एक आटपाट नगर होतं.

एक आटपाट नगर होतं.

त्यावेळी व्हिडियो गेम्स नव्हते.त्यामुळे आमचे खेळ मैदानातच व्हायचे.रात्री जेवल्यानंतर दमल्यामुळे झोपेची पेंग यायला सुरवात व्हायची.बरेच वेळा झोपताना आम्ही आजोबांना गोष्ट सांगायला सांगायचो.
बर्‍याच गोष्टी आम्हाला त्यांनी सांगीतल्या आहेत.त्यातली “एक आटपाट नगर होतं ” ही त्यांची पेट गोष्ट आम्हाला फार आवडायची.

आजोबा म्हणायचे,
“एक आटपाट नगर होतं.तिथे राजा-राणी राज्य करायची.त्यांचा एक प्रधान होता.तो पण राजा-राणीच्या सत्त्तेत सामिल असणार हे उघड होतं.परंतु, राजाच्या बाजूने असलेली जनता आणि प्रधानाच्या बाजूने असलेली जनता यामधे चूरस असायची.असं असूनही वरकरणी राजा-प्रधानाची युतीची सत्ता होती असं भासवलं जायचं.

परंतु,राजा आणि प्रधान एकमेकाविरूद्ध बोलायचे.जनतेला त्यातलं राजकारण कळत नसायचं.कारण सत्तेत ते भागीदार आहेत असं असल्याने दोघांकडून तसं वागणं जनतेला अपेक्षीत नव्हतं.

(आमचे आजोबा ही गोष्ट आम्हाला सांगत असताना माझा धाकटा भाऊ केव्हाच झोपी जायचा.ही गोष्ट त्याच्या डोक्यावरून जायची.पण मी मात्र गोष्टीत स्वारस्य घ्यायचो.)

पुढे आजोबा सांगू लागायचे,
“राजा एका नर्तकीकडे जायचा.परंतु,त्या नर्तकीचं प्रधानावरही प्रेम होतं. प्रधानही राजाला चुकवून त्या नर्तकीकडे जायचा.राजाला जेव्हा हे माहित झालं तेव्हा प्रधानाचा पचका करण्यासाठी त्याने एक युक्ती केली.तो त्या नर्तकीला म्हणाला,
“तुझं जर का माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू पुढल्या खेपेला माझ्याकडे येशील तेव्हा “भाबरी” करून ये”.असं तू प्रधानाला सांग.”
(केस-कर्तन करून ये,मुंडण करून ये,टकलू होऊन ये)
नर्तकीने प्रधानाला तसं सांगीतलं.

ही शक्कल राजाची असावी हे कळण्याइतका प्रधान चतूर नसला तर नवलच म्हणावं लागेल.
त्यानेही एक युक्ती केली.प्रधान नर्तकीला म्हणाला,
“तुझं जर का माझ्यावर प्रेम असेल तर पुढल्या खेपेला आल्यावर गर्दभ जसा ओरडतो तसा चार वेळा मला ओरडून दाखव.”

प्रधान मूंडण करून नर्तकीकडे गेला.आणि राजानेही गर्दभासारखं चार वेळा नर्तकीला ओरडून दाखवलं.
नंतर जेव्हा दरबार भरला तेव्हा प्रधानाला मुंडण केलेलं पाहून त्याचा भर दरबारात पचका करावा म्हणून प्रधानाकडे पाहून राजा त्याला म्हणाला,
“किंम पर्वणी मुंडणं?”
लागलीच प्रधानाने त्याला उत्तर दिलं
“यत्र पर्वणी राजन गर्दभअपी गायन्ती तत्र पर्वणी अहं मुंडणं”
(अर्थात–जेव्हा राजा गर्दभासारखा ओरडतो तेव्हा प्रधान शरमेने मुंडण करणार नाही तर काय करणार?

(माझं संस्कृत अगदीच कच्चं आहे.हे सांगायला नकोच.पण माझे आजोबा संकृतचे गाढे अभ्यासक होते. त्यानी संस्कृतमधे सांगीतलं ते जसंच्यातसं कसं सांगणार?)

राजा,प्रधानाच्या संभाषणातला मतीतार्थ दरबारातल्या लोकांना कळलं नाही हे उघडच आहे.
पण एकमेकावर कशी बाजी मारली ते राजा आणि प्रधानाला कळलं हे ही उघडच होतं.

(हल्लीच्या आटपाट नगरात,सध्या विदर्भाचा विषय धरून युती सरकारात असंच काहीसं चाललं आहे असं मला वाटतं.विदर्भाचं भलं फक्त आम्हालाच माहित आहे असं दोन्ही पक्ष आपआपल्यापरीने बोलून दाखवीत आहेत.)
असो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

3 Comments

  1. KUMAR
    Posted डिसेंबर 12, 2015 at 4:13 सकाळी | Permalink

    khup chan. short and sweet

  2. Posted डिसेंबर 21, 2015 at 7:11 pm | Permalink

    थॅन्क्स कुमार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: