऊन काढलेल्या फोटोत दिसणारी माणसं त्यांच्या जीवनात कालांतराने आपआपल्या मार्गाने गेलेली असतात.

दरवाजा बंद करण्यासाठी उभ्या असलेल्या हा नातेवाईकांशी गुंथून राहिलेल्या ह्या अभागी लोकांचा दरवाजा उघडा झाल्यावर समोर दिसणारा मार्ग भावूकपणे रहाण्याची कल्पना देतो.पण ह्या दरवाजातून दिसणारा मार्ग नेहमीच तुम्हाला वाटत असाव्यात त्या भावूक कल्पनेंचा नसतो. उलटपक्षी काहीसा,रोष,नाराजी,दुःख,अपराध आणि परित्यक्तता ह्या गोष्टीपण दाखवणारा असतो.ह्या सर्व भावना सामान्यतः प्रदर्शीत करताना ह्या लोकांना मी पाहिलं आहे.

सरतेशेवटी,आपण अशा दरवाज्यापाशी येतो,की जो वृद्धावस्थेशी जुळता मिळता असतो.असला हा दरवाजा आठवणी सांगत असताना, त्या आठवणीत कटुता आणि मधुरता ह्याचं मिश्रण असतं असं प्रदर्शीत केलं जातं. हास्य-विनोद भरून असलेल्या,जेवणानंतर एखाद्या मधूर पदार्थांच्या थाळीने भरलेल्या,रात्री मागून रात्री झोप आणणारे,प्रेमाचे कडेकोट
बांधून मजबूत झालेल्या, अशा प्रकारच्या आठवणी वृद्धावस्थेत यायला हव्यात. परंतु,ह्या सुधार सेंटरवर मी अवलोकन केलेल्या वृद्धावस्थेतला आनंदोत्सव दाखवणार्‍या बहारदार आठवणी मुळीच दिसत नाहीत.त्यांच्या आठवणी, वर्षानूवर्षाच्या मनोव्यथेमुळे लवकर आलेलं वृद्धत्व चित्रीत करणार्‍या असतात.

ज्या तर्‍हेने ते वयाने वृद्ध होत असतात त्या तर्‍हेने रहाण्या ऐवजी हे लोक बरेचकरून जास्त वयस्कर भासू लागतात.इतर काही नशिबवान वृद्धांसारखं आनंदाने मश्गुल रहाण्या ऐवजी जीवनातला हा वास्तविक अध्याय आहे असं समजून ते रहात असतात.

प्रत्येक वाईट गोष्टीची चांगली गोष्टपण पीच्छा करीत असते.म्हणूनच एक दरवाजा बंद होत असताना दुसरा उघडला जातो.संधी घेण्यामधे मला विशेष वाटतं.प्रत्येक व्यक्तीला जीवनात यश मिळण्यासाठी समसमान संधी मिळायला हवी.

मला वाटतं,खडतर आयुष्य जगत असताना,वृद्धत्व आल्यावरही,मनोव्यथेतून,वेदनेतून,दुखावल्या गेलेल्या परिस्थितीतून जाताना त्यांना जे काही क्लेश झाले असतील त्यातूनही वर येण्याची क्षमता त्यांच्या अंगात असते.आपल्याला कुणीतरी मानावं ह्या मनस्थितीत ते असतात.

एखाद्याला दुःख झालं असताना त्याचा हात हातात घेऊन रहायला एखाद्याला का वाटावं?एखाद्याला दुखापत झाली असताना दुसरा सहज प्रवृति म्हणून त्याला आपल्याजवळ ओढून घेतो,त्याला भिडून बसतो,त्याला मिठीत घेतो.
जेव्हा मी लहान होतो तेव्हा, यदा कदाचीत चालताना पडून माझ्या गुडघ्याला खरचटलं गेलं की, माझी आई लगेचच मला जवळ घेऊन माझ्या खरचटलेल्या जागेची पापी घेऊन फुंकर घालून म्हणायची,
“पटकन बरं होवो”
एखाद्याची ही अगदी साधी कृती,छोटसं प्रेम दाखवून जाते आणि होणार्‍या वेदना त्यामुळे निवळून जातात.लोकाना स्पर्श हवा असतो.जरी तसं आजुबाजूला दिसलं नाही तरी त्याची जरूरी असते.एखादा सहज झालेला स्पर्श एखाद्याला जीवनभर सुखी करू शकतो.स्पर्श हा एखाद्या ठिणगी सारखा असून कुणाच्याही जीवनात भडका पेटवून देऊ शकतो. म्हणूच मला स्पर्शाच्या क्षमतेविषयी खास वाटत असतं.

 

माझी भावना अशी आहे की,प्रत्येक वृद्धाला आपलं कुटूंब असण्याची पात्रता असते.तसंच मला वाटतं की त्याला ह्या वयात स्वतःहून
जगाला सामोरं जावं लागू नये. खरोखरचं प्रेम आणि दया याचा अर्थ काय असतो ते समजायला ते पात्र असतात.शेवटी मला असंही वाटतं की,प्रत्येक वृद्ध, मोठं आणि सुंदर, स्वप्न पहाण्याच्या संधीला पात्र असतो.
उरलेलं आयुष्य जगताना,आशा आणि अनुभव समजून घ्यायला पात्र असतो.

ह्या सुधार सेंटरवर, माझ्या पत्नीच्या कारणाने मी आल्याने,आणि ते केंद्र ह्या लोकांना देत असलेल्या सेवेचा विचार करून मला वाटायला लागलं आहे की,हे केंद्र ह्या वृद्धांसाठी एक संकेतदीप झाला आहे.कारण प्रत्येक दरवाजा बंद झाल्यावर हा दुसरा दरवाजा अशा लोकांसाठी उघडला जातो.

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

Advertisements

4 Comments

 1. Posted एप्रिल 13, 2012 at 9:58 सकाळी | Permalink

  मला वाटत संसारिक जवाबदार्या संपल्यानंतर संसारातून मन काढून घेतलेले बरे. आर्थिक दृष्ट्या सबळ असले तर वृद्धाश्रम गाठणे कधीही चांगले. अपेक्षा भंगाचे दुख होत नाही, आणि अपेक्षा पूर्ण झाल्या तर आनंदच आहे. अजून मला त्या वयात पोहोच्याला खूप वेळ आहे त्यामुळे हे जमवण किती सोप किंवा कठीण असेल माहित नाही. पण तेच उपयोगी आहे अस वाटत. संसार संपल्यावर नाही तर सुरु होईल तेव्हापासूनच असा दृष्टीकोन ठेवलेला बरा

  • Posted एप्रिल 14, 2012 at 8:03 pm | Permalink

   संजीवनी,
   आपल्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे.

   “संसार संपल्यावर नाही तर सुरु होईल तेव्हापासूनच असा दृष्टीकोन ठेवलेला बरा”
   हा आपला विचार दूरदृष्टीचा आणि पोक्त आहे.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

 2. veena samant
  Posted एप्रिल 17, 2012 at 5:13 सकाळी | Permalink

  होय काका,

  अगदी खरय. आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ति अनूभवतो. तूमचा हा लेख म्हणजे दिपस्तंभ आहे. जीवनाचा प्रवास जर भूतकाळातील कटू आठवणीत न अडकता, वर्तमानाचा आनंद लूटत घालवला तर अशा सुधार सेंटर मधे जाण्याची वेळच येणार नाही.

  विणा

  • Posted एप्रिल 17, 2012 at 9:56 pm | Permalink

   विणा,
   मी तुझ्याशी एकदम सहमत आहे.
   तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: