दाजीबापू

म्हटलंच आहे नाही काय,”चांगल्या गोष्टी लहान लहान पुडीतून येतात.”

“दाजीबापू गेला” असं मला ज्यावेळी लिलूताईने सांगीतलं त्यावेळी मला खूपच वाईट वाटलं.दाजी तेंडूलकर हा माझ्या चुलतबहिणीचा नवरा.दाजीबापू आणि बुट्केपण हे अर्थाने इतकं एकमेकाला पुरक होतं की आमच्या बोलण्यात कुणाला उंचीने बुटका असल्याचं बोलायचं झाल्यास अरे तो उंचीने दाजीबापू आहे असं म्हटलं जायचं.पण दाजीबापूने ते म्हणणं त्याच्या कानावर आल्यावर त्याबद्दल कधीही विरोध दाखवला नाही.किंबहूना त्याने आपली उंची स्वीकारली होती.आणि लोकांच्या टिकेवर तो दुर्लक्ष करायचा.

माणूस निघून गेल्यावर त्याच्या जुन्या आठवणी मनात दाटी करतात.मला आठवतं, तो लहान असताना माझ्याजवळ आपल्या बुटकेपणाची खंत एकदा त्याने मला बोलून दाखवली होती.त्याची आज मला आठवण आली.

दाजीबापू मला म्हणाला होता,
“खरंच,मी काही इतका लहान नाही.मी फक्त थोडा बुटका आहे एव्हडंच.खरंतर बर्‍याच कारणामद्धे माझ्या उंचीच्या कारणाने मी खास आहे,विशेष आहे, असं मला वाटतं.मी दहावीत होतो आणि त्यावेळी माझी उंची चार फूट आठ इंच होती.हे कदाचीत आनुवांशिक असेल.किंवा तसं असणं हे आणखी काही कारणामुळे असेल.पण माझ्या आईवडीलांची उंची पण जरा कमी असल्याने ते आनुवांशिक असूं शकेल. पण त्याचा अर्थ माझ्या उंचीमुळे माझ्याबद्दल खास अनुमान काढावं किंवा मलाएव्हडं त्रस्त करावं, एव्हडं हैराण करावं, असं नसलं पाहिजे.हो, मी बुटका आहे म्हणून कुणाला काही फरक पडावा कां?

मी नव्याने जेव्हा शाळेत गेलो तेव्हा पहिल्याच ईयत्तेत माझ्या लक्षात आलं की मी बुटका आहे.मला वर्ग मित्र त्रस्त करायचे आणि त्यावेळी मला कळायचं नाही की हे असं का करतात.मी ती शाळा सोडली आणि दुसर्‍या शाळेत गेलो.आणि तर्क करा काय झालं ते.ख्ररं आहे,मला पुन्हा हैराण केलं गेलं.काही मला “बुटूक-बाय़ंगण”

म्हणायचे काही मला “शॉर्टी” म्हणू लागले.मी सतत विचार करायला लागलो की,लोक मला अशी नावं का ठेवतात. आणि हे ही माझ्या लक्षात आलं की माझे वर्ग सोबती मला उंचीत मागे टाकायला लागले.
मी पाचवीत एका दुसर्‍या शाळेत गेलो.तिकडे मला विचारायला लागले तू दुसरीतला विद्यार्था आहेस का? मी त्या शाळेत मित्र जमवायला लागलो तेव्हा असेच काही मला दूर ढकलायला लागले,माझ्याबद्दल अनुमान काढायला लागले.एखाद्याने माझ्या श्रीमुखात भडकावी इतकं मला वाईट वाटत असायचं.पण मी ठरवलं होतं की तुम्ही मला कसलाही त्रास द्या मी काही त्याचं उट्टं काढणार नाही.तुम्ही मला “बुटूक-बाय़ंगण” म्हणा “शॉर्टी” म्हणा किंवा “बुटूकला” म्हणा आणि ते कितीही वेळा म्हणा,बुटकं असणं म्हणजे काही वाईट गोष्ट आहे अशातलं नाही.असे अवमान होऊनही, क्रिकेटमधे आणि फुटबॉल खेळताना मला अमर वाटायचं.लहान शरीरामुळे आणि

माझ्यातल्या चपळतेमुळे मी जे काही करायचो ते साध्य झाल्यासाराखं वाटायचं.मला आठवतं मी फुटबॉल खेळत असताना माझ्या सभोवती समोरच्या पार्टीचे दोन खेळाडू असायचे की ज्यामुळे मी जे काही करीन त्यापासून संरक्षण व्हावं हा त्यांचा उद्देश असायचा. आणि इतकं करूनही ते काही मला अटकाव करू शकत नव्हते.
खेळ संपल्यावर मला धन्य वाटायचं की, माझ्यावर अटकाव आणण्य़ासाठी प्रतिस्पर्ध्याना कठीणच जायचं. नकारात्मक विचार माझ्या मनातून दूर व्हायचे.
सरते शेवटी मला असं लक्षात आलं की,माझ्यात बदलाव आणायला कुणालाही कठीण जायचं.मी बुटका होतो,माझ्याबद्दल अनुमान काढणं,मला हैराण करणं

म्हणजेच,”तू मला आवडत नाहीस” हे म्हणणं मला अस्वीकार्य होतं.मला वाटायचं दुसर्‍याबद्दलच्या अशा समजूती करून घेण्याच्या वृत्तीत एक दिवस बदल होईल आणि लोकं वाईट समुजूत करून घेण्य़ाचं टाळतील.

म्हटलंच आहे नाही काय,”चांगल्या गोष्टी लहान लहान पुडीतून येतात.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: