निसर्ग आणि ईश्वर

“मला वाटतं उभं आयुष्य हे सुखाने आणि दुःखाने मिश्रीत झालं आहे.म्हणूनच मनुष्याने हसत खेळत प्रेम करत आयुष्य जगायला हवं.”

मी मनोहराला म्हणालो,
“मला असं वाटतं की,ईश्वर म्हणजेच निसर्ग.ज्या विश्वात आपण रहातो ते विश्व केवळ काही आकस्मिक घटना घडल्यामुळे किंवा कसल्यातरी योगायोगामुळे निर्माण झालं असं मला वाटत नाही.आपली उत्पती केवळ पाण्यातून आणि कातळातून झालेली नसावी.झाडं,बर्फ,समुद्र,फुलं-मला वाटतं हे सौन्दर्य जे उदयाला येत असतं त्यातच ईश्वर
आहे आणि तोच निसर्ग आहे.”

त्या दिवशी मनोहरशी चर्चा करताना मला तसं त्याला सांगावं लागलं.
कारण मनोहर ईश्वराच्या अस्तित्वावर भरवंसा ठेवीत आला आहे.मला त्याची ईश्वरावर असलेली श्रद्धा विचलित करायची नव्हती.

“अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म न्याय नीति अन “ईश्वर” सारा खेळ कल्पनेचा”
(उद्गार चिन्हातला शब्द माझा आहे)
एका गीतातल्या ह्या सुरवातीच्या ओळी माझ्या विचाराशी अगदी जुळतात.

“एखाद्या निरभ्र उन्हाळ्याच्या दिवसात मी सुंदर सूर्यास्त पहातो,तेव्हा माझ्या मनात उत्पन्न झालेला आनंद, माझ्या अंतरातून निघून जाताना जसा सौन्दर्याचा आनंद देतो,तसाच यातनाही देतो,व्यथाही देतो कारण तो आनंद जाता जाता “हे सुद्धा लोप पावणार आहे” असं सांगून जातो.
अशावेळी तू ईश्वराच्या निकट असतोस.तू ईश्वराची प्रार्थना अशावेळी कदाचीत करीत नसशील.कारण काय विचारावं असं वाटण्यापूर्वीच तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळालेलं असतं.”

माझं हे म्हणणं ऎकून मनोहर मला म्हणाला,
“मला वाटतं,मनुष्य प्राण्यामधे इतर प्राण्यापेक्षा जास्त पराक्रम असतो,साहस असतं, हिम्मत असते..अख्या मानवजातितला तो एक भाग आहे.मानवजातीचा अंत म्हणजेच त्याचा अंत.
मला वाटतं माझ्याकडून इतरांसाठी थोडातरी त्याग व्हायला हवा.मी पाहिलंय की आपल्यात असलेलं अवसान, आपल्या आपत्ति काळात विनोदबुद्धिचा बुरखा घेऊन वेळ निभावू शकते.तसंच, आवश्यकतेचा क्षण आल्यास क्रियाशीलतेचा बुरखा घेऊन वेळ निभावू शकते. एका शब्दाने जर का मुक्ति मिळत असेल तर तेच अवसान शांतीचा बुरखा घेऊन वेळ निभावू शकतं.आपल्या जीवनात एव्हडी गुंतागुंत असते की,त्याला अंत नाही.परंतु,तर्कशक्तीचा आणि सदस्दविवेकबुद्धिचा वापर करून मनुष्यात असलेलं साहस हे एक दीपस्थंभ होऊन पुढचा मार्ग सुलभ करू शकते.ईश्वरावर श्रद्धा असल्यास हा विचार सबळ होतो.”

मी मनोहराला म्हणालो,
“तू कदाचीत म्हणशील की,हे जग सध्या पूर्ण नीरस झालं आहे आणि आपली त्यातून सुटका नाही.तू म्हणशील,पण मी काही म्हणायला तयार नाही.मी असं म्हणेन की,नवीन युगाच्या सीमेवर येऊन हे जग ठेपलं आहे.शिवाय विज्ञान अशा टप्यावर येऊन ठेपलं आहे की पुर्‍या मानवजातीचं ते एक शुभचिन्तक झालं आहे. ज्ञानापासून मनुष्याला बहुमूल्य ठेवा मिळाला आहे.ह्यामुळे भाईचारा वाढून जगात शांती आणि सुरक्षता असणं ही मनुष्याला देणगी वाटणार आहे.”

आपल्या ईश्वरी श्रद्धेवर भर देऊन आणि बरोबरीने, माझ्या विज्ञानावरच्या विचारावर सहमत होऊन मनोहर मला सांगत होता,
“मला असं वाटतं,जग युध्यखोर होत असताना,विकसीत होणारं विज्ञान मनुष्यजातीची विचारधारा बदलण्याच्या प्रयत्नात असेल.माण्साचं मन हा एक ईश्वरी चम्तकार आहे.मनोविज्ञान शीघ्रतेने विकसित होत आहे. आणि असं विकसित होत असताना हेच मन एखाद्या शिल्यकारासारखं आपल्या अंगातल्या कलाकुसरीने मनाची चीरफाड
करून मनुष्यजातीला प्रेरणा काय असते ते परिचीत करून देईल.आणि ह्यातूनच माणूस एकमेकाला समजून घेऊन, खरा नैतीक संकेत काय आहे हे ही लक्षात घेईल.”

मला रहावलं नाही.मी मनोहरला म्हणालो,
“मनुष्यप्राणी ही निसर्गाची आणि तू म्हणतोस तशी ईश्वराची वास्तुशिल्पीय,यंत्रवत उत्कृष्ट कृति आहे.मनुष्यातलं नैपुण्य यंत्रापेक्षा खूपच श्रेष्ठ आहे.मनुष्याच्या अंगात रासायनीक कारखाना आहे. त्याची कदापी नक्कल होऊ शकणार नाही, कुणी त्यावर मात करू शकणार नाही.”

“मनुष्याच्या प्रतिष्ठेवर,त्याच्या सत्यनिष्ठेवर त्याच्या स्वयं हक्कावर माझा विश्वास आहे.आणि माझ्या मनातला एक नियम आहे की एका विशिष्ठ पातळी पर्यंत मी किंवा माझ्या सहकार्‍याने त्यात कसलाच बदल इच्छू नये.”
मनोहर मला म्हणाला.”

चर्चेचा समारोप करताना मी मनोहरला म्हणालो,
“मला वाटतं उभं आयुष्य हे सुखाने आणि दुःखाने मिश्रीत झालं आहे.म्हणूनच मनुष्याने हसत खेळत प्रेमकरत आयुष्य जगायला हवं.मग त्याने भले निसर्गावर श्रद्धा ठेवावी वा ईश्वरावर.”

मी जाता जाता मनोहराला एक कोकणी म्हण सांगीतली,
“कोणाच्याही कोंब्याने उजाडेना! पहाट झाली म्हणजे झालां!.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: