Monthly Archives: जानेवारी 2016

प्रतीक्षा

गेले दोन दिवस लहान लहान वादळं येउन पावसाच्या सरीवरसरी कोसळत होत्या.गेल्या चार वर्षाच्या दुष्काळा नंतर पावसाची आवश्यकता काय ती चांगलीच कळली आहे.प्रो.देसायांना मात्र दोन दिवसापुढे संध्याकाळी घरी रहायला आवडत नाही.ते कंटाळातात.एक तरी संध्याकाळची खेप तळ्यावर फिरायला मिळाली तर ते खुषीत असतात.आज अजीबात पाऊस पडणार नाही असं हवामान सांगणार्‍यांचं भाकीत होतं.सकाळपासूनच भाऊसाहेब मला फोन करून नक्की […]

अजाणतेपणा आणि त्याचं मूल्यांकन.

त्या दिवशी माझी आणि विनायकची अजाणतेपणावर चर्चा चाललेली होती.या विषयावर आपला अनुभव सांगताना विनायक मला म्हणाला, “माझी सर्वांत मोठी मुलगी आणि मी एकदा अशाच काहीश्या खास दिवशी एकमेकाच्या हृदयाला भिडेल अश्या संवादात गुंतलो असताना,ती मला म्हणाली, “बाबा,एकदा तुम्ही असं काही बोलला ते अजूनही माझ्या आठवणीत ठाम बसून राहिलं आहे.माझ्या हृदयात त्याची जाण राहिली आहे.” मला […]