अविच्या बाबांची खंत

 

अरगेड्यांचा छोटा अविनाश,त्याच्या बाल्कनीत उभा होता.खाली रस्त्यावरून त्याने त्याच्या बाबांना येताना पाहिलं.चटकन त्याच्या लक्षात आलं की आज फादर्स डे आहे.आपल्या बाबांना फुलं देऊन त्यांना हॅपी फादर्स डे म्हणावं असं मनात आणून तो मागच्या बागेतून फुलं काढून त्या फुलांचा गुच्छ बनवून बाबांना सरप्राईझ करावं असं मनात आणून खाली जायला निघाला.नंतर काय रामायण झालं ते मला एकदा अरगडे सांगत होते.मला म्हणाले,
“आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले “मूड” संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.”
असं सांगून फादर्स डे दिवशी आपल्या मुलाबरोबर झालेला प्रकार त्यांनी मला वर्णन करून सांगीतला.ते आठवून मला कविता सुचली.आज फादर्स डे असल्याने ती कविता आज आठवली,

 

वाटेत एका अनोळख्याला
जवळ जवळ आपटलो
“माफ करा”असे म्हणून मी
त्याच्या पासून सटकलो

“करा माफ”मला पण
म्हणत थांबला तो क्षणभर
औचित्याच्या वागण्याने
सुखावलो आम्ही दोघे वरवर

आपल्या घरी
स्थिती असते निराळी
लहान थोरासी चटकन
आपण वागतो फटकून

झाली त्यादिवशी एक गम्मत
होतो कामात मी दंग
चिमुकल्या माझ्या मुलाने
केला माझ्या एकाग्रतेचा भंग

“हो बाजूला”
म्हणालो मी वैतागून
गेला तो निघून
हिरमुसला होऊन
रात्री पडलो
असता बिछान्यात
आला विचार
माझ्या मनात
औचित्याच्या भारा खाली
अमुची रदबदली झाली
वागलो चांगले अनोळख्याशी
अशी समजूत करून
मी घेतली मनाशी

पाहता फुलांच्या पाकळ्या
पडल्या होत्या दाराशी
लाल, पिवळी अन निळी
खुडली होती
फूले त्याने सकाळी
आला होता घेऊन ती हातात
टाकण्या मला आश्चर्यात
आठवून तो प्रसंग पून्हा
वाटे मजकडून झाला गून्हा
जाऊन त्याच्या बिछान्याशी
जवळ घेतले मी त्या उराशी

पुसता फुलांच्या पाकळ्या विषयी
हसला तो मला बिलगूनी
बोले तो मज भारावूनी
“घेऊनी ती सर्व फूले
आलो होतो मी तुमच्याकडे
कारण आजच आहे “फादर्स डे”

मागूनी त्याची माफी
पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
चूक केली मी सकाळी तुझ्याशी

पुसून अश्रू माझे त्याने
हसून बोलला तो पून्हा एकदा
करतो प्रेम मी
तुमच्यावर सदासर्वदा

रहावे ना मला ते ऐकून
म्हणालो मी ही भारावून

आवडशी तू मला अन
मुकलो मी तुझ्या
आश्चर्याच्या आनंदाला
दिसलास सुंदर तू फुलांमुळे
होते सुंदर तुझे ते फूल निळे

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

6 Comments

 1. Posted जून 17, 2012 at 11:12 pm | Permalink

  Mast 🙂

 2. Posted जून 18, 2012 at 12:20 सकाळी | Permalink

  Barobarch lihil tunhi.. mala pan lahanpani asach anubhav aahe.

  Nidan tumhi tari yach vichar kelat he changl

  • Posted जून 18, 2012 at 7:42 pm | Permalink

   संजीवनी,
   वाचून मला बरं वाटलं.प्रतीक्रियेबद्दल आभार.

 3. leena
  Posted जून 26, 2012 at 4:24 सकाळी | Permalink

  खूप छान मनाला स्पर्शून गेली हि कविता


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: