Monthly Archives: जून 2017

उन्हात वाळत असलेले कपडे पहाण्यातली मौज.

“तेव्हड्यात आमच्या शेजारच्या आजीबाई आपल्या घरातून बाहेर येऊन मला सांगू लागल्या की,तसं न केलेलं बरं.कारण म्हणे तिचा नातू परदेशाहून आला आहे आणि त्याला हे असं घराबाहेर प्रदर्शन आवडत नाही”…इति ज्योतीबाई. ज्योती फार पुर्वी एका अशा शेजारात रहायची की,तिने जर का आपले ओले कपडे उदा.गोधड्या,चादरी,धोपटी वगैरे वईवर वाळत घालायचा प्रयत्न केला की तिच्या ह्या शेजार्‍याकडून नाक […]

माळरानातली शांती

शांततेचं दान. “तुम्हाला सांगायला लाज वाटते परंतु,न सांगून माझ्या पुढच्या विचाराना बळकटी येणार नाही.गेल्या तीन महिन्यात माझा दोनदा गर्भपात झाला. मी अगदी हैराण झाले होते.” इति सुलभा. मी अपना-बाजार मधे आंबे घेण्यासाठी गेलो होतो.माझ्या अगोदर सुलभा ,माझी शेजारीण,आंब्याची एक पेटी खरीदताना मी पाहिलं.तिनेही मला पाहिलं. “अगं,तू केव्हा आलीस.?कोकणात गेली होतीस ना? तरी पाचसहा महिने तरी […]

काडीमोड आणि प्रेम

सौजन्य सहजासहजी घडत नाही. मंगला आपल्या जीवनात; स्वातंत्र्य,कायद्याचं पालन,देवाचं महात्म्य आणि धर्माचं पालन ह्या गोष्टीवर विश्वास ठेवते आणि ह्याचमुळे देवाशी दुवा सापडला जातो अशी ती श्रद्धा ठेवते. मंगला,माझी मोठी पुतणी,म्हणजे माझ्या थोरल्या भावाची मोठी मुलगी.मंगला जात्याच हुषार आहे.शाळेत तिचा नेहमीच पहिला नंबर यायचा.कॉलेजात तेच.अगदी चांगले मार्क्स घेऊन ती इंग्लीश घेऊन M.A.झाली.पुढे phd करण्याचा तिचा विचार […]

सुमधूर हास्य आणि त्याचं रहस्य

“असं म्हटल जातं की प्रेमामुळे जातीभेदाचे,शिक्षणाचे आणि भाषेचेसुद्धा अटकाव दूर होतात, पण जर का त्या प्रेमात विनोद नसतील,हास्य नसेल,मजेदारपणा नसेल तर मात्र पैजेने मी तुम्हाला सांगेन की ते प्रेम जास्त काळ टिकेल याबद्दल मी साशंकच राहिन.” इति रघुनाथ रघुनाथ कामत आणि माझ्यात नेह्मीच कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चा चालू असते.त्यावर वाद होतात.एकमेकाला मुद्दा पटवण्याच्या प्रयत्नात […]

एका बेडकाची गोष्ट

“परिकथेतील राजकुमारा स्वपनी माझ्या येशील का?” अलका लहानपणापासून सुंदर पर्‍यांची परिकथा वाचण्यात आणि त्यावर एखादा सिनेमा आल्यास तो पहाण्यात रस घ्यायची.असल्या परिकथांचा शेवट नेहमीच “त्यानंतर ती सर्व सुखाने राहू लागली” किंवा असा काहीतरी शेवट होईल अशा त्या कथा असायच्या. पण एकदा जेव्हा तिच्या आईकडून तिला “शेवटी सुखाने रहाण्याचा” आयुष्यातला खरा अर्थ कळला तेव्हा खरं काय […]