तीन्ही डिबेटमधे जिंकून, अमेरिकन दुर्गेची- हिलरीची, ८ नव्हेंबरकडे आगेकूच

तीन्ही डिबेटमधे जिंकून, अमेरिकन दुर्गेची- हिलरीची, ८ नव्हेंबरकडे आगेकूच

“हिलरीने ट्रम्पला तिसर्‍या डिबेटमधे सफशेल पाडलं हे खरं आहे का रे भाऊ?”

“नक्कीच. अरे, शेवटी चिडून ट्रम्प जाऊन चक्क तिला म्हणालाही
“दुर्गे दुर्घट भारी..”
त्याच्या द्दष्टीने,
“Nasty woman”
पण ती त्याच्याकडे बघून हसली मात्र.
“मी जिंकलो तरच निवडणूकीच्या रिझल्टला मान्यता देईन” असं दुसर्‍या दिवशी सकाळी म्हणाला.पोरकटपणाची परिसीमा म्हटली पाहिजे.”

“आता पुढे काय होणार असं तुला वाटतं भाऊ?”

“अंदाज असा आहे की,हिलरी ज्याअर्थी इलेक्टरल व्होटमधे सहजच ३०५ ह्या आकड्यावर पोहोचली आहे.(निवडणूक जिंकायला २७० व्होटस लागतात.)आणि ट्रम्प अजून १७१ व्होटसला रेंगाळतो आहे त्याअर्थी निकाल उघडच आहे.आणि हे त्यालाही माहित आहे.आता उरलेले दिवस तो आदळ-आपट करणार हे निश्चीत.”

“इलेक्टरल व्होटस म्हणजे रे काय भाऊ?”

“१०० सिनेटर्स आणि ४३५ कॉंग्रेसमन मिळून ५३५ इलेक्टरल व्होटस अधीक ३ डिस्ट्रीक कोलंबीयाचे मिळून ५३८ व्होट्स होतात.५३५च्या निम्मेच्या जवळ म्हणजे २७० व्होटस मेजारीटी व्होटस म्हणून समजली जातात.२७० च्या वर ज्याला व्होट्स मिळतात तो जिंकतो.
सर्व साधारण प्रत्येक राज्यातून २ सिनेटर्स निवडले जातात.म्हणजे ५० राज्यांचे १०० सिनेटर्स.आणि प्रत्येक राज्याच्या लोकसंख्ये प्रमाणे कॉंग्रेसमन निवडले जातात. एकून ४३५+३ म्हणजे ४३८ कॉंग्रेसमन होतात.४३८+१०० म्हणजे ५३८ एकूण इलेक्टरल व्होटस होतात.”

मग प्रत्येक नागरिकाच्या व्होट्सचं काय रे भाऊ?

“त्या त्या राज्यातले नागरिक आपल्या उमेदवाराला मत देतात.दोघा प्रेसिडेंट उमेदवारापैकी ज्याला जास्त मतं मिळतात ते राज्य तो उमेदवार जिंकतो आणि त्या राज्याला दिलेली सर्वच्या सर्व इलेक्टरल व्होटस त्याला मिळतात.ज्या राज्यात जास्त लोकसंख्या त्या राज्यातील इलेक्टरल व्होटस जास्त.

उदा: कॉलिफोरनीयाला ५५ इलेक्टरल व्होटस आहेत.

नागरिकानी दिलेली व्होटस ज्याला पॉप्युलर व्होटस म्हणतात ती ज्या उमेदवाराला जास्त मिळतात तो जिंकला असं नाही.ज्याला २७० पेक्षा जास्त इलेक्टरल व्होटस मिळाली तो जिंकतो.”

“मग ही इलेक्टरल व्होटस ही काय भानगड आहे रे भाऊ?

“अरे,त्याला खूप इतिहास आहे.पण थोडक्यात सांगायच्ं तर जास्तीत जास्त पॉप्युलर व्होटस मिळतात त्या पार्टीच्या उमेदवाराची आणि त्याच्या पार्टीची मिरास होऊ नये म्हणून ५० ही राज्यात इलेक्टरल व्होटस आहेत.त्यामुळे पॉप्युलर व्होटस मिळाली म्हणून तो जिंकला असं होत नाही.ज्याला २७० वर इलेक्टरल व्होटस मिळतात तो जिंकतो कारण त्याची पॉप्युल्यारीटी किती राज्यातून तो निवडून आला ह्या वर आहे.त्यामुळे सर्व राज्याना न्याय मिळतो.
एखाद्या निवडणूकीत एखादं राज्य एकावेळे एका पार्टीचा उमेदवार निवडून देईल तर दुसर्‍या वेळच्या प्रेसिडेंटच्या निवडणूकीत दुसर्‍या पार्टीचा निवडून देईल.अशा राज्याना स्विंग स्टेट्स म्हणतात.प्रचार करून करून एखादं राज्य आपल्या पार्टीकडे फिरवून घेता येतं अशा राज्याना बॅटलग्राऊंड स्टेट म्हणतात.पण काही राज्यं काही झालं तरी एकाच पार्टीला मेजारीटी व्होट देतात
उदा:कॅलिफोरनीया …..नेहमीच डेमॉक्रेटीक पार्टी्ला निवडून देते
टेक्सस……रिबक्लीन पार्टी.
असं काहीसं आहे.सगळं समजावून सांगायला जागा ही नाही आणि पूर्ण माहिती खिचकट आहे,आणखी डिटेल माहिती हवी असल्यास गुगल करून पहाणं सोपं होईल.पण सगळ्यानांच त्यात इंटरेस्ट नसतं.”

म्हणजे आता ८ नोव्हेंबरची वाट पहावी लागेल असंच ना भाऊ?

“होय,अगदी असंच”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: