रमाकांत जेव्हा पहिल्यांदाच आजोबा होतो.

मी अलीकडे कोकणात मांडकूलीला गेलो होतो.माझ्या मावशीचा हा गाव.करली नदीच्या काठावर हा गाव वसला आहे.कु्डाळ ह्या गावापासून तीन मैलावर आहे.पावसाचे दिवस होते.करली नदी दुथडीभरून वाहत होती.
माझा मावस भाऊ,रमाकांत,मला म्हणाला,
“चल,आपण नदीच्या काठावर फिरायला म्हणून जाऊया.येताना नदीतले गुंजूले,सूळे किंवा दुसरे कसलेही मासे घेऊन येऊया.”
नदीच्या काठी भर पावसात काही मासे पकडणारे लोक,गळाला मासा लावून बसलेले असतात.केव्हा, केव्हा काही लोक जाळं टाकून मासे पकडतात.आमच्या सारख्याला विकतात.”
असं रमाकांत पुढे मला म्हणाला.
पाऊस खूप पडत होता.रमाकांताने आपल्या धोतराचा खोचा करून वर बांधलं होतं.मी शॉर्ट घातली होती आणि आम्ही छत्र्या घेऊन निघालो.
परतून घराजवळ आल्यावर रमाकांत मला म्हणाला,
“आज मी तुला माश्यांची मेजवानी देणार आहे.आज मी विशेष खूष आहे.”
मला असं सांगून माझं कुतूहल वाढवण्यात रमाकांतला मजा वाटत होती.
“माझ्या मनातलं सवित्सर तुला सांगतो.”
असं म्हणून रमाकांताने माशाची पिशवी माझ्या मावशीकडे देत,पडवीतल्या खूर्चीवर बसण्याचा मला इशारा केला.
नंतर मला म्हणाला,
“आज मला आनंद होत आहे कारण माझ्या फोनवर मी माझ्या नातीचा पहिल्यांदाच फोटो पाहिला. त्यावेळी तिच्यावर रोखलेली माझी नजर काही मला हलविता येत नव्हती.
आमच्या नातीचं ते पहिलंच चित्र होतं.अद्याप पर्यंत तरी मी तिला प्रत्यक्षात पाहिलं नसलं तरी ज्यावेळी माझ्या हाताच्या घडीवर मी तिला घेईन त्यावेळी आमची पहिल्यांदाची ओळख होईल असं म्हणायला हरकत नाही.

होय,होय, मला माहित आहे, बरेचसे आजीआजोबा अमंळ ह्याबाबतीत जरा जास्तच असतात.एखाद्या आमच्याकडे स्मार्ट्फोनवर त्यांचे-नातवंडाचे-बेसुमार फोटो किंवा व्हिडीयोझ असल्यानंतर आनंदी रहाण्यात त्यांच्या सारखे तेच म्हणावं लागेल.

पण आमच्या सारख्या एखाद्याला आपलीच समजूत घालता येणार नाही.पण नातवंड झालेले आजीआजोबा आपला अनुभव सांगताना म्हणतात,
“ते नातवंड आपल्या हाताच्या घडीत घेतलेलं असताना खरंच अंगातून एक कळ दाबून गेल्यासारखी वाटते.”
मला वाटतं आपल्या मुलांना जेव्हा मुलं होतात,तेव्हा आपल्याला असं वाटूं लागतं की जणू काय त्या बातमीने आपलं ह्रदय खळबळून जात आहे.कदाचीत तसं व्हायला आपल्या मेंदूकडून ह्रदयाकडे त्या खळबळीसाठी सांधलेच गेलो आहोत असं वाटूं लागतं.

ह्या बाबतीत जे आजीआजोबा जरा उदासीन असावेत त्यांनी आपल्या येणार्‍या पुढच्या,पिढीबद्दल मदत करायची सोडून दिली आहे असं भासलं तर गैर होणार नाही.
पूर्वीच्या काही लोकांना आजीआजोबा असण्यात मोठेपणा वाटायचा कारण नातवंडांचे लाड करून झाल्यावर परत त्यांच्या आईवडीलांकडे त्यांना सूपूर्द करून मोकळं झाल्या सारखं त्यांना वाटायचं.पण ह्या मोकळेपणाचा खरा अर्थ असा होतो की,त्यांचं नातवंडांवरचं प्रेम भारमुक्त आहे आणि त्यांना वाटणारं त्यांच्यावरचं प्रेम हे त्यांच्या मनात आलेली त्यावेळची शुद्ध निखळ वास्तल्याची लहर आहे.

खरं म्हणजे हा आजीआजोबा होण्याचा अनुभव आपण जो काही प्रकट करतो तो जणू आपल्याबद्दल सर्व सांगण्यासाठी आहे असं नव्हे.उलटपक्षी जेव्हा आपण त्या नवजात नातवंडाला आपल्या हाताच्या घडीवर घेत असतो त्यावेळी त्याची प्रशंसा करताना मानतो की,असं हे नवजीवन होतच रहाणार आणि पुढेही होत रहाणार आणि ते सुद्धा आपल्या गैरह्जेरीतही.

असं म्हटलं जातं की,”एखादी अनमोल वस्तु सर्वोत्कृष्ट असते” हे म्हणणं बरोबर होणार नाही असं मला वाटतं.तसंच मला वाटतं आपल्या आयुष्यातली एखादी खास घटना खास होऊ शकत नाही.म्हणजे मला म्हणायचं आहे की ती अद्वितीय आहे असं होऊ शकत नाही.तसं पाहिलं तर उत्पत्ती सारखी सामान्य गोष्ट काय असावी? परंतु, सामान्य असली तरी ही घटना जेव्हडी आपल्याला वेगळ्या तर्‍हेने आणि प्रभावी मार्गाने जोडण्याचा प्रयत्न करते ते अगदी आगळंच असतं.

तुमची मुलं आता आईबाप होण्यात सहप्रवासी झालेले असतात.तुमचा मित्रपरिवार जे अगोदरच आजीआजोबा झालेले असतात ते तसं होण्यात फुशारकीने काय बरळतात ते शेवटी तुमच्या लक्षात येतं.त्या भुतकाळाला जोडणार्‍या शृंखलेतली ही आणखी एक जोडणी आहे असं तुम्ही तुम्हाला पहाता.ह्या पेक्षा जास्त खूष होण्यासारखं आणखी काही नसावं.”

रमाकांत पहिल्यांदाच आजोबा झाल्याने फार खूशीत होता.मावशीने केलेलं माशाचं जेवण अगदी ताव मारून जेवत होता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: