नैतिक जीवन आणि इष्ट अखेर

“अर्थपूर्ण जीवनाला अगदी खरा आधार असतो तो एखाद्या विचाराच्या अनिर्बंधद परमार्शाचा.ह्या म्हणण्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे.”–माझी नात.

त्याचं असं झालं,त्या दिवशी मी प्रो.देसायांबरोबर तळ्यावर गप्पा मारताना वरील वाक्याचा संदर्भ देऊन त्यांचं ह्या म्हणण्यावर काय स्पष्टीकरण आहे असं मी विचारलं.
पण लगेचच मी त्यांना म्हणालो हे म्हणणं माझं नाही माझ्या नातीचं आहे. अलीकडची पिढी, आपल्यापेक्षा जरा स्पष्ट विचाराची आहे.आणि कुणाशीही संवाद साधताना कसलीच भिड न बाळगता ही मंडळी विचारणा करतात.मला त्यांच्या ह्या सवयीचा आदर वाटतो.

ज्यावेळी माझ्या नातीने मला तिचा असा विचार सांगितला तेव्हा मला माझ्या कुमारवयाची आठवण आली.माझ्या कुमारवयात, माझ्या त्या वयात,माझ्या मनाची खूपच घालमेल व्हायची.माझ्या वडीलांची ज्या ज्या गोष्टीवर श्रद्धा आहे ती त्यांनी मला बोलून दाखवली असताना त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा? की मी त्यांच्याकडून स्पष्टीकरण घ्यावं?.असा मनात विचार यायचा.त्यावेळी मलाही आता कुमारवयातल्या माझ्या नातीसारखाच प्रश्न पडायचा पण मला माझ्या वडीलांना विचारायचं धारीष्ट होत नसायचं जे आता माझ्या नातीत आहे.

ती मला म्हणाल्याचं आठवतं,
“माझ्या मनाची खात्री झाली आहे की,एखाद्या गोष्टीचा अनिर्बंध परमार्श घेणे हा नुसता हक्कच नाही तर ते एक कर्तव्य आहे.एव्हडंच नाही तर जर कुणीही चोख जीवन जगत असेल तरच ते त्याला शक्य आहे. परंतु, एखाद्याचं स्वतःभोवती केंद्रीत असलेलं जीवन असेल किंवा एखाद्याचं थोडंसं अघळपघळ जीवन असेल तर तसलं जीवन असणारे स्वतःचीच विचारसरणी बरोबर आहे हे दाखवण्यासाठी सफाई देण्याच्या प्रयत्नात ते असतात”

हे तिचं म्हणणं ऐकून मी माझ्या नातीला म्हणालो,
“हे बघ,एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची शंका नसेल तर ती व्यक्ती त्या गोष्टीचा परमार्श घ्यायला जाणारनाही. परंतु,एखाद्या गोष्टीवर निःशंक श्रद्धा असणं म्हणजे विस्तृत सत्याला समजून घ्यायला पारखं होणं असं मला वाटतं.माझं समाधान होत आहे म्हणून मी एखाद्या गोष्टीवर नुसती श्रद्धा ठेवणार नाही हे तितकच खरं आहे. एखाद्या गोष्टीचा प्रामाणिक परमार्श घेतला जात असताना,योग्य निर्वाळा मिळेलच असं काही नाही.हे मी अगदी मान्य करतो.कुणाच्याही श्रद्धेचा मी आदर करतोच.
फक्त मी त्यांना एव्हडंच विचारीन की,बाबारे,ती तुमची श्रद्धा खरीच आहे ह्याचा तुम्ही मक्ता तर घेत नाही ना?”
माझं हे सर्व ऐकून झाल्यावर प्रो.देसाई मला म्हणाले,
“हे बघा,मी माझा विचार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो.प्रत्येक जीवंत प्राण्याला परिपूर्णतेची आतून आच असते. श्रद्धा,आशा आणि महत्वाकांक्षा ह्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात अगदी मुळापासूनच्याच असतात.मनुष्य हा निसर्गातलाच एक भाग आहे.त्याच्या अंगातला महत्वाकांक्षेचा गुण सतत त्याला एखाद्या गोष्टीची उपयुक्तता काय आहे हे पहाण्यासाठी जाणुनबुजून शोध घेण्याच्या प्रयत्नात जागृत करीत असतो.जीवनाचा हा खडतर मार्ग पूर्वापार चालत आला आहे.मनुष्याला त्याचा हा वारसा आहे त्याचा अपव्यय करूनही त्याला तरून जाता येईल का?एखाद्या गोष्टीचा तीव्र परमार्श घेण्यासाठी एखाद्याने वाजवी परमार्श घेतल्यास,तो कदाचीत त्या परमार्शाचा शोध घेण्याच्या प्रयासात यशस्वी होऊ शकेल.”
प्रो.देसाई मला जरा फार्मात आल्यासारखे भासले कारण,ते पुढे म्हणतच राहिले की,
“मला वाटतं,मनुष्याचं जगणं हे एक खरंच साहस आहे.आणि त्यात यश अपयश अंतर्भूत असण्याची शक्यता असतेच. अशावेळी खरं अर्थपूर्ण जगत असताना,त्या जीवनाच्या निष्पत्तीवर कशाचाही प्रभाव पडू शकतो.मनुष्य आपलं साहसी जीवन जगत असताना त्याला पूर्ण यश प्राप्त होईलच ह्याचा अंदाज करणं कुणालाही महाकठीण आहे.तेव्हा प्रत्येक वेळी एखाद्या गोष्टीचा परमार्श घेतल्याविना जीवन जगणं किती शक्य आहे हे सांगणं कठीण आहे.
तुमची नात म्हणते त्याप्रमाणे,
“एखाद्या गोष्टीचा अनिर्बंध परमार्श घेणे हा नुसता हक्कच नाही तर ते एक कर्तव्य आहे.”
हे कितीही योग्य वाटलं तरी ते नेहमीच शक्य होईल असं मला वाटत नाही.”

आमच्या ह्या संवादाचा समारोप करण्याच्या उद्देशाने मी प्रो.देसायांना म्हणालो,
“अगणित उद्देशामधे,काही उद्देश साधणं संभवनीय आहेत,काही इष्टही आहेत.माझी खात्री नाही की कोणते उद्देश जास्त रास्त असतील.परंतु,जीवन जगण्याच्या मार्गात, माझी खात्री आहे की,एखादा मार्ग रास्त उद्देश गाठण्यात पुढे येईल.त्यासाठी आपल्या श्रद्धेवर आपला पूर्ण विश्वास हवा.नुसताच विश्वास असून चालणार नाही,तर आपल्याजवळ असलेली सदिच्छा, आपला प्रामाणिकपणा, त्यात अंतर्भूत असला पाहिजे.”
एव्हडं बोलून झाल्यावर आम्ही घरी जायला उठलो.काळोखही होत होता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: