कॉफी आणि उमाकांत.

“ज्या गोष्टी बदलण्यासाठी तुमची क्षमता नसते त्या तुम्ही तशाच जाऊ दिल्यात आणि ज्या बदलू शकाल त्यांना कवटाळून बसलात तरंच तुम्ही खरं जीवन जगू शकाल.”

“तुम्हाला कुठच्या पद्धतीची कॉफी आवडते?बरीच गरम,आईस्ड कॉफी,सरळ सरळ केलेली काळी कॉफी,एस्प्रेसो कॉफी,ड्बल शॉट कॅपिचिनो,पेपरमिंट मोचा की आणखी कुठच्या पद्धतीची कॉफी?असंख्य प्रकारच्या पद्धतीची कॉफी बनविता येते.आणि गम्मत म्हणजे त्यामुळे प्रत्यक्षात कॉफी कशी व्हावी त्याचे असंख्य प्रकार होतील.

आपल्या जीवनाबद्दल विचार केल्यास अशाच कॉफी बनवण्याच्या पद्धतीने असंख्य तर्‍हेनं तुमचं जीवन तुम्हाला बनवता येतं.तेव्हा कॉफी आणि तुमचं जीवन कसं बनवायचं हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे.असं मला वाटतं.”
असं उमाकांत एकदा मला म्हनाला.

“तुमच्या जीवनाकडे तुम्ही लक्ष देऊन पहायला लागला की,खरोखरच तुम्ही ते कसं घडवता ह्यावर अवलंबून असतं.कॉफी तयार करायला मूलभूत अशी सामुग्री लागते.आणि तुम्ही स्वत:चं म्हणून त्यात एखाद्या घटकाची भर घालता,तेव्हा ती कॉफी आगळी होते. आपल्या जीवनात काही अवस्था असतात आणि त्या आपल्या नियंत्रणाच्या पलीकडच्या असतात.आणि आपण त्या अवस्थेशी कसे सामोरे जातो त्यातच खरा फरक असतो.तुम्हाला ज्यावेळी कॉफीचा कप दिलेला असतो त्यावेळी खरं तर तुमची निवड असते की ती एस्प्रेसो बनवायची की निव्वळ काळी कॉफी तयार करायची.”

ही कॉफीवरची आणि जीवनावरची चर्चा,मी आणि उमाकांत असेच एकदा कॉफी पिताना करीत होतो.उमाकांत सकाळीच माझ्या घरी आला होता.उमाकांतला कॉफी आवडते आणि ती सुद्धा काळी कुट्ट साखर न घालता,दुध न घालता गरम गरम कडू कॉफी मिळाली की कॉफीची चव घेत घेत उमाकांतची तंद्री लागते.

मला मात्र सत्यनारायणाच्या पुजेच्या दिवशी करतात तशी कॉफी खूपच आवडते.कॉफीतच आटवलेलं दुधा घालून त्यात भरपूर साखर टाकून वेलचीपूड टाकून गरम गरम कॉफी मी एरव्ही पीत असतो.
उमाकांतला ती कडू कॉफी,मी त्याला कडू किराईतचा काढाच म्हणतो,अगदी चव घेत घेत प्यायला कशी आवडते हे कोडं मला कळलं नाही.आणि तसा जर का मी उमाकांतला प्रश्न केला की मग तो आणखी अनेक प्रकारच्या कॉफीची उदाहरणं देत रहातो.

ह्यावेळी मात्र उमाकांत कोणत्या तंद्रीत होता कुणास ठाऊक त्याने मला वेगळंच उदाहरण दिलं.
मला म्हणाला,
“माझ्या जीवनाची वाढ माझ्या वडीलांच्या सहवासात झाली.माझे वडील कॉफीवर खूप प्रेम करायचे आणि त्यावर ते अवलंबूनही होते.माझ्या वडीलांकडूनच मी कॉफीबद्दल बरंच काही शिकलो,आणि तसंच जीवनाबद्दलही.माझ्या वडीलांकडून आणि त्यांच्या आजीकाडून मी एक शिकलो की कॉफीची चव ही एक संपादलेली चव आहे.जीवनाचं पण असंच आहे.ते पुर्ण संपादीत व्हायला बराच काळ निघून जातो आणि कांहींना तर त्याचा व्यासंग ठेवून किंवा परिश्रम घेऊनही साध्य होत नाही.

काहीवेळा अगदी उतावीळ होऊन कॉफीचा घोट पिण्याचा प्रयत्न केल्यास ओठ मात्र भाजून घेतला जातो.जीवनातलं उदाहरण द्यायचं झाल्यास, मी “चटका” लावून घेतो जेव्हा मीच एखाद्या गोष्टीचं जादा मुल्यांकन करतो.जेव्हा सहजासहजी माझ्या हाती कही लागत नाही तेव्हा मला एक पाऊल मागे घ्यावं लागतं आणि हे ही लक्षात ठेवावं लागतं मी नाहीतरी माणूस आहे.

तरीपण,कॉफीची सुरवातीची चव घेण्याचा तुमचा मानस नसेल तर मग तुम्ही त्याचा शेवट असा कराल की ती कॉफी एकदम थंडगार होऊन जाईल.कधी कधी तुम्ही कॉफी तयार करीत असताना तुमच्याकडून एखादा घटक त्यात जास्त घातला गेला असेल तर त्यामुळे त्या कॉफीची चव अगदी खराब किंवा विचित्र होऊ शकते.आणि कधी कधी ह्या अशा चुका झाल्या तर,पुन:श्च तुम्हाला ताजी कॉफी तयार करावी लागेल.परंतु,हा नवा कॉफीचा कप म्हणजे काही अंतिम प्रकार नसतो.उलटपक्षी हा एकदम नवा कॉफीचा कप नव्या प्रकारच्या कॉफीच्या चवीची शक्यता घेऊन येण्याचा संभव असू शकतो पण ते सर्व तुमच्यावर अवलंबून आहे.

तेव्हा जर का तुमचं जीवन हा एक कॉफीचा कप असण्याचा संभव असेल तर ते कॉफी सारखं एखादं निरर्थक मिश्रण होईल का? ह्याचा विचार करायला हवा.
किंवा कदाचित,तुमच्या जीवनात विलक्षण ढंग असलेल्या अवस्था येऊन त्या अवस्था जीवनाला, एकप्रकारचा कॉफीच्या मिश्रणासारखा, आकार देणार्‍या ठराव्यात का.? ह्याचा विचार झाला पाहिजे.
मला असं वाटतं,प्रत्येकाला एक त्यांचा कॉफीचा कप दिला गेलेला आहे आणि त्यात अगणीत (मिश्रणाच्या) शक्यता आहेत.
म्हणून मला असं वाटतं,
ज्या गोष्टी बदलण्यासाठी तुमची क्षमता नसते त्या तुम्ही तशाच जाऊ दिल्यात आणि ज्या बदलू शकाल त्यांना कवटाळून बसलात तरंच तुम्ही खरं जीवन जगू शकाल.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: