माझ्या आज्जीचे बोल

शिल्पाच्या कुटूंबात, त्यांच्या जीवनात आर्थिक आणि डॉक्टरी उपाय आणि औषधी खर्च ही संकटं आली आणि त्यांनी ती भोगली. त्यामुळे त्यांच्या भावनांचा भंग झाला आणि त्यांच्यावर मोठा आघात झाल्यासारखे त्यांना वाटत होतं. असंच एकदा तिला तिच्या आजीचे बोल आठवले त्याने ती जरा धीट बनली आणि त्यातून तिने मार्ग काढला.

त्याच असं झालं,शिल्पाची आजी अलीकडेच गेली.मला कळल्यावर मी शिल्पाला भेटायला गेलो होतो.तिच्या आजीचाच विषय निघाला होता.
मला शिल्पा म्हणाली,
“माझ्या आजीची शिकवणूक मला नेहमी आठवते.तिचं एक वाक्य मला नेहमीच आठवतं ती नेहमीच म्हणायची,
“काहीतरी चांगलं होणार आहे म्हणूनच काहीतरी वाईट घडत असतं.”

बरीच वर्ष आजीच्या ह्या म्हणण्याचा अर्थ मला कळत नव्हता.किंबहुना त्या म्हणीचा मी गैरसमजच करून घेतला होता.खरं म्हणजे हे आजीचं म्हणणं बरचसं प्रचलित आहे.पण मी मला नेमस्त आशावादी समजत असल्याने मला त्या म्हणीचा अर्थ “एक दरवाजा बंद झाला की दुसरा उघडतो”अशा काहीशा अर्थी वाटला.
पण अगदी अलीकडेच आमच्यावर आलेल्या असह्य आणि धडधडी भरण्या इतपतच्या कठीण वेळेच्या शृंखलेनंतर माझ्या आजीच्या म्हणण्याचा खरा अर्थ मला कळला.

पहिला कठीण प्रसंग म्हणजे माझ्या पहिल्या मुलीच्या जन्मावेळी.तिला मुळातच ह्रुदय विकार होता.पहिली सर्जरी झाल्यानंतर पुन्हा दोन वर्षानी लहानशी सर्जरी करावी लागली.त्या काळातला तो भावनीक निचरा होत असताना, नवल नाही, माझ्या नवर्‍याचा बिझीनेस थोडा मंदीत गेला.ह्याच सुमारास औषधाचा खर्च अमाप होत होता.नंतर
माझ्या नवर्‍याच्या पाठ दुखण्याचा व्याधीने एव्हडा जोर केला की तो जवळ जवळ निपचीत झाला होता.सरतेशेवटी ह्या सर्व गोष्टीचा दबाव एव्हडा आला की आम्ही जवळजवळ दिवाळखोर झालो होतो.परत सुरवात करण्यापूर्वी आम्ही पुरे दबले गेलो होतो.

आमच्या स्वप्नांचा,आणि आशा-आकांक्षाचा चक्काचूर झाल होता.पुन्हा शुन्यातून आम्हाला वर यायचं होतं.ह्याचवेळी माझ्या आजीचे ते बोल मला समजायला लागले होते.त्याचा खरा अर्थ मला समजायला लागला होता.आजीच्या त्या म्हणीने मला काय शिकवण्याचा प्रयत्न केला ते मी समजले.अनुकूल समयाबद्द्ल तो प्रयत्न मुळीच नव्हता.दरवाजे उघडण्याबद्दल तर मुळीच नव्हता.भग्नावशेष झाल्यानंतर काय निर्माण होतं त्याबद्दल ती माझ्यासाठी शिकवणूक होती.

माझ्या स्वभावात त्यामुळे भरमसाट बदल झाला अशातला भाग नव्हता.तसंच मला वरकरणी समजलं गेलंय अशातलाही भाग नव्हता.
उलटपक्षी,समुद्रात एखाद्या खडकाचा आधार घेऊन प्रवाळाचे थर जसे जीवंत झालेले दिसतात,तसंच छोट्या छोट्या गोष्टी करत जाऊन आमच्या योजना आम्ही कामी आणल्या.आता,मी जवळ जवळ रोजच माझ्या अंगात तीन नव्या क्षमता आणण्यासाठी मी सामोरी जात आहे.आणि त्या म्हणजे,विनयशीलता,सहजता आणि कृतज्ञता.ह्या तीन क्षमता माझ्या स्वभावात अगदी गुंथल्या जाण्याची जरूरी आहे.गेल्या काही वर्षात होत राहिलेल्या एक प्रकारच्या समुद्रात होणार्‍या लाटांच्या भडिमारातून काहितरी चांगलं होवू पहात आहे.हे चांगलं होवू पहाणं ह्यातून आपण विकसीत व्हायला आणि बदल करून घ्यायला आपल्यात ताकद आणू शकतो.झालेल्या आपत्तीमुळे
आशा-आकांक्षेच्या उरलेल्या भग्न अवशेषातून ह्या माझ्या पूनर्निर्मीत जगात मी नवीन कौश्यल्य अंगात आणायला शिकले.

समुद्रातल्या खडकाळ भागात लाटांच्या मार्‍याने भंग झालेलं जीवन एक एका खडकावर पुन्हा विकसीत होत रहातं,तसंच जशी मी आता विकसीत होत राहिले आहे,तसं काहीतरी चांगलं होणार आहे असं समजायाला शिकली आहे.भविष्यात,लाटांचा होऊ घातलेल्या मार्‍याला प्रतिरोध करायला मी चांगलीच शिकली आहे.आणि लाटामुळे निर्माण
झालेल्या शुभ्र फेसावर हलायला डुलायला शिकली आहे.
भविष्यात येणार्‍या भरती-ओहटीकडे मी जाणीव न ठेवता राहत असूनही माझ्या अंगात बळ आलेलं आहे असं मी जर म्हणाले तर ते मी खोटं बोलल्यासारखं होईल.परंतु माझ्या आजीचे उद्गार माझं हृदय अविचलीत करतात.मला माहित आहे की,तिचे ते उद्गार,माझ्या अंगात ताकद,बळ आणण्यात परिणामकारक होणार आहेत.भविष्यात
चांगलंच होणार.”

शिल्पाची ही सर्व कथा ऐकून मला बरंच गहिवरल्यासारखं झालं.मला हे सर्व सांगताना तिच्या चेहर्‍यावर तणाव आलेला मला दिसला.मी तिला म्हणालो,
“शिल्पा तू कोकणातली आहेस.त्यामुळेच समुद्राची तुला जवळीक असल्याबद्दल आश्चर्य नाही.तुझं खरंच कौतुक केलं पाहिजे कारण समुद्राचा, लाटांचा,लाटांच्या फेसाचा,प्रवाळाचा,समुद्रातल्या खडकांचा जो तू समर्पकपणे वापर करून तुझ्या परिस्थितीचं जे तू वर्णन केलंस त्याबद्दल मला आनंद होतो.पण जाता जाता एक तुला मी सांगतो.माझी आजीपण तुझ्या आजीच्या बोला सारखी बोलायची.फरक एव्हडाच ती म्हणायची,
“होतं ते बर्‍यासाठी होतं”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: