बेबनाव कसा मिटवला गेला.

“एकमेकाशी कसं बोलावं हे समजावून सांगण्याचं काम,मध्यस्थी म्हणून,दिनूने आयुष्यभर केलंय. लोकं एकमेकामधे गैरसमज बाळगून, एकमेकात बेबनाव कसा निर्माण करतात आणि नंतर मध्यस्थ्याच्या मदतीने, तो बेबनाव कसा सोडवला जातो हे ही दिनूने चांगलच आत्मसात केलंय.”
दिनू माझा भाचा.तो बरेच वर्ष परदेशी होता.युनोमधे तो नोकरी करायचा.पेशाने तो वकील होता.निवृत्त होऊन तो आता इकडे रहायला आला होता.

आम्ही रहायचो त्या बिल्डींगमधे एका मजल्यावर दोन कुटूंब समोरासमोर रहायची.आल्या दिवसापासून त्यांच्यात संघर्ष चालू आहेत.आम्ही ते मिटवण्याचे खूप प्रयत्न केले पण यश काही मिळालं नाही.बिल्डींगमधल्या इतर मंडळीनेसुद्धा अयशस्वी प्रयत्न केले.ह्या संघर्षातलं, एक महात्मे कुटूंब आणि दुसरं पवार कुटूंब.

असंच, एक दिवशी माझ्या घरी दिनू मला भेटायला आला होता.आमच्या गप्पा रंगल्या होत्या.त्याच्या बोलण्यातून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की दिनू संघर्ष मिटवण्यात प्रवीण होता.नव्हेतर युनोमधल्या त्याच्या कामातला ह्या कामाचा एक भाग होता.
मी त्याला गप्पांच्या ओघात म्हणालो,
“दिनू,आमच्या बिल्डींगमधे एक समस्या झाली आहे.आणि ती पण दोघांमधल्या संघर्षाची. तुझं कसब वापरून ही समस्या तू सोडवशील का?
तुझ्या युनोमधल्या कामाचा आणि ह्या आमच्या बिल्डींग मधल्या समस्याची तुलनाही करता येणार नाही.पण माझ्या घरचा माणूस तू आहेस असं समजून मी तुझ्याकडून जरा आपलेपणाने हे काम करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.गैरसमज करून घेऊ नकोस.”
मला दिनू म्हणाला,
“दुर्दैवाने अशा त‍र्‍हेचे संघर्ष,आपण काम करतो त्याठीकाणी, कुटूंबात,आणि शेजार्‍यात अगदी नित्याचेच असतात.पण आपण आपल्या समाजात, प्रभावी संपर्काला पारंपारिक मौल्य किंवा विचार दिलेला नाही हे मात्र तितकच खरं आहे.यश म्हणजे जिंकणं किंवा हरणं. आणि हिच उपमा एकमेकात बेबनाव तयार करायला कारणीभूत होते.
मी पुढच्या आठवड्यात मोकळा झाल्यावर तुझ्या मदतीला येईन.”

आणि त्यासाठी तो आज आमच्या घरी आला होता.तो येण्यापूर्वी त्यांने मला काय समस्या आहे हे विचारून घेतलं होतं आणि त्याच्या येण्यापूर्वी त्या दोघा कुटूंबाना भेटून पूर्व तयारी करायला मला सांगीतली होती ती मी केली होती.आज दिनू आल्यावर,तो आणि मी त्या दोघांच्या घरी गेलो आणि आमचा विचार त्यांना सांगीतला.

दोघांपैकी एकाच्या घरात तो बसला आणि दुसर्‍याला दिनूने त्या ठिकाणी बोलवलं होतं.सर्व काम होऊन झाल्यावर तो माझ्याकडे आला आणि आपण ही समस्या कशी सोडवली हे सांगताना दोन शहणपणाच्या गोष्टी पण सांगून गेला.
मला दिनू म्हणाला,
“श्री.महात्मे बोलावलेल्या वेळेच्या अगोदरच येऊन हजर होते.आणि ते बेबनाव सुटावा म्हणून जास्त उत्सुक्त दिसले.बोलणं लवकर सुरू व्हावं म्हणून उताविळ होते असं मला भासलं.
दुसरं कुटूंब होतं ते पवार कुटूंब.श्री.पवार जरा घुश्शात होते. हे त्यांच्या तोंडावरून दिसत होतं.त्यांचे जड भासत असलेले खांदे हे पण एक कारण, त्यांच्या रागाचा भाव तोंडावर आणून ते दाखवत होते.श्री.पवार बसले आणि बसल्यावर आपल्या हातांची घडी,छाती जवळ कवटाळून झाल्यावर खिडकीच्या बाहेर नजर टाकून होते.ह्या दोन्ही कुटूंबाबद्दल मला एव्हडीच माहिती होती की ते दोघं एकमेकाचे शेजारी म्हणून रहात होते. आणि त्या दोघाना संवाद साधण्यात प्रश्न उद्भवत होता.एव्हडीच मला माहिती आहे असं मी त्यांना भासवलं.
मी प्रत्येकाला हा त्यांचा समझोता करून घेण्याचा मानस आणि त्यासाठी येण्याचं कारण विचारलं.हे मी नेहमीच दोन्ही पार्टीना विचारत असतो.काही बाबींचा खुलासा करून घेण्यासाठी मी त्त्या दोघांना प्रश्न विचारून घेतले.खरा मामला काय आहे हे समजून घेण्यासाठी मी तसं केलं.माझी खात्री झाली होती की,त्यांच्या एकमेकातल्या संपर्क बाळगण्यामधेच खरी गोची होती.कधीही दोघांमधे काही गैरसमज उत्पन्न झाले की, एकमेकाशी संवाद साधण्या ऐवजी ते एकमेकावर अपमानित होण्यासारखे शब्द फेकित असायचे.एकमेकाला,काहीतरी अतिरंजित आणि विपरीत असं केल्याबद्दल दोष देत असायचे.ते दोघंही,अफवा पसरवित असायचे आणि चुगल्याही करीत असायचे.
प्रभावी संपर्क ठेवणं हे एक कसब आहे आणि ते कसब शिकतापण येतं.
जे बोललं जातं त्याकडे नीट लक्ष देऊन ऐकणं आणि दुसर्‍याला सांगताना निरनीराळ्या मार्गाने बोलून त्याला ऐकवणं ह्या दोन गोष्टी असल्या महत्वाच्या अवस्थेत अंतर्भूत असतात.जेव्हा आपण फक्त बोलायला आतूर असतो त्यावेळी दुस‍र्‍याला काय सांगायचं आहे त्याकडे लक्ष देऊन ऐकत नाही.
प्रभावी संपर्क होण्यासाठी,विशेषकरून जिथे बेबनाव असतो,त्यावेळी दोन्ही पार्टीनी,दुसर्‍याच्या बुटात पाय घालून पाहिलं पाहिजे आणि तसं करताना,समजूतदारपणा आणि वाद मिटवण्यासाठी प्रोत्साहित झालं पाहिजे.

तीन तासाच्या माझ्या ह्या वाद मिटविण्याच्या प्रयत्नात,मी, श्री.महात्मे आणि श्री.पवार ह्या दोघांना, एकमेकाशी बोलण्यासाठी दुसरा मार्ग आयोजित केला. एकमेकाशी तर्कसाध्य बोलण्याचा,आरोप-प्रत्यारोप न करण्याचा आणि समझोता साधण्याचा प्रयत्न होईल असं पाहिलं.आणि त्यात मी नेहमी प्रमाणे यशस्वी झालो.असंच आपण सर्वांनी केलं तर खरंच छान होईल.
दिनू खरंच यशस्वी झाला होता.ते शेजारी रहात होते त्या मजल्यावर आता पूर्ण शांतता भासत होती.

त्यानंतर लवकरातलवकर मी आमच्या बिल्डींगमधे पार्टी आयोजीत केली.दिनूसाठीच ती पार्टी होती.श्री.महात्मे आणि श्री.पवार यांची हजेरी डोळ्यात भरण्यासारखी होती हे सांगायलाच नको.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: