स्मिताचं स्फुंदन.

“माझ्या नवर्‍याबरोबर एकदा गैरसमज होवुन स्फुंदून-स्फुंदून रडण्याची घटना अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर माझ्याकडून घडली होती.”
बहुतांश,खासगी जागी अश्रू ढाळले जातात.पण सार्वजनिक जागीच तसं झाल्यास,खरं काय करावं हे, स्मिता मला धडपड करून सांगण्याच्या प्रयत्न करीत होती.
मला कद्यीही सकाळीच कांदेपोहे खायची तलफ आली की मी स्मिताला फोन करून तिच्या घरी जातो.गेल्या रविवारी तसंच झालं.दरवाज्यावरची बेल दाबल्यावर स्मिताच दरवाजा उघडायला आली.मी आत शिरताना ती मला म्हणाली विनय,तिचा नवरा, दिल्लीला कंपनीच्या कामाला गेला होता.
“तुम्ही हा पेपर वाचा”
असं म्हणून माझ्या हातात प्रहार हा पेपर दिला.
मी बालकनीत बसयाला गेलो.
“तुम्ही तोवर पेपेर वाचा कांदेपोहे तयार आहेत.फक्त गरम गरम चहा करते”
असं म्हणून माझ्या समोर स्टूल ठेवून ती किचनमधे गेली.

आम्ही दोघं भेटलो की कुठलाही प्रॉबलेम घेऊन त्यावर चर्चा करतो.आणि न चूकता चर्चेच्या शेवटी, स्मिता, मला काय वाटतं? ते विचारते.
मी प्रहारचा अग्रलेख वाचत होतो. मजकूर वाचताना मला हसू येत होतं.
चहा-पोह्यांची ट्रे आणून स्टूलावर ठेवताना स्मिता माझ्याकडे पाहून हसत होती.
माझ्या मनातला विचार मी तिला सांगीतला.
“काही म्हण स्मिता, आम्ही कोकणातले लोक जरा तोंडफटकळच आहो.ह्या अग्रलेखातला मजकूर वाचताना मला हसू येतंय”
“मी अग्रलेख वाचलाय.मला पण हसू आलं,पण आता मी हसले त्याला दुसरंच कारण आहे.
तुम्ही हसताना तुमच्या उजव्या गालावरची खळी पाहून मला आत्ता हसू आलं.आणि त्याचं कारण माझा बॉससुद्धा हसला की त्याच्याही उजव्या गालावर तुमच्या खळी सारखीच खळी पडते आणि ते पाहिल्यावर मला तुमची निक्षून आठवण येते.”
स्मिताने मला आपल्या हसण्याचं स्पष्टीकरण दिलं.
म्हणजे आज काय स्मित,हसणं ह्यावर आपण आज चर्चा करणार आहो की काय?”
मी ही हसतच स्मिताला विचारलं.
“नाही,नाही उलट आज आपण हसण्या ऐवजी रडण्यावर चर्चा करणार आहो.”
मनाचा निश्चय करूनच स्मिता बोलत होती.
“त्याचं कारण असं”
असं म्हणत स्टुलासमोर आपली खूर्ची ओढीत ती मला सांगू लागली.

“आमच्या कंपनीत माझ्याच बरोबर काम करणारी एक मुलगी,बाथरूममधे रडत असताना,मी तिला सामोरी गेले.प्रथम ती रडत होती हे माझ्या लक्षात आलं नव्हतं.

डोळ्यात काहीतरी किसपट गेलंय ते काढण्यासाठी ती आरशात डोकावून पहात आहे,किंवा कदाचित ती लिप-स्टीक लावित आहे असंच मला वाटलं.पण मी माझे हात धुवून जाताजाता सहज तिच्याकडे पाहिल्यावर,तिचे लाल झालेले डोळे आणि थोडासा सूजलेला चेहरा पाहिल्याचं माझ्या लक्षात आलं.
तसं पाहिलंत तर,एरव्ही,माझी आणि तिची कामावर असताना एकदोन वेळाच बातचित झाल्याची मला आठवतं.तशी ती तरूण वयाची,हळुवार बोलणारी,आमच्या कंपनीत नव्यानेच आलेली होती.आमच्या दोघांच्या कामाचा प्रकार वेगवेगळा होता.जवळ जवळ आम्ही एकमेकाला अपरिचीत होतो असं म्हटलं तरी चालेल.ती दुसर्‍या खोलीत काम करायची.
मी माझे हात टॉवेलला पुसत असताना मी तिच्याकडे आणखी निरखून पाहिल्यावर तिच्या डोळ्यातले अश्रू तिच्या गालावर ओघळताना मी पाहिले.मी अंमळ,दुसरीकडेच लक्ष दिलं.

सार्वजनिक ठिकाणी,भावना प्रदर्शित होताना आपण पहात असतो.
रस्त्यावरच्या एखाद्या कोपर्‍यात वाद घालताना लोकाना पहातो.जेवण्य़ाच्या टेबलावर मोठमोठ्यानं हसताना पहात असतो. खूप दिवसानी भेटल्यावर दोन व्यक्ती एकमेकाला अलिंगन देताना पहात असतो.पण दुःखाबाबतीत भावना,व्यक्तिगत असतात, खासगीत असतात. तुमच्या उशीत तुम्ही तोंड खपसून रडणं हा एक प्रकार झाला पण सार्वजनिक ठिकाणी रडणं हे अगदीच लाजिरवाणं वाटतं.
तश्या माझ्या सार्वजनिक ठिकाणी रडण्याच्या घटना आतापर्यंत बर्‍याच झाल्या आहेत.पण त्यातल्यात्यात लाज वाटण्याजोगा एक प्रकार अलीकडेच झाला होता.माझ्या नवर्‍याबरोबर एकदा गैरसमज होवुन स्फुंदून-स्फुंदून रडण्याची घटना अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर माझ्याकडून घडली होती.खूपच शरम वाटण्याजोगं झालं होतं.मला क्लेशकारक वाटत होतं.
ती गुरवारची धांदलीची रात्र होती.आजुबाजूला बरेच प्रवासी गाडीची वाट पहात होते.त्या प्रसंगी,त्या क्षणाला दुसरं काहीच नाही तर मला कुठेतरी नजरेआड व्हावं असं वाटत होतं.
आता, लेडीज टॉयलेटच्या घटनेकडे पहाता,त्या तरूण मुलीचा विचार केल्यावर,सहानभूती आणि पंचाईत ,ह्या दोघांच्या कैचीत सापडल्यासारखं मला वाटत होतं.मला कल्पनाच करवत नव्हती.सोमवारच्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास त्या मुलीच्या डोळ्यात अश्रू येण्यासारखं काय बरं घडलं असेल?.एक मन मला सांगत होतं,तिचं सान्तवन करावं.पण नंतर अंधेरीच्या प्लॅटफॉर्मवरची ती माझी रात्र आठवल्यावर,माझी पूर्ण खात्री झाली होती की,माझं जर का त्यावेळी कुणी सान्तवन करण्याचा प्रयत्न केला असता,तर अगोदरच झालेल्या माझ्या मानभंगात बरीच भर पडली असती.
परत मागे वळून पाहिल्यावर,मला सांगावसं वाटतं,मी त्या मुलीचं सान्तवन करून, तिच्याशी थोडीशी बातचीत करून, चांगल्या मनःस्थितीत आम्ही दोघं आपल्या मार्गाला लागलो असतो.ते न करता,माझे हात टॉवेलला पुसून, मी टॉयलेटच्या बाहेर आले.त्या क्षणाला माझी समजूत झाली होती की,तिच्या दुःखात तिला सोडून जाणं हेच जास्त तिच्या दृष्टीने हितकारक होतं.
पण यदाकदाचित माझं तसं करणं चुकीचं असतं तर?
तुम्हाला काय वाटतं ह्याबाबतीत?”

हे सर्व स्मिताकडून ऐकून झाल्यावर मी तिला म्हणालो,
“मला असं वाटत नाही की दुःख हे व्यक्तिगत असतं आणि ते इतरांपासून बंदिस्त असावं.मला वाटतं आपण अशावेळी कुणाचंही सान्तवन करावं.सान्तवन करण्यात कसलिच पंचाईत नसावी.उलट त्यात माणूसकी आहे.
आपण एखाद्याच्या दुःखात नाक खूपसू नये पण “तुला बरं आहे ना?मी तुझी काही मदत करूं का?”असं विचारावं.
एखादी व्यक्ती दुःखात असताना तिला दूरावल्यासारखं वाटत असतं.आपल्याकडून अशावेळी दूर्लक्ष झाल्यास तिला आणखी दूरावल्यासारखं वाटत असावं.
दुःख हे सर्वांनाच होत असतं.सार्वजनिक ठिकाणी आपण त्याचा सामना करूं शकूं हे कुणी सांगावं?.दुसर्‍याच्या दुःखात भागीदार न झाल्यास कसलं हे जीवन?.आपल्या जीवनातला असला अनुभव आपल्याला जवळ आणतो आणि आपल्याला एकाकी पडल्यासारखं वाटत नाही.”
माझं बोलणं संपल्यावर स्मिता मला म्हणाली,
“तुम्ही जे सांगता ते मला जास्त भावलं.ह्या पुढे अश्या प्रकारच्या प्रसंगाला मी जास्त जवळीक ठेवून वागेन”
असं म्हणून झाल्यावर स्मिताने आपले डोळे पाणावले होते.
मी तिला म्हणालो,
“स्मिता झालं ते होवून गेलं.इतकं हळवं मन करू नकोस”
आणि मी स्मिताला तिचे डोळे पुसायला तिला टीश्यु पेपर दिला.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: