14 ऑगस्ट

“वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा
पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा”

आज मी 82 वर्षाचा झालो.शरीर जरी थकत असल्याचं खुणावत असलं तरी मन अजून टवटवीत आहे.लिहिताना हात जरी कापत असले,(just kidding)तरी मन स्वस्थ बसू देत नाही.शरीराच्या आणि मनाच्या विचाराच्या मंथनातून निर्मिती झाली त्या निर्मितीचा परिपाक खाली दिला आहे.
कसे उमजले नाही मला
आज झालो मी 82 वर्षाचा
असेल मन माझे रेंगाळत
समजूनी मला 28 वर्षाचा

भूक,तहान अन इच्छा आकांक्षा
अजूनी आहेत जशाच्या तश्या
वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा
पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा
आज जन्म घेतो तो उद्या वृद्ध होतो
आज सुपात हसतो तो उद्या जात्यात रडतो
कठोर दंडक आहे हा निसर्गाचा
पराधीन आहे पुत्र मानवाचा
शोधीला मार्ग निरोगी जीवनाचा
दोन मैल नित्य चालण्याचा
आहार मोजकाच खाण्याचा
थोडी तरी विश्रांती घेण्याचा
उपाय हा निरोगी शरीरावरचा
इंटरनेट नित्य चाळण्याचा
फेसबुकावर लाईक टाकण्याचा
ट्वीटरवर प्रतिसाद देण्याचा
इमेलवरून संपर्क साधण्याचा
वाचण्याचा अन लिहिण्याचा
उपाय हा निरोगी मनावरचा
जन्म-दिवस आहे म्हणूनी
दुवा मिळेल शुभेच्छांचा
खचित होईल माझ्यावरती
उचित परिणाम मनःशांतीचा

शुभेच्छा देणार्‍यांचे आभार आणि न देणार्‍यांचेही आभार.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

2 Comments

  1. Posted ऑगस्ट 18, 2015 at 2:18 सकाळी | Permalink

    Million Good wishes as you
    stand on 82 nd mile stone !!!!

    VIJAY 9850717676 PUNE


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: