देव ही एक कल्पना आहे.

अलीकडे,जरा थंडी पडायला लागली आहे.ग्रीष्म ऋतू येत आहे ह्याचीच ही चाहूल असणार.झाडांची पानं सुंदर रंगानी सजलेली दिसतात.काही झाडांची पानं पिकून पडायला शिशिराची वाट पहात आहेत.आज हवामान खात्याने,मधूनच पावसाची रिमझिम होईल असं म्हटलं आहे.आम्ही रहात असलेल्या ह्या उंचीवर तसं पाहिलंत तर घराच्या बाहेर पडल्यावर नेहमीच ढगात असल्यासारखं वाटत असतं.कपड्यांनी न झाकलेल्या काही अंगाच्या भागावर,ओलसरपणा जाणवतो त्याचं कारण ढगातलंच बाष्प असणार.पण रिमझिम व्हायची सुरवात झाल्यावर भुरभूर वाटाणारे थेंब प्रत्यक्षात सर्व अंग कधी भिजवून टाकतात ते कळत नाही.
प्रो.देसायांना फोन करून हवामानाची कल्पना दिली.तरीपण ते मला म्हणाले आपण आज तळ्यावर संध्याकाळी भेटूया. कोणता तरी विषय काढून माझ्याशी त्यांना बोलायचं असावं असं मला वाटलं.आणि ते खरं ठरलं.

तळ्यावरच्या बाकावर बसता बसताच भाऊसाहेब मला म्हणाले,
“मला वाटतं ह्या जगात देव ही एक कल्पना आहे. असं म्हटल्याने, मी एखाद्या नास्तिकाच्या विचारासरणीच्या पुढे गेलो आहे असं कुणालाही वाटणं सहाजिक आहे. नास्तिक म्हणजे ज्याला देवाच्या अस्तीत्वावर विश्वास नाही तो. नास्तिकाचं हे म्हणणं सोपं आहे. कारण नकारात्मक म्हणणं सिद्ध करायला काही करावं लागत नाही.माझ्या ह्या देवाच्या कल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं?”

मी प्रो.देसायांना म्हणालो,
“ह्य खोलीत हत्ती नाही हे सिद्ध करायला शक्य होणार नाही.कारण तुमच्या मनात असलेला हत्ती ह्याची व्याख्या तुम्ही कराल तशी आहे.कुणी त्याला चमक्तार म्हणून संभवेल कुणी एखादी आज्ञा असं संभवेल, कुणी त्याला प्रेम किंवा चांगुलपणा संभवेल.
त्यामुळे ज्याला खरोखरीचं देवाबद्दल सत्य हुडकून काढायचं असेल,तर प्रथम त्याला ह्या जगात देवच नाही असं समजूत करून घेऊन मग देवाच्या अस्तीत्वाला हुड्कून काढण्याचा प्रयत्न करावा लागेल.प्रथम त्या व्यक्तीला देवासारख्या अशा अघात शक्तीचा वस्तुनीष्ठ पूरावा हडकून काढावा लागेल.मी ज्या ज्या लोकांशी ह्या विषयावर बोलतो ते सर्व हा पूरावा शोधण्यात अडकून पडलेले दिसतात.नास्तीक असल्याचा पूरावा शोधून काढणं तितकसं कठीण नाही.

तेव्हा,”मला अमुक अमुक गोष्टीवर विश्वास आहे” असं म्हणणार्‍याला, तो विश्वास सिद्ध करायला आणखी काहीतरी वयक्तीक असं जे,जीवनाच्या मोठ्या पटावर पहायला झेप घेईल, जीवन जगण्यासाठी आखून दिलेले काही नियम पाळायला मदत करील असं काहीतरी खात्रीपूर्वक पडताळायला आलं पाहिजे.त्यामुळे ह्या जगात देव आहे असं कुणी म्हटल्यानंतर,वरील दोन गोष्टी पडताळायला त्याला भाग पाड्लं जाणारच. त्या शिवाय गत्यंतर नाही.”

हे ऐकून प्रो.देसाई मला म्हणाले,
“मी, देव ही एक कल्पना आहे,असं म्हणण्याचं पाऊल उचलल्यानंतर,आयुष्याच्या क्षणोक्षणी मला एका गोष्टीची उमज यायला लागते.आणि ती उमज म्हणजे,मला कशाचा लोभ नाही,माझ्या हृदयात प्रेम आहे, सप्तरंगी इंद्रधनुष्य मला प्रत्यक्षात दिसतं वगैरे.आणि ही सर्व उमज पुरेशी अहे असं मी वाटून घेतो. नंतर असं वाटतं की,जे अदृष्य आहे,जे अव्यक्त आहे त्याचा हव्यास करणं, हे अंमळ अति झाल्यासारखं आहे. माझ्या कुटूंबाने माझ्यावर प्रेम करून माझी जोपासना केली,आणि आता मी माझ्या कुटूंबाची जोपासना करीत आहे ही उमज अशावेळी पुरेशी आहे असं मला वाटतं.काल्पनीक देवासाठी मी स्वर्गाकडे डोळे लावून रहाण्याची गरज भासवून घेऊ नये.वंश वाढवण्याची जणू सोडत मला लागली आहे आणि नैमित्तीक आनंद मी उपभोगीत आहे एव्हडी उमज होणं हे काही पूरेसं नाही का?”

प्रो.देसाय़ांचं हे म्हणणं ऐकून, मला थोडा विचार करणं क्रमप्राप्त होतं.थोड्यावेळाने मी त्यांना म्हणालो,
“तुम्ही जर का देव ही एक कल्पना आहे असं उघड उघड वाटून घेतलं,आणि कुणाजवळ बोलला, तर तुमची खैर होणार नाही.तुम्हाला कुणीही माफ करणार नाही.आणि केलंच माफ तर अशा अपवादाने शक्य आहे की, तुमचं हे म्हणणं ऐकून तुमच्याबद्दल कुणी दया दाखवली तरच किंवा तुमची स्मरण शक्ती सदोष आहे असं समजून घेतलं तरच.”

“मला माफ केलं नाही तरी ठिक आहे.कारण त्यामुळे मला विचारमग्न व्ह्यायला थोडी फुरसद मिळेल.पण एक मात्र खरं की,तुम्ही म्हणता अशा तर्‍हेचा पहिलाच आघाद माझ्यावर करणार्‍यांबरोबर मला जरा समजूतदारपणा दाखवावा लागेल.”
देसायांनी मला सांगून टाकलं.

“देव ही एक कल्पना आहे असं मानल्यानंतर तुम्हाला “मीच सांगतो तेच खरं आहे” अशा प्रकारची वृत्ती सोडून द्यायला हवी हे नक्कीच.निरनीराळ्या संस्कृतीत वाढलेले लोक,आणि त्यांच्या देवाबद्दलच्या कल्पना ह्याची माहिती करून घेणं तुम्हाला आवश्यक आहे, हे ही तुम्हाला समजून घ्यावं लागणार”
मी प्रो.देसायांना म्हणालो.

मला प्रो.देसाई म्हणाले,
“देव ही एक कल्पना आहे असं मानल्या नंतर,आहे ती वस्तुस्थिती मानायला मला काहीच हरकत नसावी.कारण अशा विचारातून आपण कुठे चुकत आहोत हे शिकायला मिळतं.थोडीशी एकमेकाशी चर्चेवर जुळवाजूळव करून घेऊन ह्या विषयावर एकमेकाशी बोलायला संपर्क ठेवता येतो.चर्चा करताना काही,गोल गोल विचार करणारे म्हणतील,
“देवावर माझी श्रद्धा आहे,मी माझ्या ह्रुदयात ती कोरून ठेवली आहे.तुम्ही काहीही म्हटलंत किंवा काहीही केलंत तरी माझं ते मत तुम्ही बदलू शकत नाहीत.”
आणि काही लोकांकडून स्पष्ट सांगीतलं जाऊ शकतं,
“तुम्ही तोंड मिटून गप्प बसाल तर बरं.”
तेव्हा,देव ही एक कल्पना आहे असं मी मानल्यानंतर,माझी चुक कशी नाही हे सिद्ध करीत राहिल्याने मला चर्चा करण्यात आणखी मजा येणार,कारण मी त्याबद्दल आणखी काहीतरी शिकायला उद्युकत्त होत रहाणार.”

माझ्या कुटूंबाला भोगावं लागलेलं दुःख,किंबहुना माझ्या कुटूंबालाच नव्हे तर पुर्‍या जगाला भोगावं लागलेल्या दुःखाचं कारण त्या सर्वज्ञ,सर्वव्यापी,सर्वशक्तीमान शक्तीमुळे होत आहे कारण की मी देवाचं अस्तित्व मानत नाही ह्या विचारसरणीतून हे होत आहे,नव्हेतर,माझ्या ह्या विचारसरणीमुळे ती शक्ती मला मदत करायला फिकीर करीत नाही,किंवा कदाचीत ती शक्ती माझी परिक्षा पहात आहे ,असं समजून रहाण्यापेक्षा, खरं तर भविष्यात एकमेकाला मदत करून त्यातून सुटका करून घ्यायला ती विचारसरणी, मला एखादा उपाय शोधायला उद्युक्त करायला योग्य ठरेल.देवाचं अस्तित्वच न मानल्यामुळे भविष्यात दुःख भोगायच्या विचारसरणीची शक्यताच कमी होत जाईल.

म्हणूनच,देवाचं अस्तित्व न मानल्याने, माझ्या कुटूंबावर,इतर लोकांवर,सत्यतेवर,प्रेमावर,सौन्दर्यावर आणि अशा अनेक गोष्टीवर भरवसा ठेवायला मला जास्त वाव मिळतो हे मी आवर्जून सांगू शकतो आणि त्यामुळे माझं हे जीवन खरेपणाने एक उत्तम जीवन ठरू शकतं.”

काळोख बराच झाला होता.आता डिसेंबर अखेर पर्यंत दिवस लहान आणि रात्र मोठी होत जाणार हे नक्कीच.पण पावसाची रिमझिम अंमळ जास्त होत राहिल्याने चिंब भिजायची शक्यता वाढणार असं पाहून आम्ही हा देवाचा विषय इथेच थांबवला आणि घराची वाट धरली.

श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: