माझ्या बाबांची शेवटची इच्छा

मी ॲम्बूलन्सच्या पुढच्या सीटवर बसले होते.मागे माझे ९३ वयाचे वडील झोपले होते मी
त्यांना समाधान वाटावे म्हणून म्हणाले,
“एक सुंद्रर झगझगीत तारा सूर्रकन एका दीशेकडून दुसर्‍या दीशेला जाताना मी आत्ताच
पाहिला.”
आणि नंतर मी माझ्या मलाच म्हणाले,
काही लोक म्हणतात,काहीतरी होणार आहे ह्याचं भाकीत केलं जातं.अगदी जवळच्याचं निधन
होणार आहे.पण मी माझ्या मलाच समजावयाचा प्रयत्न करीत होते.हा तुटलेला तारा जो मी
पाहिला तो नक्कीच माझ्या क्षीण पण धीर-गंभीर बाबाना काहीही होऊ देणार नाही.

आम्ही आमच्या गावाला होतो.माझ्या भावाने मुंबईला एक छोटीशी पार्टी योजली होती.गेली
कित्येक वर्ष माझे बाबा गावालाच रहात होते.माझी इतर भावंडही मुंबईत रहात असल्याने
बाबा जर का ह्यावेळी मुंबईला आले तर त्यांची सर्वांशी भेट होईल अशी कल्पना त्यांच्या
मनात येऊन ते मुंबईला यायला कबूल झाले होते.पार्टीमधे आनंद घेत असताना एकाएकी
त्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या.खरं म्हणजे ते सुग्रास जेवणाचा आनंद घेत होते.
जेवता जेवता राजकारणावरही बोलत होते.एकदा तर त्यांनी वयस्कर लोकांना औषोधी उपाय
सहजगत्या कसे मिळत नाहीत याबद्दल स्वारस्य घेऊन चर्चा करीत होते.त्यांचं म्हणणं असं
होतं की,बरेचसे डॉक्टर पेशंटच्या टेस्ट घेण्यात जेव्हडं स्वारस्य घेतात की पेशंटची देखभाल
करणं कमी पडायला लागतं.आदल्या आठवड्यात, मला आठवतं,माझ्याकडे अंमळ निराशजनक
हसून मला सांगत होते की,मी माझ्या उजव्या हातावर गोंदून घेणार आहे.
“बेशुद्ध झाल्यास शुद्धीवर आणू नका.”
आपल्या उजव्या मनगटावर दाब देत ते सांगत होते.
मला माझे बाबा नेहमीच सांगायचे गंभीर आजार आल्यास मला गंभीर महागडी उपाय योजना
करू नका.आणि माझं आयुष्य लांबणीवर जाऊ देऊ नका.

एव्हाना, मदतनीसानी डॉक्टरच्या सल्ल्यावरून माझ्या बाबाना बेशुद्धावस्थेत एमरजन्सी रूममधे
हलवलं.तपासून झाल्यावर डॉक्टर म्हणाले,
“त्यांच्या कमकूवत झालेल्या रक्तवाहीनीने एका जागी फुगवटा आणला होता तो आता फुटला
आहे”
“त्यांना ह्यातून जगवण्याचे प्रयत्न करता येतील.पण काही खरं नाही.त्यानी काही अगोदरच न
जगण्याबद्द्ल लिहून दिलं आहे का?”
त्यांनी असं लिहून ठेवलं होतं.पण माझ्याजवळ त्याची प्रत नाही आणि त्यांच्या वॉलेट मधेही
तसं काही दिसत नाही.

बर्‍याच देशात वयस्कर लोकांबद्दल अशी परिस्थीती उध्भवते.आणि डॉक्टर मंडळी धोका
पत्करत नाहीत.आणि अशा लोकांची मृत्युशय्येवरची इच्छा अशीच राहून जातेमाझ्या बाबांच्या
बाबतीत गोंदावलेली सुचना उपयोगी पडली.त्यांना शांत पडू दिलं होतं.
एका तासानंतर,आम्ही सर्व नातेवाईक त्यांच्या भोवती जमलो होतो;ते शांतपणे हे जग सोडून
गेले.कसल्या टेस्टस नाहीत,सर्जरी नाही,आणि दवाखान्यात रखडपट्टी झाली नाही.

कुसूम सांगत होती,आणि मी सुन्न होऊन ऐकत होतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: