झंझावात आपलं जीवन निर्धारीत करतात.

.
“मला वाटतं,आपल्या जीवनात जे मोठे क्षण येतात ते आपल्यात संपुर्ण स्थैर्य असताना येत नसून जेव्हा अस्थिरतेचं प्रभावीपण, जे आपण काबीज करू शकणार नाही, अशावेळी येतात आणि ते क्षण अस्थिरतेच्या प्रभावीपणाचा आपल्याला कब्जा करायला लावतात.”

मी कोकणात इतकी वर्षं राहिलो पण पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास जी वादळं आणि झंझावात येतात ती मी चांगलीच अनुभवली आहेत.बरेच वेळा अशा वादळांचा आनंद होण्याऐवजी मला भीतीच वाटायची.असं काही न होता सरळसोट पाऊस का पडत नाही असं मला वाटायचं.विशेषकरून वादळात ज्या वीजा चमकतात त्यांची मला माझ्या लहानपणी खूप भीती वाटायची.वीजेनंतर गडगडाट व्हायचा त्यावेळी माझी लहान भावंड तर जोरजोरात रडायची.जणू कुणी त्यांना मारलं की काय असं भासायचं.
पण निसर्गाची ही प्रक्रिया आहे हे समजायला मला जरा वेळ लागला.

ज्यावेळी माझी आणि गजाननाची ह्या विषयावर चर्चा झाली तेव्हा मला आणखी काही माहिती मिळाली.तो तर मला म्हणाला त्याला ही झंझावातं फार आवडतात.

मला गजानन म्हणाला,
“कोकणात पावसाळ्यात मेघ गर्जना करून,वीजा कडाडून होणारी वादळं,झंझावात, मला आवडतात.कारण झंझावात होण्याने मनात एक प्रकारचा भरवसा येतो की, जरी ती क्षणीक असली आणि घातक असली तरी त्यातून मनावर एक प्रकारचा संवेदनाचा आघात होत असतो की, रचनात्माक किंवा विध्वंसक बदल घडवून आणण्यांची त्यांच्यात
एक प्रकारची कुवत असते.

पावसामुळे,मातीत पाणी जमतं, नद्या तयार होतात ज्यामुळे जीवनाचं पालन होतं,किंवा जीवन संपुष्टातही येऊ शकतं आणि लहानश्या चमकणार्‍या वीजा आग लागून डोंगरावरच्या जंगलांची इकडे तिकडे उलटा-पालट करायला कारणीभूत झाल्या तरी अशा वीजांचा रोष,त्या जर आवक्याबाहेर गेल्या की,उत्पात करू शकातात हे मात्र निश्चीत
आहे.

ह्या अशा मेघ गर्जना करून येणार्‍या वादळामधे सामर्थ्य असतंच शिवाय त्यामधे प्रचंड धोकाही असतो.त्यामुळेच ही वादळं,झंझावत,मला चित्ताकर्षक वाटतात.असं म्हणतात,कोकणातली ही वादळं शेकडो हजारो वर्षापासून घट्ट मातीला आणि भुसभूशीत मातीला त्या त्या प्रदेशातून हळु हळु धुऊन काढून त्या जागी पहाड,शिखरं,टेकाडं आणि डोंगर उत्पादित करायला कारणीभूत झाली आहेत.

पावसाचं आगमन सुचवायलाच जणू ही वादळं निरोप घेऊन येतात.निरभ्र आकाश एकाएकी काळ्याकुट्ट ढगानी पूर्ण भरून जातं,भर दुपारी एव्ह्डा काळोख होतो की घरातले दिवे लावावे लागतात.घरात वीज नव्हती तेव्हा लोक समया,मेणबत्या किंवा कंदील पेटवून ठेवायचे.बरोबरीने प्रचंड वारा सुटला की,कोकणातली रस्त्यावरची लाल माती

उधळली जाऊन आसमंत भरून टाकते.प्रथम आकाशात बारीक बारीक वीजा चमकतात,त्यानंतर थोडा गडगडाट होत रहातो,मधेच स्मशान शांतता येते.
आणि एकाएकी प्रचंड वीजेचा लोट आकाशात दिसतो आणि लगेचच कानठिळ्या बसतील असा कडाड-कुडूंब होऊन आवाज येतो. सर्व परिसर उजळला जातो.एखादा अजस्र राक्षस हातात कुर्‍हाड घेऊन पृथ्वीची दोन शकलं करायाला तयार झाला आहे अस वाटतं.

मला वाटतं,ही वादळं आकाशातली स्मारकं आहेत.तशीच ती व्यक्तिगत इतिवृत्त आहेत.परंतु,ही वादळं तेव्हडीच भयंकर आहेत.त्यांची ही स्मारकं तयार होत असताना धोका निर्माण झाल्या शिवाय रहात नाही.असाच मला माझ्या लहानपणाचा प्रसंग आठवतो.

ते पावसाळ्याचे दिवस होते.
आमच्या घरामागच्या डोंगरावर आम्ही काही मित्रमंडळी उस्फुर्त होऊन वर वर चढत गेलो होतो.परत येई पर्यंत आकाश काळ्या ढगांनी व्यापलं गेलं होतं.काही वर्षापूर्वी ह्या डोंगरावर वीज पडून बरेच वृक्ष जळून गेले होते.त्यांचे जळके अवशेष तिथेच पडले होते.फांद्या कापून लोकांनी जळणासाठी नेल्या असाव्यात.परंतु,मोठी खोडं तिथेच पडली
होती.पुन्हा वीज पडण्याची बरीच शक्यता होती.भरभर डोंगर उतरत आम्ही खाली येत होतो.मनात इच्छा एवहडीच होती की वीज पडून त्या झाडंसारखं आम्हाला जळून मरण न येवो.

तात्पुरती भयभीत करणारी ही वादळं,आपल्या रोजच्या अनुभवाच्यावर जाऊन आपल्याला प्रभावीत करतात.मला वाटतं,आपल्या जीवनात जे मोठे क्षण येतात ते आपल्यात संपुर्ण स्थैर्य असताना येत नसून जेव्हा अस्थिरतेचं प्रभावीपण, जे आपण काबीज करू शकणार नाही,अशावेळी येतात आणि ते क्षण अस्थिरतेच्या प्रभावीपणाचा आपल्याला कब्जा करायला लावतात. ही वादळं फक्त विनाशाचं प्रतिनिधित्व करीत नाहीत. उलट ती आपल्या विपत्तित आणि शोकान्ताच्यावेळी सिद्ध करायला पुनःपरिभाषित करण्याच्या संधी असतात.

शेवटी मी म्हणेन,अशा झंझावातात तुम्ही घरात रहा किंवा बाहेर पावसात जा एक मात्र निश्चित की,प्रकाशाची आवश्यक्यता नाही तर अग्नीची आहे.सुसह्य पावसाची नाही तर झंझावाताची आहे.झंझावाताची,वावटळीची आणि भूकंपाची जरूरी आहे.असं मला राहून राहून वाटतं.”

गजाननाचं हे सर्व ऐकून मला पुढचा कोकणातला पावसाळा त्याच्या दृष्टीकोनातून अनुभावायला मजा येईल अशी माझी इच्छा मी त्याच्याकडे प्रदर्शीत केली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: