अरे देवा! मुंग्याचमुंग्या.

“ह्या मास्याच्या उदरात्त असलेली पिल्लं आपल्या इतर भावंडांचा वापर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करीत असतात. याला गर्भाशयातलं भक्षण असं समजलं जातं.”

मोहन मोकाशाचा मुलगा एकदा मला अंधेरी मार्केटमधे भेटला.त्याचवेळी त्याने मला त्याचे बाबा मध्यंतरी खूप आजारी होते.त्यांच्या लिव्हरला सूज आली होती.औषधपाणी केल्यावर त्यांच्या लिव्हरची सूज कमी झाली.नंतर त्यांना कडक डायटवर ठेवलं होतं.बरेच शक्तिहीन झाले होते.आता बरे आहेत.तुम्ही कधीतरी त्यांना भेटायला आमच्या घरी या.बाबानाही बरं वाटेल.असं म्हणाला.
मोहन मोकाशी आणि मी एकाच संशोधन संस्थेत काम करायचो.तो गणिततज्ञ होता.त्यामुळे प्राणि,वनस्पतिसृष्टीची माहिती करून घेण्यात त्याला विशेष आवड नव्हती.
तो मला म्हणायचा,
“प्राणिसृष्टी ही नेहमीच सौहार्दपूर्ण असतेच आणि त्यात अस्पष्टता असतेच असं नाही.खरं सांगायचं झाल्यास ती सृष्टी भयावह असते.
माझा दहा वर्षाचा मुलगा खराच पशुविद्याविज्ञ होणार असं म्हटलं तर अतिशयोक्ति होणार नाही.पशु आणि वनस्पतिसृष्टी पाहून तो इतका मोहित होत्तो की,एखादा बट्बटीत डोळ्याचा बेडकासारखा प्राणी पकडून अगदी आपल्या छाती जवळ घेऊन कुरवाळीत त्याने घरी आणला नाही असं होणारच नाही.अशी एक वेळ होती की त्याचं हे ह्यासृष्टीशी मोहित होणं हे मला कौतुकास्पद वाटायचं.नव्हेतर स्तुत्य वाटायचं.”

नंतर तो पुढे म्हणायचा,
“काहिही कारण असेल पण माझी स्वतःची निसर्गाबद्दलची अभिरुचि जरा सिमीतच आहे.अळ्या आणि सोंडी असलेल्या लांब पायाच्या प्राण्यांच्या अस्तव्यस्त तथ्याऐवजी मी ह्या सृष्टीची अस्पष्ट कल्पितकथा ऐकण्याचं जास्त पसंती करतो.पण माझ्या मुलाचं तसं नाही.
एखाद्या काळ्याकुट्ट कोळ्याच्या अंगावर किती भाग आहेत ह्याचं स्मरण करण्याच्या त्याच्या क्षमतेची मी जास्त प्रशंसा करीत असायचो.प्राण्य़ांवर लिहिलेली पुस्तकं वाचण्याची त्याची रुचि मी पाहिली आणि त्याबद्दलचं त्याचं लक्षण पाहून मला वाटायला लागलं, मी ह्याबाबती त्याला प्रोत्साहन देत राहिलं पाहिजे.

मी मात्र नकळत ह्या सृष्टीबद्दलच्या माझ्याच ज्ञानात जास्त पुढे जात होतो.कारण त्यावळी मला त्या सृष्टीबद्द्ल जास्त कळायला लागलं होतं.मी माझ्या मुलाबरोबर अनेक वाचलेली पुस्तके आठवून, त्या विषयाचा किस काढून प्राणिसृष्टीबद्दल मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त ज्ञान मिळत गेलंय असं वाटत होतं.”

आता मोहनचा मुलगा खरोखरच एक पशुविद्याविज्ञ होऊन एका नावाजलेल्या युनिव्हर्सिटीमधे प्रोफेसर म्हणून काम करतो.
त्यादिवशी मी मोहनच्या घरी मोहनला पहायला गेलो होतो तेव्हा त्याचा मुलगा सूरेशही घरी होता.मोहन झोपला होता.विश्रांती घेत होता.मला सूरेश सामोरा आला.

इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर,
“सूरेश तूझं प्रणिसृष्टीबद्दलचं संशोधन कसं चाललं आहे”?
मी सुरेशला असं म्हणून त्याच्या आवडत्या विषयात बोलकं केलं.

“ही प्राणिसृष्टी एक मोठ्ठा कक्ष आहे आणि त्यात खर्‍या जगातलं परिदृष्य पाहून मी आवाक झालो आहे.”
मला सुरेश म्हणाला.
“तुम्हाला आवडत असेल तर मी मुंग्याबद्दल तुम्हाला सांगतो.तुम्हाला माहित आहे का ह्या मुंग्याबद्दल बर्‍याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यातली एक म्हणजे,
“गुलाम तयार करणार्‍या मुंग्या.”
ह्या मुंग्या इतर मुंगयांच्या वारूळावर हल्ला करतात.त्यातल्या मुंग्याना आपल्या तोंडाचा चावा घेऊन फरफटत आपल्या बरोबर घेऊन त्यांची अंडी पळवून नेऊन आपल्या वारूळात आणतात.त्या फरफटत आणलेल्या मुंग्यांकडून गुलाम करणार्‍या मुंग्यांना खाणं आणि खुराक द्यायला भाग पाडलं जातं.किती भयावह आहे हे.

तसंच शार्कमासा,म्हणजे ज्याला आपण मुशी किंवा मोरी म्हणतो ह्याबद्दल सांगता येईल. ह्या मास्याच्या प्रजनन संबंधी कहाणी भारी भयावह आहे.ह्या मास्याच्या उदरात्त असलेली पिल्लं आपल्या इतर भावंडांचा वापर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करीत असतात. याला गर्भाशयातलं भक्षण असं समजलं जातं.शार्क मास्याची आई असं होत असताना शेवटच्या दोन वाचलेल्या पिल्लाना जन्म देते.आणि जीवंत रहाण्यासाठी ह्या वाचलेल्या पिल्लाना आईपासून जन्म झाल्यावर लगेचच दूर जावं लागतं अन्यथा त्यांची आईच त्यांना भक्ष करते.”

आमचं बोलणं सुरू असताना मोहन जागा झाला आणि माझ्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसला.बराच अशक्त झालेला तो मला जाणवला.
“ह्या सर्व गोष्टी मी सुरेशच्या तोंडून पूर्वीच ऐक्लेल्या आहेत”.असं मोहन मला म्हणाला.
“मला हे सर्व नवीन ज्ञान आहे.आणि ऐकायला मजा येते.”
मी मोहनला म्हणालो.

“आताचं माझं मत मी तुला सांगू का?”
आपल्या मुलाकडे,सूरेशकडे,बघत मोहन मला म्हणाला.

“खरंच, ह्या प्राणिजगतातील ही अतिभडक उदाहरणं ऐकून माझी सहनशक्ति सिमीतच ठेवायाचा मी प्रयत्न करतो. पूर्वीचं मला आठवलं. त्यावेळी कधी कधी माझा मुलगा मला कोकिळ पक्षाच्या अंड्याच्या विनाशकारी सवयीबद्दल एखादं प्रकरण वाचायला सांगायाचा.त्याला मी सन्मानपूर्वक नकार द्यायचो.त्या ऐवजी जाळं विणणार्‍या कोळ्याचं एखादं प्रकरण वाचू का म्हणून मी त्याला विचारायचो.कोळी हा प्राणी स्वतः बुद्धीचतूर असून,ह्या निर्दयी जगतात,कसं सदय असावं, कसं शांत असावं हे स्वतःच्या वागण्याने तो कोळी एक उदाहरण दाखवतो.
मी माझ्या मुलाला त्यावेळी ठगवू शकत नव्हतो.त्याऐवजी मी माझ्या भ्रमाच्या कोशाचा प्रतिरोध म्हणून वापर करायचो. कारण मी जेव्हडं ह्या प्राणिजगताची ज्ञान मिळवायला जायचो तेव्हडी माझी पूर्ण खात्री व्हायची की मी ह्या प्राणिजगतात रहाण्यालायक नाही.
पण आता मला सुरेशबद्दल अभिमान वाटतो.त्याच्या लहानपणीच तो मला पशुविद्याविज्ञ होणार हे दिसत होतं.आणि ते खरं ठरलं. मला आठवतं मी तुला त्यावेळी सुरेशबद्दल सांगताना असं म्हणायचो तुलाही आठवत असेल.”

मी म्हणालो,
“हो,मला चांगलंच आठवतं.आपल्या लायब्ररीमधून त्याला आवडणार्‍या विषयावर तू बरीच पुस्तकं घेऊन जायचास.
“अरे,गणिततज्ञ तू तुला ह्या विषयावर कसलं स्वारस्य”?
असा मी तुला प्रश्न केल्यावर,मिस्कील हसून तू मला सांगायचास,
“माझ्या मुलाचं डोकं ह्याच विषयात आहे.मला जरी ह्या विषयात स्वारस्य नसलं तरी ते ज्ञान मिळविण्याची त्याची धडपड बघून मला रहावत नसायचं.मी त्याला प्रोत्साहन देत असायचो.त्याचेच परिणाम आज तो प्राणिसृष्टीच्या जगात तज्ञ म्हणून काम करतोय.”
उठता उठता मी दोघाना उद्देशून म्हणालो,
“तुम्हा दोघांमधे एखाद्या विषयावर,वर्णन करण्याची हातोटी,उपमा द्यायचं कसब आणि तुलना करण्याचं ज्ञान पाहून मीच खरा आवाक झालो आहे.”
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: