खरे पृथ्वीचे वारसदार.

“मनुष्यप्राणी हळुहळू सुसंस्कृत बनण्याच्या प्रयत्नात आहे.”
मी प्रो.देसायांना म्हणालो.

अलीकडे मी प्रो.देसायांशी चर्चा करीत होतो.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे,मनुष्यप्राणी हळुहळू र्‍हासाकडे सरकत आहे.चांगल्या अवस्थेपासून दीन अवस्थेकडे जात आहे.मी त्यांच्याशी सहमत झालो नाही.आणि ह्यावेळी त्यांची थोडी फिरकी घेऊन त्यांचं म्हणणं समजून घेण्यासाठी त्यांना थोडं बोलकं करावं ह्या उद्देशाने,
मी त्यांना म्हणालो,
“मनुष्यप्राणी, इतर प्राणी व्यवस्थेत डोकावून पाहिल्यावर, अपरिहार्य परिस्थिती पाहून उलट सुसंस्कृत व्हायचं पहात आहे. असं मला वाटतं. अधिक ज्ञान मिळण्याची भूक,चांगुलपणा आणि सत्याचा पाठपुरावा ह्या गोष्टींचा ध्यास लावून प्रत्येकजण आपल्याकडून होईल तेव्हडं देण्याची पराकाष्टा करीत आहे. पुर्वकाळापासून,आपल्यात समजुतदारपणा आणि चांगुलपणा होता.दयाळू कसं असावं,दुसर्‍यावर प्रेम कसं करायवं,सत्याचा पाठपुरावा कसा करावा,ज्ञानाच्या चौकशीत कसं रहावं, पक्षांच्या गुंजनातून सौख्य कसं घ्यावं,किंवा ऊंच डोंगराकडे बघून आभाळाशी तुलना कशी करावी ह्या गोष्टीत तो रस घ्यायचा. त्यानंतर आपल्याच सरकारने आपल्या समस्येत न्याय कसा द्यायचा, सर्वानी मिळून-मिसळून रहाताना जीवन अर्थपूर्ण कसं जगायचं,आपल्याच चुकाना आपण सामोरं कसं जायचं ह्या बाबींचा विचार होत असताना त्या आपल्यात संभाळून घेऊन त्या प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा त्याने सराव केला.

ही सुसंस्कृतपणे रहाण्याची आसक्ती माणसात कशी आली ह्याबद्दल मला परिपूर्ण माहिती आहे असं मी मुळीच म्हणत नाही. मनुष्यप्राण्यातल्या कोणा एका पंथाची किंवा जातीचा हा मक्ता आहे असंपण मी म्हणत नाही.मला एखाद्याच घटनेमुळी साक्षात्कार झाला असंही म्हणत नाही.माझ्या मनात ही एक श्रद्धा राहून गेली आहे असं मी म्हणतो.”
माझं हे सर्व ऐकून प्रो.देसाई थोडा विचार करून मला म्हणाले,
तुम्हाला एक मान्य करावं लागेल की,मनुष्याची सुसंस्कुत होण्याची गती बरीच मंद झाली आहे.आणि ती भक्कमपण राहिलेली नाही.बर्‍याच देशातली जनता,स्वतःच्या भयगंडामुळे व्यवस्थेबाबत उघड उघड संताप व्यक्त करायला कचरत आहे. ज्यांनी,अन्यायकारक वागून,स्वतःसाठी सत्ता काबिज करून,ते वर मान करून जीवन जगत आहेत,अशा लोकांकडून ही जनता शांती आणि स्वास्थ्य मिळण्यासाठी याचना करताना दिसते.
परंतु,मी जरका जास्त चिकित्सक होऊन डोकावून पाहिलं तर,मला एक गोष्ट आढळून येतं की,जे लोक सर्वांच्या फायद्यासाठी ज्ञान मिळावं म्हणून झटत असतात,जे लोक स्वतःच्या लाभाची आशा नकरता आपल्या देशात पक्की व्यवस्था असावी म्हणून मेहनत घेत असतात,जे लोक,आपल्या स्तुती साठी अथवा मालमत्तेसाठी नव्हे तर इतरांच्या स्वातंत्र्यासाठी, मुक्तीसाठी प्राण पणाला देऊन झगडत असतात असे लोकही माझ्या पहाण्यात आले आहेत हे मी मान्य करतो.”
त्यांचं हे बोलणं ऐकून मला एक गोष्ट आठवली.
मी प्रो.देसायांना म्हणालो,
“मला आठवतं,एकदा माझा मित्र त्याच्या मित्राची गोष्ट सांगत होता. त्याचा मित्र खेड्यात रहात होता. त्या मित्राने मित्राला खेड्यात येऊन जाण्याचा आग्रह केला होता. म्हणून तो त्याच्या खेड्यात गेला होता.डोंगराच्या पायथ्याशी त्याचं खेडं वसलेलं होतं.ते पाहून त्या खेड्यातल्या मित्राला तो म्हणाला,
“मित्रा, हा एव्हडा गाव वसवायला लोकांना खूप कष्ट घ्यावे लागले असतील नाही काय?”

“कुणी जरी काही घडवत असेल किंवा बांधत असेल तर त्याला कष्ट म्हणणं योग्य होणार नाही.” त्या खेड्यातल्या मित्राने त्याला सहजच उत्तर दिलं.
मला त्या खेड्यातल्या मित्राचं उत्तर आवडलं.
खेड्यात एखाद्या डोंगराच्या पायथ्याशी,एखादं घर,एखादं शेत बाधांवं.सर्वांना हितकारीक होईल असा शेजार स्थापन करावा, हळुहळू कायदे तयार करावेत आणि हे असं करीत असताना एक चांगला सुसंस्कृत समाज तयार होईल.ज्याला अंत नाही असा एक मार्ग तयार होईल.असं मला वाटतं.असं करणार्‍याना त्यांच्या मनात ते कसलाच संघर्ष आणित नसावेत. मनुष्याचं जीवन जरी तुट्पुंजं असलं तरी मनुष्य जातीची वृद्धि अनंत काळ होत रहाणार.
“असे हे विनम्र लोकच पृथ्वीचे वारसदार असतात”
असं कुणीतरी म्हटलंय हे अगदी सत्य आहे.

माझं म्हण्णं त्यांना पटलेलं मला भासलं.
“मी तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे असं ते मला म्हणाले जरी नाहित तरी त्यांचा चेहरा सांगत होता हे नक्कीच.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: