भाऊ,मजा म्हणजे रे काय?

 

ज्याला जे आवडतं तेच करायला
कारण होतं ती मजा
मनात प्रसन्नता निर्माण होते
प्रसन्नतेने सुख निर्माण होतं
सुखाचा संदेश मेंदूला जातो
तेच केल्याने पुन्हा सूख मिळतं
ह्यालाच मजा म्हणावी का रे भाऊ?

ज्यामुळे जीवन कारणास्तव होतं
तीच मजा
मजा नाही तर मुद्दा नाही हेतू नाही
मजा नसेल तर समुद्रातल्या
हरवलेल्या शंखासारखे होई
मजेविना जीवनाला अर्थ नाही
ह्यालाच मजा म्हणावी का रे भाऊ?

मजा म्हणजे सुखावलेल्या भावना
मजा म्हणजे होणारी सनसनाटी
मजा म्हणजे सुखाची जाणीव
स्वारस्य नसेल तर मजा नाही
ह्यालाच मजा म्हणावी का रे भाऊ?

असेल स्वारस्य तर होईल मजा
नवे नवे खेळ खेळण्यातली मजा
शिकार करण्यातली मजा
असेल ही निघृण मजा
ज्याला त्यात मजा वाटत असेल
त्याला इतरांची पर्वा नाही
वाटतं त्याना ह्यात काही
चुकलं नाही
खरं आहे का रे हे भाऊ?

समस्या सोडवताना मजा येते
समस्या सुटल्यावर मजा येते
मनात राग आला असताना
मन निराश झालं असताना
आवडेल ते करायला
मजा येते
ह्यालाच मजा म्हणावी का रे भाऊ?

मेंदुच्या आत आणि बाहेर मजा असते
मेंदुला आव्हान द्यायला मजा येते
क्रिकेट खेळाय़ाला मजा येते
व्हिडीयो गेम खेळायला मजा येते
मजा अवती भवती असते
नाचताना मनात खळबळ माजली
म्हणजे मजा येते
मजे शिवाय सुटकारा नाही
खरं आहे का रे भाऊ?

मजा मजेसारखी असते
मजा म्हणजे सहानुभूतीयुक्त वाटणं
स्नेह असण्याचा भाव मनात येणं
मजा कुणावर लादता येत नाही
मजा म्हणजे सूख
मजा म्हणजे कुतूहल
मजेशिवाय आकर्षण नाही
आकर्षण नसेल तर आनंद नाही
मलाच मजा वाटल्यानंतर
दुसरा काय म्हणतो ह्याची पर्वा नाही
ह्यालाच मजा म्हणावी का रे भाऊ?

कुणाला पुस्तक वाचण्य़ात मजा येते
कुणाला लेखन करण्यात मजा येते
कुणाला चित्र रेखाटण्य़ात मजा येते
कुणाला नाचायला मजा येते
मजा म्हणजे भिती वाटून घेणं
तीस मजल्यावरून बंजी-जम्प मारणं
मूर्खासारखं केलं असं इतराना वाटणं
ह्यालाच मजा म्हणावी का रे भाऊ?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: