अजाणतेपणा आणि त्याचं मूल्यांकन.

त्या दिवशी माझी आणि विनायकची अजाणतेपणावर चर्चा चाललेली होती.या विषयावर आपला अनुभव सांगताना विनायक मला म्हणाला,

“माझी सर्वांत मोठी मुलगी आणि मी एकदा अशाच काहीश्या खास दिवशी एकमेकाच्या हृदयाला भिडेल अश्या संवादात गुंतलो असताना,ती मला म्हणाली,
“बाबा,एकदा तुम्ही असं काही बोलला ते अजूनही माझ्या आठवणीत ठाम बसून राहिलं आहे.माझ्या हृदयात त्याची जाण राहिली आहे.”

मला माझंच नवल वाटलं की,इतकं ह्र्दयात जाण राहिल असं मी काय बरं बोललो असेन?.अरे वा,मी असं काही बोललो की तिच्या एव्हडं लक्षात रहावं असं?माझा मीच विचार करू लागलो की,असे कोणते शब्द मी उच्चारलो की ते ते तिला चटका देऊन गेले असतील? मी अपेक्षा करीत होतो की,असं काही कळकळीचं असावं,अशी काही मी शब्द-फेक केली असावी आणि ती पण मी एखाद्या क्षणी बेसावध प्रतिभावान झालो असताना?

“अजाणतेपणाचं अती मुल्यांकन होत असतं.”
असं काहीसं मी एकदा तिला म्हणाल्याचं पुस्सट आठवतं.पण त्यानंतर माझ्या ध्यानात ते कधीही राहिलं नाही.त्याचं कारण काय? तेही मला आठवत नाही.मला वाटतं तो अवखळ शेरा अगदी निराश होऊन तिच्या एका मैत्रीणीच्या सनातनी विचाराच्या कुटूंबाविषयी बोलताना दिला होता.

हे ऐकून झाल्यावर मी विनायकला म्हणालो,
“खरंच,एखाद्याचा अज्ञानीपणा वास्तविकतेपेक्षा अमंळ जास्तच समजला जातो.सरतेशेवटी,अज्ञान म्हणजे तरी काय? ज्ञानाचा अभावच नां?”

त्यावर विनायक मला म्हणाला,
“ह्या जगात मुलं जन्माला येतात तेव्हा ती अज्ञानीच असतात.आणि आपण ती तशी रहावीत म्हणून आटोकाट प्रयत्नात असतो.पण त्यासाठी त्यांना किती किंमत मोजावी लागत असावी.?ही मुलं जशी मोठी होत असतात तशी आपण त्यांना संरक्षण देत असतो.पण असं करीत असताना त्यांच्या विकासाला ते हानिकारक होत असतं.खर्‍या जगाला तोंड कसं द्यावं हे त्यांनी शिकावं अशी अपेक्षा,त्यांना अज्ञानी ठेवून, कशी बरं साध्य होईल.?
कदाचित मी असा विचार करीत असेन कारण माझी वाढ त्याच ढंगाने झाली असावी.मला आठवतं,नव्या परिस्थितीला ज्यावेळी मला झूंज द्यावी लागली त्यावेळी मी तसा सज्ज नव्हतो.

सध्याचं हे जग,आपल्या मुलांना कोणतं स्वरूप प्रकट करून दाखविल ह्याची आपण अपेक्षाच करू शकत नाही.मला आठवतं,माझी सगळ्यात लहान मुलगी जेव्हा दहा वर्षाची होती,तेव्हा तिने,
“girls.com”
असं संगणकावर टाईप केलं,असा विचार करून की तिला एखादी वेबसाईट मिळेल की त्यावर दागदागिने, मेकअपचं सामान,अन्य काही गोष्टी मुलींसाठी उपयोगाकरता सापडतील.
तिने “enter” दाबल्यावर तिला काय दिसलं असेल त्याची तुम्हाला कल्पना आली असेल.

मला ज्यावेळी हे कळलं त्यावेळी मी तिच्यावर मुळीच रागावलो नाही.
“पेरेन्टल कंट्रोल” असा काही कंट्रोल संगणकावर टाकला नाही.तिने काय पाहिलं,काही लोक अशा साईटवर का जातात आणि सर्च इंजीन कसं वापरावं हे मी तिला सांगीत्तलं.

उघडपणे मी हसलो.जरी तसा हसलो हे मी लक्षात ठेवलं नाही.ती मात्र म्हणते की मी तसाच हसलो.पण मुद्दा असा आहे की,त्याबाबतीत तिने घाबरून जाण्याऐवजी मी तिला अशा प्रसंगी कसं तोंड द्यायचं हे समजायला मदत केली.”

माझं मत देताना मी विनायकला म्हणालो,
“राजकारणाबद्दल चर्चा करीत असताना,वादग्रस्त कलेबद्दल बोलत असताना,एखाद्या चित्रपटाबद्दल बोलत असताना,तारतम्याबद्दल बोलत असताना किंवा अशा अनेक बाबतीत बोलत असताना अशी वागणूक कृतीत आणता यते.
मात्र मी काही असं सुचवित नाही की,मुलांनी निरागस असू नये,तो निरागसपणा त्यांनी घालवून बसावा. परंतु,निरागस तरूण भाबडा असू शकतो.आणि भाबडेपणा बाळगून नीट विचार करायला मदत होत नाही.आणि प्रश्नही सुटत नाही.”

“म्हणूनच मी म्हणतो की,अजाणतेपणाला जास्त मुल्यांकन दिलं गेलं आहे.”
असं म्हणत विनायक पुढे म्हणाला,
“कुतूहलाबद्दल मला विशेष वाटतं,प्रश्नाचं उत्तर देण्याबद्दल मला विशेष वाटतं.
मुलांना योग्य मान देऊन, नीट विचार करण्याबाबतचा त्यांच्या अधिकाराचा सन्मान करून त्यांना मोठं होऊ द्यावं आणि त्यांचे त्यांनी निर्णय घेताना ते निर्णय तथ्यावर अवलंबित असावेत,भीती वर नव्हे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: