बिपी,टीपी आणि सेक्स

बिपी,टीपी आणि सेक्स

“सेक्स ही गोष्ट, सतरा वर्षावर,पंचवीस वर्षावर, पन्नास वर्षावर किंवा त्यानंतर,म्हणजे जर एखादा नशिबवान असेल तर,जीवनभर एकसारखी असत नाही.”

बिपी म्हणजे “बालक पालक” हा मराठी चित्रपट,टीपी म्हणजे “टाईम पास” हा दुसरा मराठी चित्रपट, हे दोन्ही चित्रपट अलीकडेच प्रदर्शीत झाले.दोन्ही चित्रपट प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे स्त्री-पुरूषातल्या वयक्तीक संबंधाविषयी विस्तार पूर्वक विचार अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात दिसतात.

बालक पालक चित्रपटात वयात येणारी मुलं,मुली आपल्या वर्तूळातल्या मित्रमंडळीत,ह्या संबंधाबद्दलच्या कुतूहलाचं परिमार्जन करण्यासाठी भीतभीत प्रयत्न करीत असतात. कलाविज्ञानाची जसजशी प्रगती होत चाललेली आहे तशी कुतूहलतेची सोडवणूक सुलभ होत राहिली आहे.त्यामुळे एखाद्या चित्रफिती मधून किंवा त्या विषयाच्या मासिकातून माहिती मिळणं अगदीच सोपं झालं आहे.त्यामुळे आईवडीलांकडून सोडाच पण अशा प्रकारच्या अन्य मार्गातून कुतूहलाचं परिमार्जन करण्यासाठी ही मुलं हरप्रयत्न करताना दिसतात.हे ह्या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.ह्या चित्रपटाचा इतर मराठी चित्रपटाच्या तुलनेत बराच धंदा झाल्याचं समजलं आहे.

त्यानंतर अलीकडेच आलेला टाईम पास हा चित्रपट.ह्या चित्रपटातला मुख्य विषय अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातून दाखवला गेला आहे. हीर-रांजा,लैला-मजनू,शीरी-फरहाद,अशा नावाच्या प्रेमीयुगूलांच्या जोड्यांच्या प्रेमकथा सांगून हाच विषय कळत नकळत सादर केला आहे.पण ह्या टाईम पास चित्रपटात अगदी शाळेत शिकणार्‍या मुलां मधील प्रेमाची कथा,शिक्षण घेण्याच्या उद्देशापलीकडे जाऊन,त्या नुकत्याच वयात येणार्‍या मुलांच्या स्त्री-पुरूष संबंधातली कुतूहलता “बिनदास” दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.फार प्रसिद्ध नसलेली अगदी साधीसुधी जोडी निवडून,अलीकडे वाट्टेलती माहिती मिळण्याच्या कलाविज्ञानाच्या प्रगतीच्या फायद्याचा आधार घेऊन, हाच विषय हाताळला गेला आहे.
ह्या चित्रपटाने म्हणे रेकॉर्डब्रेक होईल असा कोट्यानी रुपयांचा धंदा केला आहे.आणि ते सुद्धा मराठी चित्रपटात हा ब्रेक झाला आहे.अर्थात अलीकडचे कोटी रुपये म्हणजे पूर्वीचे लक्ष रुपये इतकी पैशा़च्या मौल्याची पातळी खाली आली आहे म्हणा.

मला हे सर्व,म्हणजे ह्या दोन चित्रपटाबद्दल, रघुनाथकडून कळलं.रघुनाथची दोन्ही मुलं अमेरिकेत स्थाईक झाली आहेत.
रघुनाथ मधूनमधून अमेरिकेत जाऊन येऊन असतो.आता त्याची नातवंडपण बरीच मोठी झाली आहेत.हल्लीच त्याची नात आणि तिची मैत्रीण भारतात आली होती. त्यांना रघूनाथने दोन्ही चित्रपट दाखवले असं तो म्हणाला.

मला अलीकडेच रघुनाथ भेटला त्यावेळी त्याच्या नातीबरोबर आणि तिच्या मैत्रीणी बरोबर ह्या विषयावर झालेली चर्चा मला समजावून सांगत होता.चित्रपट पाहून आल्यावर त्यावर चर्चा करण्याचं अमेरिकेत स्तोम असतं.रघुनाथच्या नातीची मैत्रीण अगदी उघडपणे सेक्स ह्या विषयावर बोलत होती.
रघुनाथ मला म्हणाला,
“ती मला म्हणाली,ह्या संबंधाना सरळ सरळ मी “सेक्स” असंच म्हणेन.हा तीन अक्षरांचा इंग्रजी शब्द,जो ऐकतो त्या कुणालाही, त्याच्या उत्तूंग भावना,मनोभाव आणि त्याचा अभिप्राय काय असावा ह्या विचाराने मंत्रमुग्ध करतो.

प्रत्येक पिढीतल्या लोकांना,ते विस्मयीत होतील असे स्त्री-पुरूष संबंधाचे आलेख प्रस्तुत केले जाऊन, नव्याने अनुभव घेणार्‍या प्रत्येक जोडप्याची सुरवात,एका वार्तालापाचं नवीन प्रारूप समोर ठेवलं जाऊन होत असतं.आणि ह्यातून स्पष्टीकरण केलं जातं,ते असं की आपण कठून आलो,आणि आपल्या गुप्तांगाचं आपण काय करावं.आपण प्रजनन करीत असताना आणि भावी प्रजा उत्पन्न करीत असतानाही “पक्षी आणि भुंगे” ह्यांना बघून आपण नेहमीच चक्रावले जात असतो.बरेच वेळा हे आकस्मिकपणे आणि आत्म-संशोधनाच्या अनिश्चिततेमुळे होत असावं.
चित्रपटातून,संगीतातून आणि चित्रकारा़च्या निरनीराळ्या रंगाने भरलेल्या तबकडीतून, ह्या संबंधाची नवनवीन प्रारूपं,एखाद्या धुरकट काचेतून पाहिल्यासारखी उपलब्ध केली जातात.सेक्स प्रबळ आणि सर्वव्यापी असलातरी,त्याबद्दलचा उचित वार्तालाप प्रचंड कोलाहलापुढे साफ-साफ श्रवणीय होत नाही.”

रघुनाथ मला म्हणाला,
“हे त्या मुलीचं स्पष्टीकरन ऐकून मलाही काहीतरी बोलावं असं वाटलं.माझा अनुभव सांगताना मी म्हणालो,”
“समाचार माध्यमातून किंवा खाजगीत जे क्वचितच चर्चीलं जातं,ते म्हणजे सेक्स आणि घनिष्ट संबंध, ह्याबद्दलची वास्तवता.ह्या गोष्टी,सूर्यास्तावेळच्या आभाळातल्या रंगासारखी नेहमीच प्रवाहित असतात आणि बदलत असतात.सेक्स ही गोष्ट, सतरा वर्षावर,पंचवीस वर्षावर, पन्नास वर्षावर किंवा त्यानंतर,म्हणजे जर एखादा नशिबवान असेल तर,जीवनभर एकसारखी असत नाही.सेक्स,काहीना पूर्ण भाकरी एव्हडा असेल तर काहीना भाकरीचा चतकोरा एव्हडा वाटेल.जसजसं शरीर किंवा देह म्हणा,थकत जातं, तसं त्यात बदल होत जात असतो,जसं पावसाळ्यात पाण्याने भरून वहात असलेल्या नदीचा प्रवाह,उन्हाळ्यात हीच नदी पाण्याआभावी कोरडी होऊन प्रवाहात क्षीणता आणते तसं होत असतं.म्हणूनच स्त्री-पुरूष संबंधातलं नातं सीमित असतं ह्याची समझ येऊन ते प्रशंसनीयही वाटत असतं.
सेक्स आणि त्या सेक्सचं आपल्या जीवनात असलेलं स्थान,त्याचं महत्व किंवा त्याची अप्रासंगिकता किंवा त्याचं प्रासंगिक स्वर्गसूख,ह्या असल्या गोष्टी,आपल्या जीवनात दूरवर संबंध प्रस्थापीत करण्याचं एक साधन असतं.एव्हड्या उण्या-पुर्‍या आयुष्यात ह्या गोष्टीचा अध्ययन करण्याचा आलेख बराचसा चढा असतो किंवा कदाचीत कधीच पोहोचण्याजोगा नसतो.”

उठता,उठता मी रघुनाथला म्हणालो,
“आपण सर्व स्त्री-पुरूष संबंधातून झालेली फलश्रूती आहोत.आणि ह्याबद्दल आपल्याला पूर्ण ज्ञान नसतं.आपण ह्या ज्ञानासाठी दुसर्‍या कुणाशीही सहभाग करूं न करूं. केव्हा कधीची ही अपरिमित आतिशबाजी अंधारत लोप पावेल किंवा अनपेक्षीतपणे त्यात एखादी परत ठिणगीही उडेल.बंद खोलीत जी गोष्ट केली जाते,त्याचा अर्थ सर्व काही किंवा काहीच नाही ह्यात परिणती होईल.किंवा दोन्ही गोष्टी होतील.आणि हे समजण्यासाठी आपण अनुभवलेलं जड श्वसन आपल्याला समजून घ्यावं लागेल.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: