देवाजीचे उपकार झाले आजीला बनविण्य़ा

का कुणाष्टाऊक आज मला माझ्या आजीची आठवण आली.आजीबरोबर मी नेहमी देवळात जायचो.त्यावरून ही कविता सुचली

हात माझ्या आजीचा धरूनी
वाटे देवळातून यावे फिरूनी

लहान पडती पाऊले माझी
तशीच चाले माझी आजी

कधी न करे ती चालण्यात घाई
माझ्याच कलाने ती सदैव घेई

आवडे मजला आजी बरोबर चालाया
तिची न माझी नजर पडे फुले पहाया

बाबा अन आई करीती घाई कामावर जाण्या
माझी आजी घेऊन येई खाऊ मला भरविण्य़ा
देवाजीचे उपकार झाले आजीला बनविण्य़ा

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

2 Comments

  1. vgdvgd
    Posted ऑगस्ट 30, 2013 at 11:18 pm | Permalink

    Chhan ahe kavita !!!


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: