तुझा चेहरा विक्षीत्प होईल

आयुष्यभर कर्तव्य-परान्गमुख राहून,पश्चातापाचे ओझे पाठीवर मारून जगणारा, जीवनाच्या अखेरीस,गत-आठवणींच्या गर्दीचे काहूर मनात आणून डोळे पाणावून घेतो तेव्हा,

अनुवाद (करोगे याद तो, हर बात याद आयेगी)

करीशी प्रयन्त तू आठवायची
कतार लागेल हरएक आठवांची
थांबेल प्रत्येक लाट व्यतीत काळाची

हा चंद्रमा गत काळाचा दर्पण होईल
ह्या धुसर मेघामधे चेहरा विक्षीप्त होईल
उदासलेल्या वाटेने एखादी कथा ऐकवायची
करीशी प्रयन्त तू आठवायची
कतार लागेल हरएक आठवांची

कोसळता चिंबलेला श्रावण धुसर होईल
वितळत्या वातीतून अंतरात संदेह येईल
हात मेंदीचा पाहूनी आठव उजळायची
करीशी प्रयन्त तू आठवायची
कतार लागेल हरएक आठवांची

दिसे उजाड द्वार वळत्या वाटेवर
कुणाची प्रतीक्षा करी त्रस्त कटाक्ष
दूरवर जाऊनी नजर माघारी यायची
करीशी प्रयन्त तू आठवायची
कतार लागेल हरएक आठवांची

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: