वॉट्सअप आणि वॉट्सऍप

वॉट्सअप म्हणजे रे काय भाऊ?

अरे,वॉट्सअप म्हणजे तो एक पश्चिमी देशात दोन व्यक्तीत संवाद साधण्य़ापूर्वी उच्चारलेला वाक-प्रचार आहे.हेलो आणि हाय ह्या ऐवजी हा वाक-प्रचारही वापरला जातो.

म्हणजे भारतात,दोन मराठी माणसं भेटल्यावर,
“काय कसं काय?” म्हणतात.
किंवा दोन गुजराथी माणसं भेटल्यावर,
“केम छो?” म्हणतात.
किंवा दोन हिंदी भाषिक भेटल्यावर,
“क्या हो रहा है?” म्हणतात
असं म्हटल्यासारखं का रे भाऊ?

अगदी बरोबर.वॉट्सअप हा वाक-प्रचार त्यांच्याकडे पूर्वापार आहे.

अरे,मग, वॉट्सऍप म्हणजे रे काय भाऊ?

अरे,स्मार्ट फोनवर संवाद साधण्यासाठीची एक ऍप आहे ती.

ऍप म्हणजे रे,काय भाऊ?

अरे,ऍप म्हणजे ऍप्लीकेशन.

म्हणजे ज्याला सॉफ्टवेअर म्हणतात ते का रे?

बरोबर.त्याला प्रोग्राम असंही म्हणतात.

मग,हे वॉट्सऍप अमेरिकेत जास्त लोकप्रिय का नाही रे,भाऊ?

अरे,तंत्रविज्ञान हेच दाखवतं की,त्याचा शिरकाव फक्त सामाजिक संबंध ठेवण्यासाठी,किंवा समुदायाच्या वर्तूळात अंतर्भूत होण्यासाठीच उपयोगी असतं.आणि जर का त्याला संस्कृतीचा पाया नसेल तर मग काय म्हणावं? तंत्रविज्ञान्याला संस्कृतीपेक्षा वरचढ राहून चालत नाही रे, बाबा!

भारत आणि ब्राझीलमधे हे वॉट्सऍप जास्त लोकप्रिय आहे.असं मला कुणी तरी सांगीतलं.खरं तर, ही ऍप अमेरिकेत स्थापित झाली.पण तिथे कुणीच कसं वापरीत नाहीत रे,भाऊ?

अरे,त्याचं कारण असं असावं की,आयमेसेजीस सर्वजणच वापरतात,अमेरिकेत आयफोन बराच लोकप्रिय आहे, त्यामुळे ह्या लोकांचं वॉट्सऍपशिवाय काम भागत असणार.

अरे भाऊ, वॉट्सऍप अमेरिकेत लोकप्रिय नाही म्हणून मला काही फरक पडत नाही रे.पण हे अमेरिकन्स मोठे व्यापार धार्जीणे आहेत.ह्याचाच अर्थ असा की,अमेरिकेत वॉट्सऍपचे व्यापारी प्रतिमान,तिकडच्या किंमतीवर किंवा व्यापारी नम्यतेवर फारसा परिणाम करणारं नसावं,असंच ना रे भाऊ?

अगदी बरोबर.अमेरिकेत स्मार्टफोनचं वापरणं लोकसंखेच्या 64% आहे.आणि सर्व स्मार्टफोनवरून त्यांना मेसेजीसची देवाण-घेवाण करता येते.त्यासाठी त्यांना नवीन ऍप अपलोड करायला नको.भारतातल्या स्मार्ट्फोनवर वॉट्सऍपची ऍप मुळातच अपलोड केलेली असते.त्यामुळे त्यांना ती जवळ जवळ फुकट वापरता येते.पण संवादसाधण्यासाठी एकमेकाने त्या ऍपचा वापर करायला हवा.हे मला प्रो.देसाईनी सांगीतलं.
कुठचीही गोष्ट फुकट मिळाल्यावर त्याचा वापर करण्याचा माणसाचा कल असतो.ती कुणाही माणसाची वृत्ती असते.असंही प्रो.देसाई पुढे म्हणाले.

आपल्या दोघांकडेही स्मार्टफोन नाही.त्यामुळे आपण ह्या विषयावर चर्चा उगाचच करतो नाही का रे भाऊ?

अरे,आपल्याकडे नसलेल्या गोष्टीकडे कुतूहल म्हणून बघण्याचीही माणसात मनोवृत्ती असतेच ना? मग कशाला रे,वाईट वाटून घेतोस.?
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: