ती गोड गाणी कशी मी गाऊ?

(अनुवाद)

प्रीतिची वचने कशी बरे मी पाळू?
भोवतालच्या ज्वाळांना कशी मी सांभाळू?
प्रीतिला रोखणारी भिंत कशी मी उखडू?

असतील अगणीत गोड गाणी
वेदनेमधे डुबलेली
असताना तुटलेली तार अंतराची
ती गोड गाणी कशी मी गाऊ?

असताना व्यथेचा भार अंतरात
संभाळीन त्याला सुलभतेने
पण असताना भार जीवनाचा
ती व्यथा कशी मी संभाळू?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: