हिलरी “दुर्गा” आहे अशी डॉनाल्ड ट्रम्पचीच कबुली.

“काल दुसरं डिबेट झालं.हिलरी चवदा पॉइन्ट्सने दुस‍र्‍यांदा जिंकली.

२००५ मधे खासगीत ट्रम्प जे व्हिडीयोवर स्त्रींयाबद्दल(हलकट,चावट) बोलला होता, तो व्हिडीयो डिबेटच्यापूर्वी ऐनवेळी सर्व देशात टिव्हीवर उघडपणे दाखवला गेला.

डिबेटमधे त्याबद्दल त्याला प्रथम माफी मागावी लागली.हिलरीने त्याला डिबेटमधल्या तिच्या भाषणात शाल-जोडीतले जोडे योग्य प्रकारे दिले म्हणा.

आणि ट्रम्पच शेवटी हिलरीबद्दल बोलला,

“She doesn’t quit. She doesn’t give up. I respect that. I tell it like it is. She’s a fighter.”
म्हणजेच ती दूर्गा आहे असंच त्याला म्हणायचं होतं.होय ना रे भाऊ?

“होय तर,अरे ट्रम्प जे व्हिडीयोवर स्रींयाबद्दल बोलला,ते जर एखादा भारतातला नेता निवडणूकीत स्त्रींयाबद्दल बोलला असता तर भारतीय स्रीयांनी मोर्चा काढला असत्ता, त्याला रस्त्यावर आणून त्याची दिंड काढली असती आणि जाहिर माफी मागायला लावली असती.आणि निवडणूकीत त्याला धडा शिकवला असता.”

“त्यामानाने अमेरिकन स्त्रीया जरा बावळटच आहेत नाही का रे भाऊ?”

“तसं नव्हे रे, आपल्या भारतीय स्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या फाल्तूगीरी चालवून घेणार नाहीत.इमिग्रेशनमुळे निरनीराळ्या संस्काराच्या स्त्रीया इकडे आहेत.त्यामुळे इकडच्या स्त्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या आता निवडणूकीत त्याला धडा शिकावतील.७२ टक्के स्त्रीया अगोदरच डॉनाल्डच्या विरोधात गेल्या आहेत असं ऐकतो.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॉलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: