सौंदर्य तूझे लाजवी चंद्रासि —-(कविता)

सौंदर्य तूझे लाजवी चंद्रासि

(अनुवादित)

डोलू लागले सारे आकाश
झडकरी येईल चंद्रमा उदयास
लुकलुकू लागले सारे तारे
पाहूनी डोलतान आकाश

येई चंद्रमा उदयासी
निरखेना कुणीही आकाशी
अवलोकन करिती सारे त्याचे
पाहूनी उदयाला येई शशि

फुल उमलेना,उपवन बहरेना
दीप जळेना, कसा मिटेल अंधकार
काळ्या कभिन्न रात्री आता
चंद्रमा येईल उदयासी

सौंदर्य तूझे लाजवी चंद्रासि
बैस जवळी माझ्या जराशी
चंद्र उदयासी येई जोवरी
तेजोमंडित रहाशील का तोवरी
काळ्या कभिन्न रात्री आता
चंद्रमा येईल उदयासी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: