हि(लरी) अमेरिकन दुर्गा आता मागे वळून बघायची नाय.

“काय रे भाऊ वाजपयीनी इंदिरा गांधीना दुर्गाची उपाधी दिली होती ना?”

“अगदी बरोबर.इंदिरा गांधीने,बंगलादेश निर्माण करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते.”

“मग तू हिलरीला अमेरिकन दुर्गा असं संबोधून काय सांगयला बघतोयस रे भाऊ?”

“अरे,ज्यावेळी एखादी स्त्री आपली मर्दूमकी दाखवून देशाला आपला नैतिक आदेश आणि प्रामाणिकपणाची कृती दाखवण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा तिला दुर्गा असं संबोधतात.”

“पण दुर्ग म्हणजे एखाद्या किल्ल्यासारखी जागा जी संरक्षीत असते आणि दुसरा त्या ठिकाणी पोहचूं शकत नाही.असंच ना रे भाऊ?”

“अरे,एव्हडंच नाही तर अशी स्त्री की जी,अरेरावी,मत्सर,पूर्वग्रह,तिरस्कार,क्षोभ,लालसा आणि स्वार्थ अशा गोष्टींचा पाडाव करून आपलं सामर्थ्य दाखवते”

“पण जास्तकरून हे उजवे आणि प्रतिगामी हिलरीला अगदी तू लिहितोस त्याच्या उलट समजतात ना रे भाऊ? का माझं काही चूकलं का?”

“नव्हे, नव्हे तूझं काहीही चूकलं नाही.अरे गेले ३०,३५ वर्षं हे उजवे हात धुऊन तिच्या मागे लागले आहेत.आता, राजकारणात पडल्यावर वैमनस्य,चुरस वगैरे आलंच ना?.
व्हाईट वॉटर प्रकरण म्हणू नको,
मॉनिका लुइन्स्की प्रकरण म्हणू नको,
इमेल प्रकरण म्हणू नको,
क्लिन्टन फॉउन्डेशन म्हणू नको,
ह्या प्रकरणातून काही ना काहीतरी कुजका धागा काढून हिलरीला सतवायला ह्या उजव्याने प्रयत्न सोडलेले नाहीत.
आणि गम्मत म्हणजे त्या सर्व प्रकरणातून तिने सईसलामत सुटून घेऊन त्यांना ढेंगा दाखवायला तिने काही कमी केलं नाही.

अरे तळ्यात उडी घेतल्यावर पायाची मळ खायला मासे चावा घेत असणारच.तिला एक माहित आहे की
कितीदाही नॉकाऊट केलं तरी उठून उभं रहायचं आणि पुन्हा लढत रहायचं.आणि ह्यामुळेच अमेरिकेच्या इतीहासात कधी न घडलं ते म्हणजे पहिली स्त्री प्रेसिडेंटसाठी नॉमिनेट व्हायला ती कारणीभूत झाली.
लेबर-डेची सुट्टी संपली.आता प्रचाराला उधाण येणार.२६ सप्टेंबरला हिलरी आणि डॉनॉल्ट ट्रम्प ह्या दोघामधे डिबेट होणार.आयुष्यभर डिबेट करण्यात जिने रस घेतला तिला अशी ही इलेक्शनपूर्वी येणारी तीन डिबेट्स “किस पेडकी पत्तीच” असणार.”

“हिलरीबद्दल तुला इतकं का रे वाटतं भाऊ?”

“अरे,त्याला बरीच कारणं आहेत.एक म्हणजे एव्हड्या मोठ्या पदावर एक स्त्री विराजमान होण्याचा संभव आहे.हे मला मनापासून आवडलं.गेल्या २४० वर्षाची अमेरिकेच्या इतिहासातली पुरुष प्रेसिडेंट होत आला आहे ही मिरासदारी ती मोडण्याचा संभव आहे.. जगातल्या बहुतेक सर्व स्त्रीयांना स्त्री-वर्गाची एक अतिशय पावरफुल स्री म्हणून अभिमानाची गोष्ट आहे असं वाटण्याचा संभव आहे.बहुतांश स्त्री-वर्गाचा आणि लहान मुलांचा तिच्याकडून काहीना काही फायदा होण्याचा संभव आहे.”

“हिलरी प्रेसिडेंट झाली तर ती कमांडर-इन-चीफ होणार म्हणजे रे काय भाऊ?”

“अरे,म्हणजे ती विमान-दल,पाय-दल आणि सागरी-दल ह्या तिन्ही दलांची चीफ कमांडर होणार.जगातल्या सर्वात शक्तीशाली मिलीटरी तिच्या आज्ञेत असणार. शिवाय एक हजार न्युकलीअर बॉम्बचं बटण दाबण्याचं तिच्याकडे सामर्थ्य असणार.”

“आता मला कळलं,म्हणूनच तू तिला अमेरिकन दुर्गा म्हणतोस का रे भाऊ?”

“होय अर्थात.”

“जसजसं ही निवडणूक रंगत जाईल तसतशी तू मला माहिती देशील ना रे भाऊ?”

“अगदी अलबत.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: