माझ्या आजोळचे संस्कार आणि पर्यावरण

“निसर्गाला आपल्याशी दोस्ती करायला बिनातक्रार मोकळा मार्ग माहित असतो असं मला वाटतं.”…गंगाधर.

गंगाधर तेंडूलकर,माझा जुना दोस्त.आमच्या लहानपणी आमच्या आजोळी आम्ही दोघानी खूप मजा मारली.पण गंगाधरावर जे निसर्गाचे संस्कार झाले ते त्याने उर्वरीत आयुष्यात तंतोतंत पाळले.आता तो निवृत्त झाला आहे.त्या दिवशी आम्ही आमच्या लहानपणीच्या गप्पा मारित होतो.

मी त्याला विचरले,
“काय रे गंगा,आपण दोघे लहानपणी आजोळी खूप हिंडलो फिरलो.मी पण माझी कारकीर्द संशोधनात केली.पण तुझ्यावर मात्र निसर्गाचे एव्हडे परिणाम झालेले दि़सतात की तू चक्क पर्यावरणावर कारकीर्द करायला वळलास.हे कसं?”

गंगाधर मला म्हणाला,
मी लहानपाणी माझ्या आजोबांकडेच वाढलो.त्यावेळी,आजुबाजूचा परिसर पूर्णपणे झाडा-झुडपानी पसरलेला होता.वर पर्यंत चढण्यासारखी अनेक झाडं, वृक्ष होते.बाजूला एक खाडी होती त्यात आमची होडी फिरवायला सोय होती.आणि आमचे आजुबाजूचे शेजारी त्यांच्या परसामधून मुक्तपणे हिंडायला परवानगी द्यायचे.त्या लहानपणीच्या दिवसात,निसर्ग आमचा सहचर आणि प्रदाता आहे असं आम्हाला वाटायचा.ती खाडीतली माती,चिखल आणि लहान मोठे गोटे आमच्या उघड्या बोडक्या पायांना स्थिरचित वाटायचे.जेव्हा उन्हाळा मी म्हणायचा, असह्य वाटायचा त्यावेळी वड-वृक्षाची झाडी आम्हाला आमच्या डोक्यावरचं छत वाटायचं.
मला आठवतं अशावेळी आम्ही जमीनीवर सरळ लोळत असायचो,खालच्या पाल्यापाचोळ्यावर डोकं दाबल्यासारखं करून त्या सर्द-दमट पानांचा गार-शीतल स्पर्शाचा अनुभव घ्यायचो.”

“ते मलाही आठवतं पण मला नवल वाटतं तुला निसर्गाने एव्हडं कसं आकर्षित केलं?” मी त्याला विचारलं.

माझ्या प्रश्नावर खूष होऊन तो म्हणाला,
“मला असं वाटतं की निसर्ग जरूरीच्या वेळेला आपल्याला कवटाळत असतो.मला अशाच एका संध्याकाळची आठवण येते की माझं पोरगेलं हृदय अस्वस्थ आणि कष्टी झालं होतं.त्या घटनेची आठवण जरा आता पुस्स्ट झाली असली तरी,माझी स्मृती अजिबात पुसून गेलीली नाही.ज्यावेळी मी त्या भव्य वडाच्या झाडवर फांदीचा आधार घेऊन वरवर चढत जात होतो,आणि खाली पाहिल्यावर मी मुसमुसून रडायला लागलो होतो.त्याचवेळी त्या फांदीने मला कवटाळून घेतलं होतं.वार्‍याच्या झोताबरोबर मला त्या फांदीने वर उचलून धरलं होतं.माझे डोळ्यातले अश्रू सुके पर्यंत त्या फांदीने मला आधार दिला होता.झाडावरून खाली उतरल्यानंतर मी माझ्या आईला विचारलं पण, की तू माझ्या मदीतीला का धावून आली नाहीस.लगेचच माझी आई मला म्हणाली,”तू त्या वडावर तूरतूर चढून फांदीवर झेपावला होतास त्याचवेळेला मी समजले होते की तू पूर्ण सुखरूप असणार.कारण झाडं-पेडं म्हणजेच निसर्ग आहे.आणि निसर्ग आपला कैवारी असतो.तो तुला संभाळून घेणार ह्यावर माझा पूर्ण वि़श्वास होता.आणि तूही त्यातून खाहीतरी शिकशीलच असं माझ्या मनात आलं होतं.

जसा मी मोठा होत गेलो तसा,मी माझं निसर्गावरचं प्रेम आणि पर्यावरणाचा आदर ठेवीत गेलो त्यामुळेच की काय मी माणसाच्या स्वास्थ्यावर पर्यावरणामुळे होणार्‍या परिणामाच्या अभ्यासाची कारकीर्द अवलंबली.बरेच वेळां मी निसार्गाला सुक्ष्मदर्शक यंत्रातून त्याने निर्माण केलेल्या पाण्याला न्यहाळत असतो.त्या पाण्याची गुणवता आणि त्यामुळे प्रकृतीवर होणार्‍या परिणामाची शोधाशोध करीत असतो. पाण्याच्या थेंबाच्या एक लक्षांस भागावर शोध घेऊन,त्यात असलेल्या पार्‍याचा अती-अस्तीत्वाचा लहान विकसनशील मुलाच्या मेंदूवर होणारे परिणाम किती भयानक होतील हे पहात असतो त्याचा अहवाल लिहून ठेवीत असतो.

माझे विचार बहुदा परियावर्णाच्या नितीशास्त्रात,त्याच्या नियमात आणि त्याच्या रोगपरिस्थितिविज्ञानात मश्गूल झालेले असतात. निसर्गाचे हे सर्व विभाग आपल्याला त्याचा दृष्टीकोन दाखवून देतात आणि त्यातूनच नैसर्गीक जग कसं काम करतं ह्याचा पडताळा होतो. खरोखरच निसर्गाच्या उत्सर्ग दर्जाज्याबाबत जे शब्द आहेत, तथ्य आहे,धोरणं आहेत,नियम आहेत त्याचा विचार करून त्यात मी हरवला जातो.आणि ह्या गोष्टी खरोखरच माणसाच्या स्वास्थ्यासाठी पुरेसे काळजी करणारे आहेत का ह्याबद्दल संभ्रमात असतो. मला असं वाटतं की,एकदा का आपण निसर्गाशी सख्य ठेवीत राहिलो की,तो आपल्याला कधीच गैरविश्वास दाखवणार नाही.मी ज्या ज्या वेळी सकाळच्या आनंदी वातावरणात माझ्या कामावर जात असतो त्या त्या वेळी पिंपळाच्या पानातून जाणारा वारा पानांची सळसळ केल्याशिवाय रहात नाही.जणू ती सळसळणारी पानं माझ्याशी संवाद साधत असावीत असं मला वाटत असतं.
अशा ह्या निसर्बाच्या सर्व घटना, माझ्या कामाच्या बाबतीत आठवणी आणणार्‍या गोष्टीबद्दल आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी ठरलेल्या वेळापत्रकाच्या तारखाबद्दल विचार येऊन, विचलित झालेलं माझं मन जाग्यावर आणण्यासाठी माझ्या ह्या निसर्ग मित्राची आठवण करून देतात.ह्या मित्रानेच मला गेली कित्येक वर्ष समर्थित केलेलं आहे.दिलासा दिलेला आहे.ह्या माझ्या खूप जून्या आणि अरक्षित मित्राला सावरण्यासाठी आणि त्याने मला सोबत दिल्याबद्दल माझ्या मनात त्याचे आभार मानण्यासाठी खूप तीव्र इच्छा येतात.”

“खरोखरच,तुझ्या बरोबर चर्चाकरून मी निसर्गाबद्दल बरंच काही शिकलो”
असं म्हणून मी त्याची रजा घेतली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: