लेकीची मिठी

लेकीची मिठी
माझ्या पत्नीचा आज शहात्तरावा जन्मदिन.गेल्या वर्षी ह्याच महिन्यात ती आजारी होऊन हॉस्पिटलात होती आणि नंतर दोन महिने नर्सिंग-होममधे होती.
वर्ष कधी निघून गेलं हे कळलंच नाही.तिच्या ह्या आजारामुळे आयुष्यातले बरेच नवे अनुभव पहायला मिळाले.
आज दिवस उजाडताच तिच्या लेकीने तिला कडकडून मिठी दिली आणि जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ते दृश्य पाहून माझे डोळे ओलावले.माझ्या पत्नीच्या मनात काय आले असावे ह्याचा विचार येऊन ही कविता सुचली.

आईचा सांगावा,

(पाहूनी तुझी ती प्रमेळ मिठी)

त्वरेने भरले माझे ऊर भारी
विचार आला माझ्या अंतरी
असावी तुजसम मुलगी एकतरी

केलीस सेवा अखंड दिवसभरी
कर्तव्याला जागलीस तू सत्वरी
कुठली आई अन कुठली मुलगी
विस्मित झाले मी क्षणभरी

पुन्हा वि़चार आला माझ्या अंतरी
आता तुच माझी आई खरी
शुभेच्छा ज्यांनी दिल्या मला
आहे मी त्यांची सदैव आभारी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

4 Comments

 1. Posted फेब्रुवारी 14, 2013 at 10:37 pm | Permalink

  असाच चिमुरड्या लेकीच्या प्रेमाचा अनुभव रोज घेत असतो. दिवसभरात कितीही रागावलो तरी रात्री झोपताना अलगद कुशीत येणारच हमखास. मुली असतातच बापाच्या खूप जवळ….कायमच. आणि मी एक भाग्यवंत.

 2. Posted फेब्रुवारी 15, 2013 at 6:03 pm | Permalink

  anuvina,
  वाचून बरं वाटलं.आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

 3. अमोल
  Posted फेब्रुवारी 20, 2013 at 7:43 सकाळी | Permalink

  तुमच्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  खूप दिवसानंतर आपले लेख वाचून छान वाटले

  • Posted फेब्रुवारी 20, 2013 at 7:01 pm | Permalink

   अमोल,
   शुभेच्छेबद्दल थॅन्क्स.प्रतिक्रियेबद्दल आभार


Post a Comment to अमोल

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: