जीवनाचा अर्थबोध.

“सुधा अरगडेला भेटून तिच्या चर्चेतून मी खरोखरच काही तरी शिकलो असं मला तिचा निरोप घेताना वाटलं.”

“ती ज्यावेळी तरूण होती,सुधा अरगडे, त्यावेळी तिला मोठी स्वप्न पहायची सवय होती.मुंबई सारख्या बड्ड्या शह्ररात रहावं,नाटक सिनेमात काम करावं.त्याऐवजी,ती एक आई झाली,एक शिक्षीका झाली.आणि ते सुद्धा एका लहानशा गावात.असं जीवन जगण्याची तिने कधीच कल्पनाही केली नसावी.पण आता सुधा अरगडेला चांगलच लक्षात आलं की असं हे जीवनच जगणं खरं आहे दुसरा कसल्याही प्रकारे ते असूंच शकत नाही.”
सुधा अरगडेच्या अलीकडच्या भेटीत तिच्या बरोबर झालेल्या चर्चेअंती माझी तशी समजूत झाली.

त्याचं असं झालं मी योगायोगाने सुधाला भेटलो.कोकणात जात असताना माझ्या प्रवासात तिची माझी गाठे पडली.आमची एसटी एका गावात आल्यावर नादुरूस्थ होते काय,पाय मोकळे करण्यासाठी मी एसटीतून खाली उतरतो काय आणि मला सुधा दिसते काय हा खरंच योगायोग होता.माझा पुढचा प्रवास अर्धवट सोडून मी तिच्या घरी गेलो.मला तिने आपल्याकडे एक तरी दिवस रहाण्याची विनंती केली.मला तिचा हिरमोड करायचा नव्हता.जेवणं झाल्यावर आम्ही जीवनावर चर्चा करायला लागलो.

सुधा मला म्हणाली,
“मी माझ्या जीवनाच्या अश्या एका टप्प्यावर आले आहे की त्या टप्प्यावर सुखशांती नसेलही पण जीवनाचा अर्थबोध नक्कीच आहे.माझ्या आयुष्यातला एक काळ असा होता की मला वैभवाबद्दल एक भ्रान्ति होती.
मला असं वाटायचं,जे आता असलेले तरूण तसंच वाटून घेतात,की मी एक खास व्यक्ती आहे,की मी इतरांपेक्षा जरा हटकेच आहे,इतरांपेक्षा माझी जागा जरा निराळीच आहे.

मी अगदी मनोमनी समजायची की,माझ्या भविष्यात मी श्रीमंती,आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठीच जन्माला आली आहे.आणि त्याचं कारण माझ्या अंगात असलेलं कौशल्य,प्रतिभा आणि क्षमता ह्यामुळे आहे.मी सर्वसाधारण व्यक्ती म्हणून जगू-वाढू शकत नाही.देशातल्या इतरांबरोबर मी अशा काहीशा प्रकारे वाढू शकत नाही.”

एव्हडं मी सुधाकडून ऐकून घेतल्यावर कुतूहलाने मी तिला विचारलं,
“तू ह्या गावात आलीस कशी?तुझा नवरा काय करतो?तुला मुलं किती आहेत?

“माझं लग्न झाल्यावर मी आमच्या गावातल्या एका शाळेतली एक सर्वसाधारण शिक्षीका झाले.माझं लग्न एका शास्त्रज्ञा बरोबर झालं आहे.आम्हाला एक मुलगी आहे.घरात एक मनीमाऊ आहे.आणि आमची एक स्कुटर आहे.आणि भाडोत्री म्हणून एका घरात रहातो.असं असूनही मी ह्यात तृत्प आहे.

मी मला आठरावर्षाची असल्याची समजून तिच्याशी संवाद साधला असता तर, माझी खात्री आहे की तिला ह्यातलं बरंच काही समजलं नसतं.तिला वाटलं असतं की मी चित्रनगरीत जाऊन खेटे का घातले नाहीत,ऑडीशन का दिलं नाही,एखाद्या प्रयोगीक नाटकात भाग का घेतला नाही माझ्या जवळच्या मित्र-मैत्रीणीना माझ्या तोंडून एखादं गाणं कसं काय ऐकवलं नाही.वगैरे.
मुल होण्याबद्दल जाणण्यास ती उत्सुक्त असती.कारण त्यातला तिला काहीही अनुभव नव्हता.माझा शिक्षीकेचा पेशा पाहून ती थोडी विस्मयीत झाली असती.कदाचीत माझ्या पेशाला ती मामूली समजली असती.मी राहते त्या घराच्या आजूबाजूचा शेजार पाहून ती कदाचीत मला अगदीच अशीतशी समजली असती.एखादं घर जर का मी विकत घेतलं असतं तर ते अशा परिसरात असायला हवं असतं की आजूबाजूला विभीन्नदर्शनग्राही शेजार असायला हवा.मॉल असायला हवेत.रेस्टॉरन्ट असायला हवीत. असं तिला वाटलं असतं.मी ज्याला माझं घर समजत आहे त्या घराचा आणि परिसराचा तिने उपहास केला असता.
पण त्यावेळी माहित नव्हतं ते आता मला माहित होतंय.हानी होत असण्याची किमया मला आता जाणवत आहे.माझी खात्री आहे की त्यावेळची कॉलेजमधली क्षणभंगूर वर्षं -अवखळपणाची आणि विस्मयकारक वर्षं-जणू आयुष्यातलं सुक्ष्म ब्रम्हांडच होतं.एकाच लक्ष्यावर स्वतःला केंद्रीत करून जितकं निकट होऊन त्याची छबी घेतल्यासारखं ते असतं. खरं आयुष्य इतकं समृद्ध असतं,इतकं गुंतागुंतीचं असतं,इतकं विस्मयकारक असतं आणि एव्हडं भेसूर असतं की ती बुडबूड्यातली कॉलेजातली चार वर्षं जे देत असतात ते आत्मसंतुष्टपणा फोल असतो, असं ठरवण्यासाठी असतात असं म्हणावं लागेल.

प्रेम मिळवण्यासाठी काय काय परिश्रम घ्यावे लागतात ते मला माहित झालं आहे.निवांत बसून जेव्हा प्रेम होईल तेव्हा होईल असं जे तरूण वयात वाटतं तसं ते नसतं.एखादा जीव जगात आणणं म्हणजे काय असतं ते मला चांगलंच माहित झालं आहे.भावनांतला विकटपणा जेव्हा,संभ्रम आणतो,हाडा-मांसात शीण आणतो,स्वत्व हरवल्याच्या संवेदना आणतो,ज्या प्रेमाला हृदय किती विशाल आहे हे माहित नसतं,ते ते त्या हृदयाचंच विभाजन करतं.

माझं जीवन अगदी मामूली आहे,अगदी छोटं आहे,इतर जीवनाबरोबर विनिमय करण्याजोगं आहे.कदाचीत,माझ्या घराबाहेर,माझ्या आजुबाजूच्या समाजाच्या बाहेर,किंवा माझ्या गावाच्या बाहेर मी कसलाच प्रभाव टाकू शकणार नाही असं माझं जीवन आहे.
पण मी एक गोष्ट शिकले आहे की माझे आत्मजन महत्वाचे आहेत.कारण त्या थोड्याशाना माहित आहे की मी त्यांना अविनिमय आहे.

माझी छोटी जेव्हा रडते तेव्हा,”आई,आई,”म्हणत रहाते.आणि मला पाहून माझ्या अंगावर ती झेप घेते तेव्हा ती झेप फक्त माझ्यासाठीच असते.
तेव्हा छोटंसं जीवन माझ्या साठी संपूर्णतया मला मंजूर आहे.नव्हे तर, हे असंच मला हवं होतं.”

सुधा अरगडेला भेटून तिच्या चर्चेतून मी खरोखरच काही तरी शिकलो असं मला तिचा निरोप घेताना वाटलं

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: