सांगशील का ते दिवस कुठे गेले?

(अनुवाद)

नयन सांगती कथा प्रीतिची
तरूण जीवनाची अन सुखी दुनियेची
का जाळूनी करीशी दैना माझ्या घरट्याची?
का जीवना लटूनी आयुष्य नष्ट केले गेले ?
सांगशील का ते दिवस कुठे गेले?

माझ्या ममतेचा विसर तुला आला कसा?
माझ्या अंतरीचा दाह उपेक्षीत केलास कसा?
नको तू विचारू प्राण माझा थकला कसा?
कसे दिवस आले अन ते कसे गेले?
सांगशील का ते दिवस कुठे गेले?

प्रीति करूनी विसरलीस प्रीतिची रीति
जशी अनुरति करिती पंतग अन ज्योती
आता फक्त माझे उदव्हस्त उपवन राहिले
अंतरातले मनोरथ अंतरातच सामावले
सांगशील का ते दिवस कुठे गेले?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: