जेव्हा क्षमा लय भारी वाटते.

“जेव्हा माझ्या आईजवळ आपल्या जीवश्च मैत्रीणीला टाळता येण्याची बरीच कारणं असतानाही तिला क्षमा करण्य़ाचं तिने ठरवलं.”

“ज्या गोष्टींचे माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले आहेत त्या गोष्टीबद्दल,जशी मी वयस्कर होत जाईन तशी, माझ्या आईशी मी जास्त उपकृत होत जाईन.दात्रुत्व कसं दाखवायचं,आभार कसे मानायाचे,कष्ट घेत राहावं आणि कुणालाही समान आदर देऊन कसं वागवायचं,आणि अगदी अलीकडे कुणाला कशी क्षमा करायची ह्या गोष्टी प्रामुख्याने सांगता येतील.

माझी आई,मिशाल,हिने क्रीश्चन धर्मातल्या व्यक्तीशी,माझ्या वडीलांशी, विस वर्शापूर्वी विवाह केला होता.आम्ही आमच्या आईवडीलांची दोन भावंडं.माझा भाऊ रॉड्रीग्स आता इंग्लंडमधे स्थाईक झाला आहे.मी मात्र गोव्यात एका मोठ्या चर्चमधे नन होण्याचा मार्ग पत्करला.”

लुसी मला आपला पूर्व इतिहास सांगताना अशी सुरवात करून माझ्याशी बोलत होती.लुसीची आणि माझी ओळख फार जूनी आहे.माझी वहिनी मुळची गोव्याची.ती ज्यावेळी आपल्या माहेरी जायची त्यवेळी मी तिच्द्या बरोबर जायचो.मला गोवं खूप आवडायचं.शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी हटकून गोव्याला असायचो.माझ्या वहिनीच्या शेजारी एका घरात ही लुसी-रॉड्रीक्स फॅमेली रहायची.

“माझ्या आईचं,मिशालचं आणि फ्रान्सीसचं माझ्या वडीलांचं प्रेम होतं.ती दोघं एकाच क्रिश्चन शाळेत शिकायची. त्या प्रेमाला खतपाणी घालून त्याचं रुपांतर त्या दोघांच्या  लग्नात करण्यात माझ्या आईच्या मैत्रीणीचा, जेनीफरचा,खूप मोठा वाटा होता.जेनीफरपण माझ्या आईच्या शाळेत शिकायची तिथेच त्यांचीही मैत्री झाली होती.
मी दहा वर्षाची असताना आणि माझा भाऊ रॉड्रीक्स आठ वर्षांचा असताना माझ्या आईला,वडीलांनी सोडचिठ्ठी दिली.ते पिऊन यायचे,आणि घरी त्रास द्यायचे.माझ्या आईने त्यांना सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले.पण ती त्यात अयशस्वी ठरली.सोडचिठ्ठी मिळाल्यानंतर माझ्या आईने आपल्या मित्रमैत्रीणींचा आधार घेऊन,विशेषकरून जेनीफरचा आधार घेऊन, संसार चालवून आम्हाला मोठ्या कष्टाने वाढवलं.
जेनीफरचा नवरा ज्यावेळी निधन पावला त्यावेळी माझ्या आईनेच तिला भरपूर आधार दिला होता.त्याच्या निधनानंतर काही वर्षानी जेनीफर दिल्लीला तिच्या बहिणीकडे रहायला गेली.अधुनमधून जेनीफर माझ्या आईच्या चौकशीत असायची.नंतर बरीच वर्ष त्यांचा संपर्क राहिला नाही.

जेनीफरने माझ्या वडीलांशी,फ्रान्सीसशी, लग्न केलं हे आम्हाला कुणालाही माहित नव्हतं.माझ्या आईला सुद्धा.पण ज्यावेळी तिला ते कळलं तेव्हा माझ्या आईला मोठा धक्का बसला.ते स्वाभाविकच होतं.एकदा कधी जेनीफर आणि फ्रान्सीस गोव्याला आले होते.कुठल्याही पार्टीत,बॅन्केत,किंवा एखाद्या मॉलमधे एकमेकाला दिसण्याचासंभव आल्यास ती दोघं आईशी टाळाटाळ करायची.

गोव्यातल्या आमच्या छोट्याश्या गावात,सोडचिठ्ठी,काहीशी असामान्य होती.आमच्या समाजात त्याचे तरंग उठायचे.आमच्यासाठी खरोखरच तो दुःखदायी काळ होता.काही वर्षं निघून गेल्यावर,माझे वडील वारल्याची बातमी आमच्या कानावर आली.जेनीफर दिल्ली सोडून गोव्यात रहायला आली.माझ्या वडीलांचं निर्वतणं माझ्या आईने अनेक मार्गाने संभाळून घेतलं असतं.पण आश्चर्य म्हणजे माझ्या आईने आपणहून आपल्या जून्या जीवश्च मैत्रीणीशी संपर्क साधला.बरेच लोक आवाक झाले होते.

“असं का केलंस?” म्हणून अनेकानी माझ्या आईेकडे प्रुच्छा केली.
आईने त्यांना सांगीतलं,
“ती,म्हणजे जेनीफर,एकटी पडली असावी.आणि एकटेपण किती भयंकर असतं ह्यातून मी गेली आहे.”

हे माझ्या आईचं सांगणं ऐकून माझी सुरवातीची प्रतिक्रिया अशी व्हायची की,माझ्या आईच्या अशा वागण्याने ती स्वतःला अडचणीत आणित तर नाही ना?स्वतःला आतून दुखवून तर घेत नाही ना?पण माजी एक खात्री होती की माझी आई एव्हडी बावळट नव्हती,आणि त्या दोघ्या मैत्रीणीनी जुळवाजूळव करून घेतलेली पाहून,माझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

आपल्या मैत्रीणीला क्षमा करून,आणि भुतकाळाला विसरून,माझ्या आईने स्वतःला आणि आपल्या मैत्रीणीला भविष्यात एक चांगला मोका देण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावेळी त्यांच्याच इतर मैत्रीणी वृद्धत्वामुळे एकतर आजारी होत्या किंवा मरणाच्या पंथावर होत्या,अशावेळी ह्या दोन मैत्रीणी,ज्याला हिंदीत “फिरसे रोशन करना” असं काहीसं आपल्या जून्या मैत्रीबद्दल करीत होत्या.एकमेकाबद्दल किती आदर होता आणि मुळात आपण एव्हड्या जीवश्च मैत्रीणी का झालो ह्याचं स्मरण करीत होत्या.

एकएकटं राहून जेवण्या ऐवजी,ती दोघं अनेकवेळा एकत्र जेवत होत्या,गावातल्या डॉक्टरबद्दल बोलत होत्या, राजकारणावर बोलत होत्या,नव्हेतर ज्याच्याशी आपलं लग्न झालं होतं त्या व्यक्तीविषयीही बोलत असायच्या.मात्र हे एरव्ही अशक्य होतं.माझ्या आईच्या चलाख निर्णयाशिवाय हे अशक्य होतं.आणि ते म्हणजे मैत्रीणीला क्षमा करणं ह्याचं बळ तिने आपल्यात आणलं होतं.
हे मला पहायला विलक्षण वाटायचं.आणि मी मनोमनी ठरवलं होतं की,जर का असा प्रसंग माझ्यावर आलाच तर मी ही अशीच एखाद्याला क्षमा करीन.”

लुसीने सांगीतलेली आपल्या आईबद्दलची ही कथा ऐकून माझं मन अगदी व्याकुळ झालं.मी तिला म्हणालो,
“ही तुझ्या आईची कथा ऐकून मलापण तसा प्रसंग आल्यास मी ही तशीच एखाद्याला क्षमा करीन.खरंच तुझी आई एक उल्लेखनीय व्यक्ती होती.क्षमा करण्याच्या प्रक्रियेला हे एक उत्तम उदाहरण होईल.माणूसकी कशाला म्हणावी ह्याचं एक सुंदर उदाहरण होईल.तू मला हे सर्व सांगीतलंस त्याबद्दल मी तुझे आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत.”
माझा हात हातात घेऊन लुसी सद्गदित झाली.तिचा कंठ दाटून आला.तिने रुमालाने आपले डोळे पुसले,कारण तिला राहून राहून आपल्या आईची आठवण येत होती.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: