हाताळणं म्हणजेच खात्री करणं.

“मला वाटतं ही परंपरा अगदी पुरातन काळापासून म्हणजे दगडाची उपकरणं बनविण्यापर्यंतच्या काळातसुद्धा माणूस एकमेकाला असंच दाखवीत असावा. आणि त्या वस्तूची उपयुक्तता कशी आहे हे अशातर्‍हेने समजावत असावा.”
संजीव हल्ली वरचेवर अमेरिकेला जाऊन येतो.या वर्षाची त्याची ही तिसरी खेप असेल.तिथून जाऊन आला की मला भेटायला नक्कीच येतो.कधी मी तो तिथून आल्यावर त्याच्या घरी जातो तर कधी तो माझ्या घरी येतो.गेल्या रविवारी तो माझ्याकडे सकाळीच आला होता.त्याला अमेरिकेला जाऊन इकडे आल्यावर आठ दिवस झाले होते.
नेहमी प्रमाणे गप्पा मारताना मला म्हणाला,
“ह्यावेळी मी तुम्हाला हायटेक किस्सा सांगतो.नव्हेतर हायटेक वस्तूचाच किस्सा सांगणार आहे.”
आणि पुढे सांगायला त्याने सुरवात केली.

“ऍपल कंपनीने नवीन आयफोन6 बाजारात आणला आणि त्याची विक्री करण्यापूर्वी त्याची माहिती देण्याचा कार्यक्रम केला.ते पहात असताना जमलेल्या सर्वांना एव्हडंच वाटत होतं की,त्या फोनला आपण एकदा स्पर्श करावा.हाताळणं आणि मग खात्री करणं, हे कदाचित पहाणं आणि मग खात्री करणं ह्या म्हणण्य़ाच्या पलिकडचं आहे असं माणसाच्या मनाला वाटत असावं.एखादी गोष्ट हाताळणं,म्हणजे काहीतरी विशेष असतं.ती हातात घेऊन उलट सुलट करायला द्यावी,त्या वस्तुच्या काही भागावर प्रत्यक्ष स्पर्श करायला द्यावा म्हणजेच एखाद्याने खात्री करून घ्यावी की, ती वस्तु उपयोगात येण्यासारखी आहे किंवा कशी.त्या विक्रित्याने आयफोन6चा एक नमुना गर्दीतल्या एका माणसाकडे दिला आणि त्याने हाताळल्यावर दुसर्‍याच्या हातात द्यावा असं त्याला समजावून सांगितलं.पण असं करण्यापूर्वी त्याने त्या आयफोन6ची पूर्ण माहिती लोकांना समजावून सांगितली.
ह्या प्रकारातून मी एक शिकलो की,त्या हायटेक कंपनीने बाजारात त्यांची नवीन वस्तू आणण्य़ाच्या कार्यक्रमात ती वस्तू माणसाच्या हातात नीट बसू शकते,ती वस्तू तो हातातल्या पंजात नीट हाताळू शकतो हे दाखवण्य़ाचा त्यांचा प्रयत्न होता. तो फोन अगदी अलीकडचाच होता आणि त्यांनी तो बाजारात आणलेला होता,तो स्मार्टफोन होताच शिवाय आणखी उपयुक्त ऍपस त्यामधे होत्या.त्याच्यात असलेल्या सॉफ्टवेअर पेक्षाही,त्याच्यात असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स पेक्षाही,त्या वस्तूची रोजच्या उपयोगात येण्यासाठी केलेली बनावट आपल्या हातात हाताळून पहाताना जमलेले लोक मंत्रमुग्ध झाले होते.
त्या नवीन आयफोनबद्दल दिली गेलेली माहिती ऐकून झाल्यावर जमलेले लोक इतके उताविळ झाले होते की आपल्या हातात घेऊन तो फोन केव्हा हाताळतो असं त्यांना वाटत होतं.
लोक तो फोन हाताच्या पंजावर चेंडू उसळावा तसा उसळून त्याचं वजन किती असावं ह्याचा अजमाव करीत होते.त्या फोनच्या कडेवरून,मागच्या भागावरून आणि आकर्षक दिसणार्‍या वरच्या भागावरच्या साच्यावरून आपली बोटं फिरवीत होते. फोन वरचं झाकण झटकन उघडून मग परत झाकण बंद करतान येणारी क्लिक ऐकत होते. आणि सरतेशेवटी जणू आपल्याला पसंत आहे असं भासवून आपल्या हातातून दुसर्‍याच्या हातात देत होते.

ऍपलचा हा नवीन आयफोन लोक कसे हाताळत होते हे पाहून कुठेही माणसाचा फोन सारख्या वस्तू हाताळण्याचा स्वभाव सारखाच असतो असं मला वाटलं.शेवटी तो फोन परत विक्रेत्याच्या हातात दिला गेला.”
हे सर्व संजीवकडून ऐकून झाल्यावर मी संजीवला म्हणालो,
“हा तुझा फोन हातळण्याचा किस्सा ऐकून आणि कोणतीही वस्तू हाताळण्याच्या प्रक्रियेच्या मागची तुझी भावना आणि तूझं मत ऐकून, मला माझ्या वडीलांची आठवण आली.एक छोटासा ब्रश माझ्या हाताच्या बोटाच्या अगदी पुढच्या भागावर धरून अगदी हलका रंगाचा थर कसा द्यायचा हे मला ते शिकवायचे.मला जेव्हा आमच्या कंपनीच्या वर्कशॉपमधे जाऊन एखादा खिळा लाकडात ठोकत असण्याचा प्रयत्न करीत असताना पाहून आमचा वर्कशॉप सुपरवायझर माझ्या हातून हा्तोडा आपल्या हातात घेऊन कसा सुरळीत खिळा ठोकायचा हे दाखवायचा.प्रत्येक कामगार एखादं उपकरण आपल्या हातात कसं धरावं ते दाखवून नंतर माझ्या हातात ते कसं धरावं हे दाखवायचा.मला वाटतं ही परंपरा अगदी पुरातन काळापासून म्हणजे दगडाची उपकरणं बनविण्यापर्यंतच्या काळातसुद्धा माणूस एकमेकाला असंच दाखवीत असावा.आणि त्या वस्तूची उपयुक्तता कशी आहे हे अशातर्‍हेने समजावत असावा.”

संजीवने मला उठता उठता सांगितलं.
“माझं सगळं ऐकून घेतल्यावर तुम्ही जे काही मला सागितलंत ते अगदी स्पष्ट शब्दात होतं.आणि मला आठवण करून दिलीत की,ही किती महत्वाची दृष्टी आहे जी आपण कधीकधी आपल्या ह्या डिजीटाइझ्ड जगात विसरून जात असतो.”
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: