मोलाचे क्षण.

 

“बरेच लोक आपल्या जीवनाचं मोज-माप आपण काय साध्य केलं ह्यावर अधिष्टित ठेवतात.”

इथे थंडीत पाऊस पडतो.ग्रीष्म ऋतु संपता संपता पावसाळा सुरू होणार आहे.ह्यावेळी तरी पाऊस भरपूर पडावा असं प्रत्येकाला वाटतंय.आज तर हवामान खात्याने वादळ येऊन सरी कोसळतील असं भाकित केलं आहे.

मी प्रो.देसायाना त्यांच्या घरी फोन करून विचारलं,
“घरी बसून बसून मला कंटाळा आला आहे.थोडावेळ मीच तुमच्याकडे गप्पा मारायला येऊं का?नाही तरी पाऊसामुळे तळ्यावर बसणं आपल्याला मुष्किल होणार आहे.”
एका शब्दात मला म्हणाले,
“अलबत”

गप्पांची सुरवात करताना मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“काल माझ्या हातात एक पुस्तक आलं.हे माझ्या नातीने वाचायला आणलं होतं.मी सहज ते चाळलं. “जीवनाचं सार” असं त्याचं शिर्षक होतं.

मला असं वाटतं की,लेखकाला थोडक्यात म्हणायचं होतं की,
“जीवनातले सर्वात अधिकतम क्षण हे तपशीलातले असावेत.जीवन म्हणजे केवळ आपली उद्दीष्ट साधण्यासाठी असतं,किंवा आयुष्यातले टप्पे गाठण्यासाठीच असतं अशातला भाग नाही.उलट जीवनात येणारा प्रत्येक दिवस किती मोलाचा आहे हे पाहून त्याचं कौतुक करण्यासाठीच जीवन असावं.मला असं वाटतं की,जीवनाचं खरं सार दरदिवसातल्या क्षणा-क्षणात असतं.”

हे ऐकून प्रो.देसाई मला म्हणाले,
“लेखकाचं म्हणणं मला बरचसं पटतं,.असे किती तरी लोक आपलं संपुर्ण जीवन वाट पहाण्यात जगत असतात.जसं–केव्हा एकदा सोळा वर्षाचा होतो आणि कायद्याने गाडी चालवायला लायक होतो,एव्हडा होतो की कधी एकदा कॉलेजात जातो,एकवीसाव्या जन्म दिवसाची वाट पहात असतो,लग्न केव्हा होईल याची वाट पहात असतो आणि अशा कित्येक मुद्यांची यादी बनवता येईल.
लोक असं किती काळ वाट पहात रहाणार आणि कधी खरं जीवन जगायला प्रारंभ करणार?”

मी म्हणालो,
“बरेच लोक आपल्या जीवनाचं मोज-माप आपण काय साध्य केलं ह्यावर अधिष्टित ठेवतात.त्यांची लायकी ते,आपण कुठच्या कॉलेजातून पदवी मिळवली,त्यांचा वैवाहिक दर्जा किंवा त्यांना मिळणार्‍या पगाराच्या चेकवर किती शुन्य आहेत ह्यावर आपली योग्यता ठरवतात.असं असलं तरी, मला असं वाटतं की, कॉलेजची पदवी किंवा नोकरीचा दर्जा लक्षात घेत असताना,ते हाशील होत असताना,त्यावेळच्या आठवणी लक्षात न ठेवून कसं चालेल.?
अगदी छोटे,छोटे तपशीलच जीवन अविस्मरणीय आणि फयदेशीर करण्यात उपयुक्त करतात.”

“मला माझे जूने अनुभव आठवतात.”
असं म्हणून भाऊसाहेबानी मला आपली एक आठवण सांगीतली.
ते म्हणाले,
“एक सोळा वर्षाची आमच्या शेजार्‍याची मुलगी मला नेहमी उपदेशात्मक प्रश्न विचारत असते.आणि मी पण तिला समजावून सांगत असतो.ती नेहमी मला विचारते, मोठं होणं म्हणजे काय झाल्यासारखं वाटणं?.मी तिला नेहमीच सांगत आलो आहे की,खरोखरच तुझ्या ह्या प्रश्नाचं माझ्या जवळ अजून उत्तर नाही.मी एकदा तिला विचारलं,
“तू पाच वर्षानंतर सहा वर्षात पदार्पण केलंस,तेव्हा तुला कसं वाटलं?तुला काही निराळं असं वाटलं का?
जेव्हा ती म्हणाली,”मला काही वाटलं नाही.”तेव्हाच मी तिला म्हणालो,
“फरक वाटणं हे हळुवारपणे होत असतं.”
मी तिला म्हणालो,
“मी सहावीत असताना वर्गाचा मॉनीटर होतो.आणि कॉलेजात गेल्यानंतर मी नाटकात भाग घ्यायला लागलो.एखाद्या दिवशी उठून आपण आपल्याशी असं म्हणत नाही की,
“हेच खरं,ह्यासाठीच मी वाट पहात होतो.”
आयुष्यातला एक प्रवास संपत आला की,दुसरा चालू होतो.आपण सतत बदलत असतो आणि वाढत असतो.
ह्या साठीच आपण प्रत्येक दिवस पूर्णत्वाने जगला पाहिजे आणि कोणतीही गोष्ट किंवा आपल्या जीवनात येणारे लोक तसेच्या तसे स्वीकृत करायचे नसतात.
तुला ते आत्ता लक्षात नाही येणार.पण आज जे तुला भ्रांत करीत आहे ते तू एक दिवशी विसरून पण जाणार आहेस.हे असे सर्व दृष्टांतच आपल्याला आता आपण कोण आहोत ते बनवीत असतात.

जीवनाची व्याख्या तरी काय असावी?ह्या जीवनात जे लोक आपल्याला विशेष वाटतात,तेच ते आपलं अपूर्ण राहिलेलं वाक्य पूरं करून टाकतात.आपली विचित्रता त्यांना कळत असते आणि त्याचा ते आदर करीत असतात.लोकांत असलेल्या त्रुटि ह्या बर्‍याच दृष्टीने त्यांच्या काहीश्या गुणवत्ताच असतात. हेच तर खरं जीवन आहे.जीवन म्हणजे जगणं,शिकणं आणि प्रेम करणं,अगदी प्रत्येक दिवशी म्हटलं तरी चालेल. जीवन म्हणजेच अनोळख्या जागी मनोहरता पाहाणं.”

बरं झालं.मी प्रो.देसायांशी त्या पुस्तकाच्या विषयाची चर्चा केली आणि त्यांनी मला आपला अनुभव सांगून जून्या आठवणीला उजाळा दिला. मलाही थोडंकाही ह्या गप्पातून कळलं.

घरी जायची वेळ झाली होती.मी त्यांना म्हणालो,
“माझ्या नातीला तुमचा हा अनुभव सांगतो.जीवनातले मोलाचे क्षण काय असतात ते तिला तरी कळेल. पुन्हा भेटूया.”
असं म्हणून मी घरी जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: