Monthly Archives: ऑगस्ट 2017

माडाच्या झाडाने दिलेला संदेश.

“असं म्हणतात,आपल्या तुटपूंज्या उत्पनात दोन माडाच्या नारळाच्या उत्पनाची भर टाकून एक छोटं कुटूंब वर्षभर आपला उदर्निवाह करू शकतं.” गजानन आणि मी बरीच वर्षं शेजारी शेजारी म्हणून शहरात राहिलो होतो.ज्या ज्या वेळी माझा त्याच्याशी संपर्क यायचा त्यावेळी कसलाही विषय निघाला तरी त्या चर्चेत काहीना काही तरी विषय काढून मी त्याला कोकणाचा संदर्भ द्यायचो.गजानन अशावेळी नेहमीच म्हणायचा […]

स्पषटोक्तीचे फायदे.

“आता आपण जर का बलात्काराच्या वा व्यभिचाराच्या संबंधाने, “योनी” ह्या शब्दाचा स्पष्टोद्गार केला.”….इति सुनंदाची मैत्रीण. सुनंदाची आणि माझी भेट एका नाट्यगृहात झाली.नाटक संपल्यावर आम्ही एकमेकाला बाहेर भेटायचं ठरवलं. “बरेच दिवस तुम्ही माझ्या घरी आला नाही.तुम्हाला एक इंटरेस्टींग विषयावर, माझी आणि माझ्या मैत्रीणीची, चर्चा झाली ती ऐकायला मजा येईल. माझ्या घरी ह्या रविवारी जेवायला या.” सुनंदा […]

सजीव यंत्र.

“ती मला सांगत होती की ज्या मुलावर मी प्रेम करायची त्याला विसरून जा……..इति जयश्री. जयश्रीच्या आणि माझ्या वयात दोन-पाच वर्षांचा फरक होता.मी जयश्रीपेक्षा लहान होतो.माझ्या आजोळी आमच्या शेजारी जयश्रीचं घर होतं.आमच्या राहात्या खोलीच्या खिडकीतून जयश्रीच्या घरातल्या स्वयंपाक खोलीची खिडकी दिसायची. जयश्री आणि तिची आई ह्यांची वादावादी झाली की आम्हाला त्यांचा संवाद ऐकायला यायचा.ते माझ्या चांगलं […]

निसर्ग आणि ईश्वर

“मला वाटतं उभं आयुष्य हे सुखाने आणि दुःखाने मिश्रीत झालं आहे.म्हणूनच मनुष्याने हसत खेळत प्रेम करत आयुष्य जगायला हवं.” मी मनोहराला म्हणालो, “मला असं वाटतं की,ईश्वर म्हणजेच निसर्ग.ज्या विश्वात आपण रहातो ते विश्व केवळ काही आकस्मिक घटना घडल्यामुळे किंवा कसल्यातरी योगायोगामुळे निर्माण झालं असं मला वाटत नाही.आपली उत्पती केवळ पाण्यातून आणि कातळातून झालेली नसावी.झाडं,बर्फ,समुद्र,फुलं-मला वाटतं […]

आध्यात्माची कास

“दुसर्‍या अर्थाने म्हणायचं झाल्यास,चांगली माणसं असल्याशिवाय चांगलं विश्व घडवता येणार नाही.” ……इति यदुनाथ. प्रभाकरला आणि मला लहानपणापासून ट्रेकिंग करायला खूप आवडायचं.कोकणातला रहिवासी असल्यानंतर निरनीराळ्या उंच उंच डोंगरावर ट्रेकिंग करायला परवणीच मिळाली आहे असं समजायला मुळीच हरकत नाही. ट्रेकिंग करायला शाळेतून प्रोत्साहन मिळण्याचे ते दिवस नव्हते.पण आम्ही मित्र मंडळी सुट्टीच्या दिवसात एकत्र जमून ट्रेकिंगसाठी कार्यक्रम आखायचो.अनेक […]