नको ना जाऊ तू एव्हड्यात

 

अनुवाद (अभी ना जाना……. जयदेव)

तो:
नको ना जाऊ तू एव्हड्यात
घेऊ दे ना तुला भरून डोळ्यात

ही आत्ताच कुठे तू आलीस
आसमंत रमणीय केलीस
सुगंधी हवेतला आनंद घे जरा
नजरेतल्या नशेतून बहक जरा
संध्येला अस्तगत होऊ देत जरा
संयम मनावरी ठेवशील का जरा

घेऊ दे ना मला थोडा विरंगुळा
पिऊ दे ना नशेचा घोट गळा
दे ना वेळ गुजगोष्टी करण्यात
घे ना रुची काहीतरी ऐकण्यात
नको ना जाऊ तू एव्हड्यात
घेऊ दे ना तुला भरून डोळ्यात

ती:
तारे झगमगून उठले
दिवे चमकून उजाळले
बस,नको रे असा बोलू
नको रे, माझा मार्ग अडवू
अडुन राहिन मी जर अशी
सोडून तुला मी जाऊ कशी?
ऐकवशील तू तेव्हड्यात
नको ना जाऊ तू एव्हड्यात
घेऊ दे ना तुला भरून डोळ्यात

तो:
अधुरी आशंसा सोडूनी
अधुरी अभिलाषा सोडूनी
रोज अशी मग जाशी
कसं बरं हे निभावशी?

जीवनाच्या ह्या मार्गामधे
अपुल्या तरूण अंतरामधे
अनेक ठिकाणे येतील
आपणां दोघां पारखतील
नको ना जाऊ तू दुःखात
विनवीतो मी तुला प्रेमात
नको ना जाऊ तू एव्हड्यात
घेऊ दे ना तुला भरून डोळ्यात

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

Advertisements

4 Comments

 1. vgdvgd
  Posted जुलै 9, 2013 at 9:39 pm | Permalink

  Beautiful. Dhanyawad !! —- vijay dongre

 2. Bhausaheb Madhav Nimbalkar
  Posted जुलै 11, 2013 at 9:09 pm | Permalink

  On Wed, 10 Jul 2013 06:32:29 +0530 wrote >

  a:hover { color: red; } a { text-decoration: none; color: #0088cc; } a.primaryactionlink:link, a.primaryactionlink:visited { background-color: #2585B2; color: #fff; } a.primaryactionlink:hover, a.primaryactionlink:active { background-color: #11729E !important; color: #fff !important; }

  /* @media only screen and (max-device-width: 480px) { .post { min-width: 700px !important; } } */ WordPress.com

  shrikrishnasamant posted: ” अनुवाद (अभी ना जाना……. जयदेव)तो:नको ना जाऊ तू एव्हड्यातघेऊ दे ना तुला भरून डोळ्यातही आत्ताच कुठे तू आलीसआसमंत रमणीय केलीससुगंधी हवेतला आनंद घे जरानजरेतल्या नशेतून बहक जरासंध्येला अस्तगत होऊ देत जरासंयम मनावरी ठेवशील का जराघेऊ दे ना मला थोडा विरंगुळाप”


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: