पूर्ण आणि उपयोगी जीवनातून मिळालेलेल धडे.

“सूर्या देशमुखाने शिक्षकाच्या पेशात जीवन जगले तरी,लहानपणीच त्याच्या मनावर झालेल्या संस्कारातून त्याने सर्व मिळवलं.कोकणातल्या एका खेडयात त्याचं बालपण गेलं.बालपणातले हे झालेले संस्कार तो त्याच्या मुलावर करू पहात होता.दुडूदडू धावणारा त्याचा मुलगा हळू हळू मोठा होत असताना एक दिवस पूर्ण आणि उपयोगी जीवनाला सुरवात करणार आहे ह्याची सूर्याला जाणीव झाली आहे.”

मी बरेच दिवसानी सूर्याला भेटायला गेलो होतो.त्याचं असं झालं,
सूर्याला पहिला मुलगा होऊन एक वर्ष झालं असेल.मागे तो मला भेटला होता त्यावेळेला त्याने ही गोड बातमी मला सांगीतली होती.गोड बातमी म्हणण्याचा माझा उद्देश असा की लग्न होऊन गेली दहा वर्ष सूर्याला एकही अपत्य नव्हतं.डॉक्टरी उपाय करून त्याच्या प्रयत्नाला यश आलं नव्हतं.ज्या ज्या वेळी तो मला भेटायचा त्या त्या वेळी त्याची ही खंत मला तो सांगायचा.तसं अजून त्याचं वय झालं नव्हतं.मी त्याला नेहमीच धीर देत आलो आहे.शेवटी त्याची कामना पूर्ण झाली.त्याच्या आयुष्यात नवीन बहार आली.

असाच मी एकदा त्याला भेटायला म्हणून त्याच्या घरी गेलो होतो.तो आपल्या रांगणार्‍या मुलाला चालायला शिकवत होता.मला पाहून सूर्या खूपच आनंदला.
तो आपल्या मनातलं मला सांगत होता.

“जेव्हा माझा मुलगा जमीनीवर रांगत होता,आणि अधूनमधून उभा राहून चालण्याचा प्रयत्न करीत होता,तेव्हाच मी त्याला मदत करण्याच्या प्रयत्नात असायचो.तसं करण्यात त्याला त्या प्रयत्नात फक्त धीर देण्याचा माझा मानस नव्हता तर त्यातून मला त्याच्या मनावर गोवायचं होतं की हे धीर देणं म्हणजेच त्याच्यात त्याची वाढ होत असताना त्याने व्यवहार्य,साध्य होण्यासारखं जीवनाचं तत्वज्ञान,जे त्याच्या चालण्याच्या प्रयत्नातल्या प्रत्येक पावलाबरोबर तेव्हडंच खात्रीपूवर्क आणि मजबूत पाऊल असावं, जे त्याच्या भविष्यात येणार्‍या पुढल्या पन्नास वर्षासाठी उपयोगात असावं.त्याला हा दिलागेलेला धीर मुळातच,काहीसा आश्चर्यजनक,काहीसा क्षीतिपूर्ण असावा.
पण मला त्यावेळी खरंच माहित नव्हतं की,असा धीर मी देऊ शकेन की जो निश्चितपणे आयुष्यभराची ग्वाही देणारा असेल.”

सूर्याचं हे बोलणं ऐकून मी थोडा अचंबीत झालो.मी त्याला म्हणालो,
“अरे सूर्या,काही वर्षापूर्वी तुला मुल होत नाही ह्या विवंचनेत तू होतास.आणि आता हे तुझं बोलणं ऐकून माझ्या मनात विचार आला की,एका विवंचनेतून बाहेर आल्यावर दुसर्‍या विवंचनेत जायचं हे माणसाचं स्थायीभाव असल्यासारखंच आहे.आणि तशात तू आहेस व्यवसायाने शिक्षक सहाजीकच तुझ्या समोरचा दुसरा तुला तुझा शिष्य आहे असं भासणं स्वाभाविक आहे.आणि त्यात तो दुसरा तुझा मुलगाच आहे.मग तुझी इर्षा सहाजिकच जबरी असणार.सांग,सांग मला तुझ्याकडून आणखी ऐकायला आवडेल.”

सुर्या हसला आणि मला म्हणाला,
“मी नेहमीच तुमच्याकडे माझं मन उघड करण्यात आनंद मानतो.तुम्हीपण माझे विचार अस्थापूर्वक ऐकता.त्यामुळे मजा येते.”

आणि पुढे सांगू लागला,
“ज्यावर मी विश्वासून राहिलो आणि ते मी जगलो ते माझं संपूर्ण आणि उपयोगी जीवन आणि त्यातून मला मिळालेले अनुभव मी माझ्या मुलाजवळ सोपवण्याच्या प्रयत्नात आहे.माझे अनुभव जरी अभिनव होते तरी त्यातले काही अनुभव मी इतराकडून समजून घेतलेले होते.आणि ते त्यानी मला सोपवलेले होते.त्या अनुभवांची त्याच्याकडे पुनरावृत्ति करण्यात, आणि माझी समज आहे की, त्याने ती पुनरावृत्ति एकण्यात गैर मानु नये. म्हणजे समजा मी ऐकलेल्या म्हणी,उतारे,नियमसुद्धा त्याने ऐकावेत.उदाहरणं द्यायची झाल्यास,
“प्रामाणिकपणाची आयुष्यात गरज असते”,
“वेळीच केलेली गोष्ट पुढचे कष्ट वाचवते”,
“नर्मदेतला गोटा गोटाच असतो”,
“हसा म्हणजे तुमच्याबरोबर जगही हसेल पण रडाल तर तुम्हाला एकट्यालाच रडावं लागेल”,
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे,”तुम्ही जसे दुसर्‍याशी वागाल तसंच दुसरा तुमच्याशी वागेल”.

पण हे सर्व त्याच्या कानावर घालत असताना मी अशा तर्‍हेने त्याला सांगीन की ती त्याला शक्यतो घोषवाक्यं वाटायला नकोत.आणि तसं करणं मला सोपं होणार नाही हे माहित आहे.कारण ही घोषवाक्यं इतक्यांदा पुनोर्चारीत झालेली आहेत की,ती बोजड झाली आहेत,ढोंगी वाटतात आणि त्यातला खरेपणा बोथट झाला आहे.
तरीपण मी त्याला सांगत जाईन कारण मला त्यावर विश्वास आहे.आणि हजारोंचा त्यावर विश्वास आहे.अमुक एक धर्मात ती सांगीतली आहेत असंच नसून ती सर्व समाजात सफलतापूर्वक वापरात आहेत.
आताशा मी मानत चाललो आहे की,समाजातले सर्वच लोक गुणवान असतात असं नाही पण बर्‍याच लोकाना आपण गुणवान असावं असं वाटत असतं.
माझा मुलगा लवकरच आपल्या पायावर चालेल.शेजार्‍याच्या मुलाशी तो खेळायला लागला की त्याला संगती मिळेल.माझे त्याच्यावरचे संस्कार त्याला चांगल्या
संगतीत रहायला मदत होईल.आणि जगाच्या पाठीवर कुठेही त्याला ह्याचा फायदाच होईल.”

निरोप घेताना मी त्याला म्हणालो,
“तुझ्या ह्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि तुझ्या मुलाला माझे आशिर्वाद आहेत”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: