बाबीताईचा सुंदर चेहरा

“बाबीताईला हे ऐकून खूपच बरं वाटलं.कसलाच लेप न लावलेला त्यांचा चेहरा जास्त सुंदर दिसत होता.”

चेहर्‍यावर लावण्यात येणारे अनेक पद्धतीचे लेप विकणारा एक अति महत्वाकांक्षी गृहस्थ बाबीताईला समजावून सांगत होता की,प्रत्येकाच्या हयातीत त्याच्या चेहर्‍याने किती छटा उघड उघड दाखवाव्यात आणि किती छटा झाकून ठेवाव्यात.
त्याचं असं झालं, माझी मुलगी आणि बाबीताई अलिकडेच, मॉलमधल्या एका दुकानात काही वस्तु खरेदी करायला गेली होती.
मला बाबीताई म्हणाली,
“मला खात्री नव्हती की,एका विक्रेत्याबरोबर पारस्पारिक प्रभावाचा शेवट,एखाद्या शोध-प्रबंधाच्या प्रचाराशी साम्य होईल असा, वृद्ध होण्याची प्रकिया म्हणजे काय?,ह्याचंस्पष्टीकरण माझ्याकडून देण्यात व्हावा.जसं नेहमीच मॉलमधे गेल्यावर पारस्पारिक प्रभाव होत असतो आणि तो सुद्धा माझ्याशी, जो मी नेहमीच एक उपभोक्ताम्हणून एक लक्ष ठेवून बोलणारी आणि दुसरा तो एक विक्रेताम्हणून. संवादाची सुरवात झाली. अगदी सुरवातीला माझ्यात आणि त्याच्यात एक संवाद म्हणून साधी शब्दांची सरबत्ती झाली.
त्याने प्रश्न विचारले आणि मी माझी प्रतिक्रीया दिली.माझी धांदल होईल अशा पाच प्रश्नांची सरबत्ती होऊन धांधल उडण्यासारखं झालं.
“आज तुमच्या चेहरा कसा वाटतो?”
“ठीक”
“तुम्ही चेहर्‍यावर लेप लावला आहे काय?”
“काहीसा”
“तुम्ही कोणतं उत्पादन वापरता हे तुम्हाला ठाऊक आहे काय”
“अर्थात”
“मी जर तुम्हाला सांगीतलं की चेहरा उजळ करण्याचं आमचं हे उत्पादन ” fair and lovley सारखे प्रसिद्ध लेप” न लावता आमचा हा लेप लावून तुमचा चेहरा उजळ झाल्याचं दाखवता येईल.
“नाही दिसणार.मी तसं पूर्वी पण ऐकलंय”
” मला तुमची पाचच मिनीटं द्याल का तसा उजळ चेहरा करून मी दखवीन”
“बरं….”
माझ्या ह्या शेवटच्या उद्गाराने मी माझी अंतीम बारी हरले होते.माझ्या चेहर्‍याच्या एका लहानश्या भागावर निरनीरळ्या वाट्यांतून घेतलेले चेहर्‍यासाठीचे लेप लावायचं दाखवून,मला त्याने वृद्ध न दिसणारा चेहरा कसा असतो त्या इलाजाचं प्रात्यक्षीक करून दाखवलं.
खरंतर शेवटी काय दिसून आलं, त्याने इलाज न केलेल्या माझ्या पूर्वी्च्या चेहर्‍यावरच्या भागावर ओलसरपणाचा अभाव होता.माझ्या दूरदर्शितेतला अभाव,खरंतर,एव्हडाच होता की,आत्ता मी काय दिसते ते प्रकट करणारी माझी जीवनकथा,आत्ता शहरात स्थाईक होण्यापूर्वी कोकणातले जबरे पावसाळे आणि उन्हाळे सहन करीत असतानाचा शरीरात होणारा बदलाव सहन करून रहाण्यातला.
तसंच,वृद्धावस्थेत बदल होण्यासाठी माझ्यावर माझ्या DNAचं होणारं निर्धारण,आणि माझ्यात असलेले माझ्या पूर्वजांचे genes बरोबर घेऊन शहरातल्या नव्या वातावरणात पाऊल टाकून टिकवलेलं माझं अस्तित्व.
“नको, मला ह्या नवीन उत्पादानाची जरूरी दिसत नाही.”
मी त्याला म्हणाले.
आमच्या दोघांच्या शब्दांची सरबत्ती थोडावेळ टिकली.मी माझ्या शोध-प्रबंधाचं स्पष्टीकरण त्याला दिलं.
मी त्या विक्रेत्याला म्हणाले,
“माझ्या लोकप्रियतेचा व्यय जो मी करते तो,माझ्या स्वतःच्या अंतर्भागासाठी–आठवणींसाठी,द्दष्टिसाठी.बाह्य भागांसाठी,त्याच्यावरच्या त्वचेसाठी किंवा,त्याच्याशी संलग्न असलेल्या सुरकुत्यांसाठी नव्हे.
अर्थात,मी कदाचित म्हणू शकले असते की,
“तू यदापी माझ्या वयाचा झाल्यावर——”
पण मी त्यावेळी ठरवलं,की माझा पहिलाच दावा ठीक होता.
मी त्या विक्रेत्याचा निरोप घेताना,माझ्या मुल्यांचं अगदी स्पष्ट चित्र त्याच्या समोर ठेवून निघाले. आणि त्याच्याशी होणार्‍या त्या व्यवहाराला कसल्याच प्रमाणपत्राची मला जरूरी भासली नव्हती.अगदी साधी प्रमाणितता जी मला अगदी वास्तव वाटते—अशा तर्‍हेच्या स्पष्टतेने की,तुम्ही कोण आहात त्याचं प्रतिबिंब म्हणजेच,आपली हयात आपण कशी घालवली त्यातून दाखवता येते,तुमच्या चेहर्‍यावर तुम्ही काय झाकलं आहे त्यातून नव्हे.”
बाबीताईचं हे सर्व ऐकून झाल्यावर मी तिला म्हणालो,
” अलीकडेच मी एका लेखकाचं, ह्याच विषयावर त्याने, आपलं मत दिलेलं मला आठावतं.तो म्हणतो,
“आज बाजरपेठेतले सर्वांत यशस्वी उत्पादन आहे रंग उजळवणारी मलमे. हे केवळ निरुपयोगी नाही तर शारीरिक व मानसिक आरोग्याला घातक आहे. खरे सौंदर्य कृत्रिम रंगरंगोटीत नाही, तर शरीरसौष्ठवात आहे. महाभारतातील अप्रतिम लावण्यवती द्रौपदी कृष्णा-काळीसावळी होती; पण आधुनिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे निरुपयोगी उत्पादने बनवणे व जाहिरातबाजीतून हीच खरीदा असे पटवणे. साहजिकच गोरे बनवणाऱ्या मलमांचे उत्पादक उत्पादनाच्या दीडपट खर्च जाहिरातींवर करतात.”
बाबीताईला हे ऐकून खूपच बरं वाटलं.कसलाच लेप न लावलेला तिचा चेहरा जास्त सुंदर दिसत होता.
श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: