चिडचीड,चिडवाचिडवी आणि “अकाली मृत्यूचा संभव”

सतत वाद घालत राहिल्यास “अकाली मृत्युचा संभव बळावतो.”

वसंताचा मोठा मुलगा अलिकडेच निर्वतला.अवघ्या पंचावन्न वर्षाचा तो होता.वसंताचं सान्तवन करायला मी त्याच्या घरी गेलो होतो.वसंता पंचायशी वर्षाचा आहे.ह्या
वयात अशा घटना घडल्याने कुणीही हताश होणं अगदीच स्वाभाविक आहे.पण वसंता खूप सावरला होता.वसंता मला ह्या मुलाबद्दल नेहमीच तक्रार करायचा.
“तो वाद घालतो,कुणाशी त्याचं पटत नाही.त्यामुळे त्याने स्वतःलाच एकटेपण आणून ठेवलं आहे.मी त्याला समजून घ्यायचो.मी त्याचा बापच होतो म्हणा.पण इतरांचं
तसं नाही. वगैरे,वगैरे.”

वसंताचं बोलून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“कुणीतरी संशोधन कर्त्याने म्हटलंय की,आपल्या जोडीदाराबरोबर,मित्रमंडळीबरोबर किंवा आपल्या आप्तांबरोबर सतत वाद घालीत राहिल्यास,विशेषकरून आपल्या 
मध्यकालीन आयुष्यात, अकाली मृत्युचा संभव बळावतो.पुरूष आणि जास्तकरून ज्यांना रोजगार नसतो अशांवर जास्त बळावतो. जवळच्या नातेवाईकांकडून होणार्‍या 
मागण्या आणि त्यांच्यामुळे वाटत रहाणारी चिंता हिच्यामुळे मृत्यूसंख्येत भर वाढण्याचा संभव असतो.

व्यक्तिगत,क्षमता आणि व्यक्तित्व, ह्यामुळे तणावाशी दोन हात करणं हे ही ह्या गोष्टीशी दुवा राखून असतं. मतभिन्नतेत हस्तक्षेप केल्याने,विशेषकरून ज्यांना रोजगार
नसतो अशांना,सामाजिक तणाव ज्यांच्यावर जास्त असतो अशांना,मृत्युचं प्रमाण नियंत्रीत करायला मदत होते.सततचा वाद घालण्याच्या वृत्तीमुळे, पुरू्षाला किंवा 
स्त्रीला अकाली मृत्यूचं भय सर्वसाधारण मृत्युच्या भयापेक्षा दुगणं तिगणं होऊ शकतं.”

“तुला हे कुणी सांगीतलं?.तू अगदी माझ्या मनातलं बोललास”
वसंता मला म्हणाला.

“माझा एक डॉक्टर मित्र आहे.तो अलिकडेच आर्मीतून रिटायर्ड झाला आहे. त्याच्याशी ह्या विषयावर बोलताना त्याने मला ही माहिती दिली”
मी वसंताला म्हणालो.
आणि वसंताला आणखी माहिती देत मी त्याला म्हणालो.
“मुलांकडून किंवा जोडीदाराकडून चिंतेची आणि मागण्यांची पातळी ज्यांच्या आयुष्यात जास्त असते,आणि जवळच्या नातेवाईकांशी ज्यांचा वरचेवर वाद होत असतो,
अशा लोकांना हृदयविकार आणि स्ट्रोक येण्याचा धोका जास्त असतो.उत्तम सामाजिक सहायतेचा समूह आणि त्याबरोबरीने व्यापक स्वरूपाचा मित्रगण असल्याने त्या 
व्यक्तिच्या प्रकृतीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो.अर्थात ह्या सर्वांचा,म्हणजेच सामाजिक परिस्थितिला अर्थ लावणं आणि त्याला प्रतिक्रिया देणं हे ज्याचं त्याचं 
व्यकित्व ठरवीत असतं. उच्चरक्तदाब आणि ह्रुदयविकारासंबंधाने येणारा धोका ह्या दोन शारीरीक अवस्था तणावाला कशी प्रतिसाद देते, हे ह्याबाबतीतली मृत्यूसंख्या का 
वाढते ह्याचं स्पष्टीकरण व्हायला मदत करते.

पुरूषांचा तणावाशी होणारा प्रतिसाद त्यांच्या शरीरात “कॉर्टीसॉल” नावाच्या द्रवाची पातळी उच्चतम करण्यात कारणीभूत होते आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीच्या प्रतिकूल
परिणामांची पातळी वाढवण्य़ात परिणीती होते.विशेषकरून जे पुरूष विना-रोजगार असतात,ते त्यांच्या मतभिन्नतेबाबत अतिसंवेदनशील असतात. 
मुलांकडून आणि जोडीदाराकडून वरचेवर होणार्‍या मागण्य़ा आणि त्याबद्दल वाटणार्‍या चिंता,ह्यामुळे सर्वसाधारण कारणांमुळे असणार्‍या मृत्यूच्या धोक्यात पन्नास ते 
शंभर टक्के वाढ होण्याचा संभव असतो.रोजगार असणार्‍यांपेक्षा नसणार्‍यांवर ह्याचा परिणाम जास्त असतो.स्त्री-जोडीदाराकडून होणार्‍या चिंता आणि त्यांच्याकडून 
होणार्‍या मागण्या ह्यामुळे पुरूषावर असुरक्षतेचा धोका जास्त संभवतो.एकटाच असेल तर त्यावर हा धोका कमी असतो.

अर्थात चिंता आणि वाद ह्यागोष्टी जीवनाचं एक अंगच आहे म्हणा.पण ज्यांच्या जीवनाता ह्यागोष्टी प्रकर्षाने सामील असतात त्यांना हा धोका जास्त असतो आणि त्यांना
सहायता मिळू शकते. अशा लोकांच्या जैविक मार्गात लक्ष घालून हे असं का होतं ह्याचं संशोधन केल्यास ते जास्त मनोरंजक झालं असतं.

कॉर्टीसॉल हा अंतस्र्ताव निर्माण होणं हे तणावाचं कारण असतं.ह्या अंतस्त्रावामुळे जी कार्य-शक्ति निर्माण होते ती स्नायुना स्फुरण देण्यासाठी उपयोगी पडते,जेणेकरून
शारीरीक संघर्ष करण्यात किंवा पलायन करण्यासाठी ती कार्य-शक्ति उद्युक्त करण्यात उपयोगी पडते.
असं हे होण्याचं कारण शरीरातल्या प्रतिकार शक्तिपासून आणि शरीरातल्या नैसर्गीक क्षमतांपासून,जशा रक्षण करण्याची क्षमता आणि शरीराची दुरूस्थी करण्याची क्षमता
असतात अशा क्षमतेपासून दूर राहून हा अंतस्त्राव आपलं काम बजावतो.खरं म्हणजे ह्याच क्षमता आपल्या शरीराची टिक-टिक सतत चालू ठेवीत असतात.”

“मुलांकडून किंवा जोडीदाराकडून चिंतेची आणि मागण्यांची पातळी ज्यांच्या आयुष्यात जास्त असते,आणि जवळच्या नातेवाईकांशी ज्यांचा वरचेवर वाद होत असतो,
अशा लोकांना, विशेषकरून मध्यकालीन आयुष्यात असलेल्या लोकांना,अकाली मृत्युचा धोका संभवतो.पण समजा एखाद्याचं बालपण फारच अस्थिर गेलं,त्याकाळात 
बरेच वाद झाले,आणि त्यामुळे अंगात क्षमता वाढली,त्यामुळे वादाचे परिणाम तणावात रुपांतरीत झाले पण,तणाव आल्यासारखं वाटलं नाही तर? पण जाऊदे परत 
ह्यावर वाद घालायचा नाही.
सामान्य ज्ञान वापरल्यास कळेल की,एखाद्या बाटलीत हा तणाव कोंबून ठेवला तर कधीतरी हे ओमफस होणारच.”
मी वसंताला जास्त स्पष्टीकरण देत म्हणालो.”

माझ्या डॉक्टर मित्राने मला आणखी महत्वाचा संदेश दिला तो मी शेवटी वसंताला सांगुन त्याचा निरोप घेतला
“कोणताही नकारात्मक तणाव कुणाच्याही प्रकृतीला हानीकारक असणारच.त्याचं कारण काहीही असो.ह्या तणावातून निर्माण होणारा तो अंतस्त्राव कमी करायला नियमीत
व्यायामाची जरूरी आहे हे नक्कीच. व्यायाम घेतल्याने,आणि अंतस्त्रावाचा परिणाम कमी झाल्याने, स्नायुंना स्फुर्ती मिळून संघर्ष किंवा पलायन करण्याची पाळी येते 
ती येणार नाही.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: